फोटो सौजन्य: iStock
भारतीय बाजारात अनेक उत्तम दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत ज्या बेस्ट कार ऑफर करत असतात. यात विदेशी कंपन्यांचा सुद्धा समावेश आहे. भारतीय ग्राहक सुद्धा विविध दुचाकींना चांगला प्रतिसाद देत आहे. अशातच July 2025 मधील सेल्स रिपोर्ट पब्लिश झाला आहे, ज्यात सुझुकीच्या दुचाकींना भारतीय ग्राहकांकडून जोरदार मागणी मिळाली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
भारतीय सुझुकी मोटरसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने जुलै 2025 च्या विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत आणि हे आकडे खूप खूप चांगले आहेत. कंपनीने एकूण 1,13,600 युनिट्स विकल्या आहेत, जे देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यातीत संतुलित कामगिरी दर्शवते.
जुलै 2025 मध्ये देशांतर्गत वाहन विक्रीत घट नोंदवली गेली आहे. यंदा 96,029 युनिट्सची विक्री झाली, जी जुलै 2024 मधील 1,00,602 युनिट्सच्या तुलनेत 4.5% ने कमी आहे. दुसरीकडे, निर्यातीमध्ये मात्र सकारात्मक वाढ दिसून आली असून यंदा 17,571 युनिट्सची निर्यात झाली, जी मागील वर्षीच्या 16,112 युनिट्सच्या तुलनेत 9% अधिक आहे. एकूण विक्रीची आकडेवारी पाहता, यंदा 1,13,600 युनिट्सची विक्री झाली असून ती मागील वर्षाच्या 1,16,714 युनिट्सच्या तुलनेत 2.7% नी घटली आहे. देशांतर्गत विक्रीतील घसरणीमुळे एकूण विक्रीवर परिणाम झाला असला तरी निर्यातीतील वाढ ही सकारात्मक बाब ठरते.
5 स्टार सेफ्टी आणि 800 किमीची रेंज ! 7-8 लाखांमध्ये ‘या’ SUV मार्केट गाजवताय
सुझुकीचे उपाध्यक्ष (सेल्स आणि मार्केटिंग) दीपक मुत्रेजा यांच्या मते, जुलै 2025 मध्ये, आम्ही 93,141 युनिट्सची किरकोळ विक्री नोंदवली आहे, जी गेल्या वर्षीच्या जुलैमधील 81,730 युनिट्सपेक्षा 14% जास्त आहे. या आकडेवारीवरून असे दिसून येते की ग्राहकांना सुझुकी ब्रँड सतत आवडत आहे, विशेषतः सणासुदीचा हंगाम जवळ येत असताना.
सुझुकीच्या विक्रीतील ही वाढ अनेक कारणांशी जोडलेली आहे. हो, कारण सुझुकीला ॲक्सेस 125 आणि बर्गमन स्ट्रीट सारख्या परवडणाऱ्या स्कूटर मॉडेल रेंज आहेत. त्याच वेळी, स्टायलिश मोटरसायकल Gixxer Seriesआहे जी प्रौढांना आकर्षित करते. यासोबतच, कंपनीकडे चांगले डीलर नेटवर्क आणि उत्तम ग्राहक सेवा आहे.
ट्रॅफिकमध्ये सुद्धा कार चालवणे होईल अजूनच सोपे, वापरा ‘या’ 5 टिप्स
देशांतर्गत विक्रीत किंचित घट झाली असली तरी, निर्यातीत 9% वाढ झाल्याने हे स्पष्ट होते की सुझुकी दुचाकींना आता जागतिक बाजारातही मागणी आहे. अर्थात, एकूण विक्रीत थोडीशी घट झाली असली तरी किरकोळ विक्रीच्या पातळीवर 14% ची वाढ ही सुझुकीची बाजारपेठेतील पकड मजबूत होत असल्याचे संकेत देते.