 
        
        Toyota च्या 'या' ॲडव्हान्स कारमध्ये आली खराबी
ऑटो बाजारात अनेक अशा कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार बेस्ट कार ऑफर करत असतात. अशीच एक कंपनी म्हणजे टोयोटा मोटर्स. Toyota च्या अनेक कार भारतात लोकप्रिय ठरल्या आहेत. अशीच एक कार म्हणजे Toyota Camry. नुकतेच कंपनीने या कारसाठी रिकॉल जाहीर केला आहे.
टोयोटाने त्यांच्या नवव्या जनरेशनच्या Toyota Camry साठी रिकॉल जारी केला आहे, जी अलीकडेच भारतात लाँच झाली आहे. हे रिकॉल विशेषतः 360-डिग्री कॅमेरा सिस्टममधील तांत्रिक समस्येचे निराकरण करण्यासाठी आहे. या रिकॉलमुळे एकूण 2,257 युनिट्स प्रभावित झाले आहेत. चला टोयोटा कॅमरीच्या 360-डिग्री कॅमेरा सिस्टममधील समस्या आणि ती कशी दुरुस्त करावी याबद्दल जाणून घेऊयात.
फक्त 6522 रुपयांच्या EMI वर मिळेल Tata Motors ची ‘ही’ लोकप्रिय कार
टोयोटा कॅमरीची 360-डिग्री कॅमेरा सिस्टीम, ज्याला पॅनोरॅमिक व्ह्यू मॉनिटर (PMV) म्हणतात, यात एका सॉफ्टवेअर बिघाडामुळे समस्या येत आहेत ज्यामुळे पार्किंग असिस्ट ECU (इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट) खराब होते. यामुळे रिव्हर्स पार्किंग करताना इन्फोटेनमेंट टचस्क्रीनवरील इमेज फ्रिज होऊ शकते किंवा इग्निशन चालू किंवा बंद केल्यावर स्क्रीनवर कोणतीही इमेज दिसू शकत नाही. ही समस्या वाहनाच्या सुरक्षिततेवर आणि ड्रायव्हिंग अनुभवावर परिणाम करू शकते, विशेषतः पार्किंग करताना आणि रिव्हर्समध्ये कार चालवताना.
या रिकॉलचा प्राथमिक उद्देश हा सॉफ्टवेअरमधील या बिघाडाचे निराकरण करणे आहे. जेणेकरून पार्किंग असिस्ट ECU योग्यरित्या कार्य करू शकेल आणि 360-डिग्री कॅमेरा चांगल्या प्रकारे कार्य करू शकेल. ही समस्या विशेषतः अलीकडेच लाँच झालेल्या वाहनांमध्ये दिसत आहे. टोयोटाने शक्य तितक्या लवकर ती सोडवण्यासाठी ही रिकॉल जारी केली आहे.
फसू नका! Second Hand EV खरेदी करताना ‘या’ 5 गोष्टींकडे लक्ष द्या
2025 टोयोटा कॅमरीची भारतात किंमत 47.48 लाख ते 47.62 लाख दरम्यान आहे. ती दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे: एलिगंट आणि स्प्रिंट एडिशन्स. स्प्रिंट एडिशनमध्ये अतिरिक्त डिझाइन आणि फीचर्स दिले आहेत. कॅमरीला लक्झरी सेडान म्हणून स्थान देण्यात आले आहे आणि त्याची तुलना थेट Mercedes C-Class, Audi A4, आणि BMW 3 Series LWB सारख्या वाहनांशी करता येते.
ही कार 2.5-लिटर पेट्रोल इंजिनसह सुसज्ज असून, Toyota च्या पाचव्या जनरेशनच्या हायब्रिड सिस्टिम (THS 5) सोबत मिळून एकूण 230 हॉर्सपॉवर इतकी पॉवर निर्माण करते. या कारचे ARAI मायलेज 25.49 किमी/लिटर असून, त्यामुळे ती भारतातील सर्वाधिक इंधन-कार्यक्षम कारांपैकी एक ठरते.






