Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Suzuki SV-7GX! जास्त फीचर्सच्या शर्यतीपासून दूर राहून Suzuki ने बनवली स्मार्ट बाईक! जाणून घ्या खासियत

मोठं इंजिन आणि भरमसाठ फीचर्स देण्याच्या शर्यतीत Suzuki ने वेगळाच फॉर्म्युला वापरला आहे. 2027 Suzuki SV-7GX मध्ये जुनं विश्वासार्ह 645cc V-Twin इंजिन, आधुनिक टेक्नोलॉजी आणि उपयोगी फीचर्सचा असा मेळ आहे की ही बाईक स्मार्ट खरेदी ठरू शकते का, याची उत्सुकता वाढते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 05, 2026 | 04:12 PM
Suzuki SV-7GX! जास्त फीचर्सच्या शर्यतीपासून दूर राहून Suzuki ने बनवली स्मार्ट बाईक! जाणून घ्या खासियत
Follow Us
Follow Us:
  • Suzuki SV-7GX मध्ये 645cc V-Twin इंजिनसह आधुनिक Ride-by-Wire टेक्नोलॉजी देण्यात आली आहे.
  • क्विक शिफ्टर, ट्रॅक्शन कंट्रोल, TFT डिस्प्ले आणि नेव्हिगेशनसारखे उपयोगी फीचर्स बाईकमध्ये मिळतात.
  • महागड्या सस्पेन्शनऐवजी Suzuki ने रोजच्या वापरासाठी उपयुक्त सेटअपवर लक्ष केंद्रित केले आहे.
मिडलवेट मोटरसायकल सेगमेंटमध्ये सध्या जास्त फीचर्स देण्याची स्पर्धा सुरू आहे. मोठे इंजिन, अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स, अॅडजस्टेबल सस्पेन्शन आणि प्रीमियम हार्डवेअरमुळे अनेक बाईक्सची किंमतही झपाट्याने वाढत आहे. पण Suzuki ने यापेक्षा वेगळा मार्ग निवडत 2027 SV-7GX मध्ये रोजच्या वापरात खरोखर उपयोगी ठरणाऱ्या गोष्टींवर जास्त भर दिला आहे.

जुन्या इंजिनमध्ये नव्या टेक्नोलॉजीची जोड

SV-7GX ही SV650 आणि जुन्या V-Strom 650 यांच्या कल्पनांना जोडणारी रोड-फोकस्ड क्रॉसओव्हर मोटरसायकल आहे. यात Suzuki चे 645cc, 90-degree V-Twin इंजिन वापरण्यात आले आहे. हे इंजिन 8,500rpm वर 72.4hp पॉवर आणि 6,800rpm वर 47.2lb-ft टॉर्क देते. या इंजिन आर्किटेक्चरचा अनेक वर्षांचा वापर झाल्याने त्याची विश्वासार्हता हा मोठा फायदा ठरतो.

Suzuki ने जुन्या प्लॅटफॉर्मवरच थांबून न राहता इलेक्ट्रॉनिक थ्रॉटल बॉडी, Ride-by-Wire आणि अपडेटेड इंजिन मॅनेजमेंटचा वापर केला आहे. त्यामुळे ट्रेडीशनल V-Twin एक्सपिरीयंससोबत आधुनिक कंट्रोल्सही मिळतात.

Suzuki Gixxer Range: सुजुकी गिक्सर रेंजला नवे ड्युअल-टोन रंग; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

सस्पेन्शन साधं, पण वापरासाठी योग्य

SV-7GX मध्ये 41mm कन्व्हेन्शनल फ्रंट फोर्क आणि लिंक-टाइप रियर शॉक देण्यात आला आहे. रियर सस्पेन्शनमध्ये 7-स्टेप स्प्रिंग प्रीलोड अॅडजस्टमेंट मिळते. Semi-active सस्पेन्शन किंवा महागडी इलेक्ट्रॉनिक सेटअप नसला तरी बाईकचा मुख्य उद्देश रोजचा प्रवास, हायवे राइडिंग आणि बॅक रोडवर इझी युज हा आहे. 31.3-इंच सीट हाइट, 465-pound कर्ब वेट आणि 17-इंच व्हील्समुळे बाईक रोड-फोकस्ड आणि तुलनेने सहज हाताळता येण्यासारखी ठेवण्यात आली आहे.

