
फोटो सौजन्य: @dailyrevs/X.com
जगभरात सुझुकीने दमदार कार ऑफर केल्या आहेत. कंपनीची Suzuki Victoris तर मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहे. नुकतेच कंपनीने बायोगॅसवर चालणारी Victoris सुद्धा जपानमध्ये लाँच केली. कंपनी इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनावर सुद्धा लक्षकेंद्रित करत आहे.
Suzuki ने Japan Mobility Show 2025 मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक मायक्रो कार Suzuki Vision E-Sky सादर केली आहे. ही फक्त एक कॉन्सेप्ट कार नसून कंपनीच्या इलेक्ट्रिक भविष्याकडे टाकलेले एक मोठे पाऊल आहे. Suzuki ने नेहमीच छोटे, परवडणारे आणि इंधनाची बचत करणारे वाहन तयार करण्यावर भर दिला आहे. कंपनीनुसार, Vision E-Sky ला 2026 फिनान्शियल वर्षात बाजारात लाँच केले जाणार आहे.
Suzuki Vision E-Sky ही Just Right Mini BEV” अशी कार आहे.,म्हणजेच ही शहरांमध्ये वापरण्यासाठी एकदम योग्य बॅटरी इलेक्ट्रिक वाहन. ही कार खास Kei Car सेगमेंटसाठी तयार करण्यात आली आहे, ज्यात लहान पण अत्यंत उपयुक्त आणि परवडणाऱ्या कार्सचा समावेश होतो. Vision E-Sky चे डिझाइन Smart, Unique आणि Positive या थीमवर आधारित असून ते एक आधुनिक आणि आकर्षक लुक देते.
Suzuki Vision E-Sky चे डिझाइन कॉम्पॅक्ट असूनही अत्यंत प्रीमियम आणि फ्यूचरिस्टिक आहे. 3,395 mm लांबी, 1,475 mm रुंदी आणि 1,625 mm उंची असलेली ही कार शहरातील ट्रॅफिक आणि अरुंद पार्किंगमध्ये सहज बसते. एक्सटिरिअर डिझाइनमध्ये C-Shape LED DRLs, पिक्सेल-स्टाइल हेडलाइट्स, स्मूथ बॉडी लाइन्स आणि रिट्रॅक्टेबल डोर हँडल्स आहेत. स्लोपिंग रूफलाइन आणि बोल्ड व्हील आर्चेसमुळे तिला मिनी SUV सारखा स्पोर्टी लुक मिळतो.
Toyota च्या ‘या’ ॲडव्हान्स कारमध्ये आली खराबी, 2,257 युनिट्ससाठी रिकॉल जाहीर
Vision E-Sky चं केबिन मिनिमलिझम आणि फंक्शनॅलिटी यांचं उत्तम मिश्रण आहे. Less is More या कॉन्सेप्टवर आधारित डिझाइनमध्ये कमी बटणं, अधिक जागा आणि युजर-फ्रेंडली लेआउट आहे. यात फ्लोटिंग सेंटर कन्सोल, वायरलेस चार्जिंग पॅड, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, आणि ट्रे-स्टाइल डॅशबोर्ड मिळतात. एम्बिएंट लाइटिंग आणि स्क्वेअर स्टीयरिंग व्हीलमुळे ड्रायव्हिंग अधिक सोयीस्कर बनते.
Suzuki Vision E-Sky मध्ये हाय-एफिशिएंसी बॅटरी पॅक आहे, ज्यामुळे ती एकाच चार्जमध्ये सुमारे 270 किलोमीटर रेंज देते. ही रेंज शहरी प्रवास आणि विकेंड ट्रिपसाठी आदर्श आहे. Suzuki चा उद्देश ही कार लो-कॉस्ट, मेंटेनन्स-फ्री आणि एनर्जी-एफिशिएंट बनवण्याचा आहे. रेंज आणि किंमत लक्षात घेता, ही कार Tata Tiago EV आणि MG Comet EV सारख्या छोट्या इलेक्ट्रिक कार्सना जबरदस्त स्पर्धा देऊ शकते.