Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cheapest Car in India: फक्त 5.29 लाखांत मिळतेय कार, फीचर्स पाहून ग्राहक आकर्षित

Cheapest Car in India: टाटा मोटर्सची नवीन कॉम्पॅक्ट सेडान Tata Aeris सुरुवातीच्या 5.29 लाख रुपये एक्स-शोरूम किमतीमुळे चर्चेत आहे. या कारमध्ये नवीन LED हेडलॅम्प, DRL पट्टी, स्पोर्टी अलॉय व्हील्स आणि 10.24 इंच टचस्क्रीनसह अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आल्याचे वृत्तात नमूद केले आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 20, 2026 | 12:08 PM
Cheapest Car in India: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Cheapest Car in India: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Tata Aeris ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.29 लाख रुपये
  • LED हेडलॅम्प, DRL, 10.24 इंच टचस्क्रीन आणि डिजिटल मीटर
  • 360 डिग्री कॅमेरा, क्रूझ कंट्रोल, व्हेंटिलेटेड सीट्स, डॅशकॅम आणि वायरलेस चार्जर
तुम्ही जर नवीन सेडान कार घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी एक भारी बातमी आहे. टाटा मोटर्सने आपली नवीन कॉम्पॅक्ट सेडान बाजारात आणली आहे. तिचं नाव आहे Tata Aeris. या गाडीची किंमत ऐकून तुम्ही पण खुश व्हाल. सुरुवातीची किंमत फक्त 5.29 लाख रुपये एक्स-शोरूम ठेवण्यात आली आहे. Cheapest Car in India:

ही किंमत मारुतीच्या सगळ्यात जास्त विकल्या जाणाऱ्या गाडी म्हणजे Dzire पेक्षा जवळपास एक लाख रुपयांनी कमी आहे. त्यामुळे आता ग्राहकांची गर्दी या गाडीकडे वळणार हे नक्की. ही नवीन Aeris थेट टाटा Tigor ची जागा घेणार आहे. तिची लांबी 4 मीटरपेक्षा कमी ठेवली आहे, त्यामुळे तिची टक्कर Dzire, Hyundai Aura आणि Honda Amaze सोबत होणार आहे.

लूक आणि डिझाइन एकदम फ्रेश

टाटाने या गाडीच्या लूकमध्ये बरेच बदल केले आहेत. पुढच्या बाजूला पाहिलं तर नवीन LED हेडलॅम्प दिले आहेत आणि त्यावर एक DRL ची पट्टी दिली आहे जी रात्री एकदम भारी दिसते. बंपरमध्ये LED फॉग लॅम्प पण दिले आहेत. मागच्या बाजूचे टेल-लॅम्प पण पूर्णपणे नवीन डिझाइनचे आहेत.

साइडने पाहिलं तर नवीन अलॉय व्हील्स दिले आहेत जे जुन्या Tigor पेक्षा जास्त स्पोर्टी वाटतात. यावेळी कंपनीने एक नवीन जांभळा रंग पण आणला आहे जो तरुणांना खूप आवडत आहे. एकंदरीत गाडी बाहेरून एकदम प्रीमियम आणि महागडी वाटते, पण किंमत मात्र कमी आहे.

आतलं इंटेरियर तर अजूनच भारी

गाडीच्या आत बसलं की तुम्हाला टाटा Tiago ची आठवण येईल कारण डॅशबोर्ड तसाच ठेवला आहे. पण फीचर्स एकदम भरून दिले आहेत. मध्ये 10.24 इंचाचा मोठा टचस्क्रीन दिला आहे. हा स्क्रीन एकदम स्मूथ चालतो. त्याचबरोबर डिजिटल मीटर पण दिला आहे.

एक खास गोष्ट म्हणजे यात वायरलेस चार्जर दिला आहे आणि त्यावर एकाच वेळी दोन मोबाईल ठेवता येतात. हे तर खूपच कामाचं फीचर आहे. मागे बसणाऱ्यांसाठी AC चे व्हेंट आणि टाइप-C चार्जिंग पोर्ट पण दिले आहेत.

फीचर्सची तर लांब लिस्टच आहे

या छोट्या गाडीत कंपनीने मोठ्या गाड्यांचे फीचर्स टाकले आहेत. यात काय काय मिळतंय बघा.bक्रूझ कंट्रोल आहे त्यामुळे हायवेवर गाडी चालवायला सोपी जाते. ऑटोमॅटिक AC, थंड हवा देणाऱ्या व्हेंटिलेटेड सीट्स, डॅशकॅम, ब्लाइंड स्पॉट पाहण्यासाठी मॉनिटर आणि 360 डिग्री कॅमेरा. 360 कॅमेरा तर या सेगमेंटमध्ये कोणीच देत नाही, पण टाटाने दिला आहे.