फीचर्समध्ये फक्त कामाच्या गोष्टी

Ride-by-Wire मुळे Suzuki Drive Mode Selector, ट्रॅक्शन कंट्रोल आणि स्टँडर्ड बायडायरेक्शनल क्विक शिफ्टर मिळतो. A, B आणि C मोड्सनुसार थ्रॉटल रिस्पॉन्स आणि पॉवर डिलिव्हरी बदलता येते. याशिवाय 4.2-इंच कलर TFT डिस्प्ले, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, LED लाइट्स, हँड गार्ड्स, 3-पोझिशन विंडस्क्रीन आणि रियर कॅरियरही देण्यात आला आहे.

सुझुकी टू-व्हीलर्सचा भारतात नवा विक्रम; जुलै २०२६ मध्ये केली आजवरची सर्वाधिक १.४२ लाख वाहनांची विक्री 

किंमत कमी ठेवण्याची स्मार्ट रणनीती

Suzuki SV-7GX ची सुरुवातीची किंमत $8,599 आहे. तुलनेत Kawasaki Versys 650 LT ABS ची किंमत $10,399 आणि Honda NC750X DCT ची किंमत $9,499 आहे. त्यामुळे Suzuki ने प्रत्येक प्रीमियम फीचर देण्याऐवजी गरजेच्या गोष्टींवर खर्च करून किंमत नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. एकूणच, SV-7GX ही जास्त फीचर्सच्या मागे धावण्यापेक्षा योग्य फीचर्स, विश्वासार्ह इंजिन आणि रोजच्या वापरातील सोयी यांचा समतोल साधणारी मोटरसायकल ठरते.

Web Title: Suzuki sv7gx smart middleweight motorcycle features price auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 04:12 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

उन्हाने कारची सीट तापली? टेन्शन नॉट! ₹8.20 लाखांपासून या ५ कार्समध्ये मिळतोय ‘व्हेंटीलेटेड सिट’चा भन्नाट कूलिंग कम्फर्ट!
1

उन्हाने कारची सीट तापली? टेन्शन नॉट! ₹8.20 लाखांपासून या ५ कार्समध्ये मिळतोय ‘व्हेंटीलेटेड सिट’चा भन्नाट कूलिंग कम्फर्ट!

TVS Ntorq 150 चा 4,000 किमी लॉंग टर्म रिव्ह्यू! परफॉर्मन्सपासून मायलेजपर्यंत जाणून घ्या अनुभव?
2

TVS Ntorq 150 चा 4,000 किमी लॉंग टर्म रिव्ह्यू! परफॉर्मन्सपासून मायलेजपर्यंत जाणून घ्या अनुभव?

Maruti Brezza 2026: Marutiच्या ‘या’ SUVवर ग्राहक फिदा! ९५ हजार बुकिंगचा टप्पा पार, कंपनीकडे ‘इतक्या’ लाखांहून अधिक ऑर्डर्स
3

Maruti Brezza 2026: Marutiच्या ‘या’ SUVवर ग्राहक फिदा! ९५ हजार बुकिंगचा टप्पा पार, कंपनीकडे ‘इतक्या’ लाखांहून अधिक ऑर्डर्स

रॉयल एनफील्ड हिमालयन ७५० तीन नव्या रंगांत स्पॉट; स्पाय लूक आला समोर
4

रॉयल एनफील्ड हिमालयन ७५० तीन नव्या रंगांत स्पॉट; स्पाय लूक आला समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.