त्यामुळे पार्किंग करायला एकदम सोपं जाणार. याशिवाय इलेक्ट्रिकली फोल्ड होणारे आरसे, बटण दाबून गाडी सुरु करणे आणि आरामदायी फॅब्रिक सीट्स पण आहेत.

ह्युंदाई बेयॉन एसयूव्ही भारतात 26 ऑक्टोबरला होणार लाँच; किंमत, इंजिन आणि फीचर्स जाणून घ्या

सुरक्षिततेत नंबर वन

टाटा म्हटलं की सुरक्षितता आलीच. या गाडीत कंपनीने सुरुवातीपासूनच 6 एअरबॅग दिल्या आहेत. म्हणजे सगळ्यात स्वस्त मॉडेल घेतलं तरी 6 एअरबॅग मिळणार. ही खूप मोठी गोष्ट आहे. ऑटोमॅटिक मॉडेलमध्ये तर गिअर लीव्हर काढून तिथे गोल फिरणारा रोटरी सिलेक्टर दिला आहे, जो पाहायला एकदम BMW सारखा वाटतो.

इंजिन आणि CNG मध्ये पण ऑप्शन

या गाडीत तेच इंजिन आहे जे Tigor मध्ये होतं. 1.2 लिटरचं 3 सिलिंडर पेट्रोल इंजिन. हे इंजिन 84 BHP ची पॉवर आणि 113 Nm चा टॉर्क देतं. यात तुम्हाला 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड AMT असे दोन गिअरबॉक्सचे ऑप्शन मिळतील.

मारुती सुझुकी ऑल्टो आणि एस-प्रेसोच्या किमती वाढवणार नाही; बजेट कार खरेदीदारांना दिलासा

ज्यांना CNG गाडी हवी आहे त्यांच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे. यात डबल सिलिंडर वाला CNG सेटअप दिला आहे. त्यामुळे बूटमध्ये पण थोडी जागा उरते. CNG वर ही गाडी 73 BHP पॉवर देते. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे CNG मध्ये पण AMT गिअरबॉक्स आणि पॅडल शिफ्टर्सचा ऑप्शन दिला आहे. आजपर्यंत कोणत्याच कंपनीने CNG मध्ये पॅडल शिफ्टर्स दिले नव्हते.

त्यामुळे कमी बजेटमध्ये जर तुम्हाला सेडान, भरपूर फीचर्स, सुरक्षा आणि CNG असं सगळं हवं असेल तर Tata Aeris एकदा नक्की पाहून घ्या. 5.29 लाखात एवढं सगळं दुसरं कोणीच देत नाहीये.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Tata Aeris कारची सुरुवातीची किंमत किती आहे?

    Ans: Tata Aeris ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.29 लाख रुपये असल्याचे वृत्तात नमूद केले आहे.

  • Que: Tata Aeris मध्ये कोणते इंजिन देण्यात आले आहे?

    Ans: या कारमध्ये 1.2 लिटरचे 3-सिलिंडर पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 84 BHP पॉवर आणि 113 Nm टॉर्क निर्माण करते.

  • Que: Tata Aeris मध्ये कोणते गिअरबॉक्स पर्याय उपलब्ध आहेत?

    Ans: या कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्सचे पर्याय दिले आहेत.

Web Title: Tata aeris sedan price 5 29 lakh features engine cng safety rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • auto mobile news
  • Honda Auto
  • Honda Car
  • Latest Marathi News
  • Tata

संबंधित बातम्या

Auto News: भारतीय ऑटो बाजारासाठी मोठी घोषणा! स्टेलँटिसचा २०३० पर्यंतचा प्लॅन, १२ नवीन उत्पादनांची तयारी
1

Auto News: भारतीय ऑटो बाजारासाठी मोठी घोषणा! स्टेलँटिसचा २०३० पर्यंतचा प्लॅन, १२ नवीन उत्पादनांची तयारी

बाईकप्रेमींसाठी खुशखबर! BSA Gold Star 650 नव्या दोन रंगांत सादर; लूक पाहून व्हाल फिदा
2

बाईकप्रेमींसाठी खुशखबर! BSA Gold Star 650 नव्या दोन रंगांत सादर; लूक पाहून व्हाल फिदा

Inspirational Story : दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढा; सुगमतेच्या माध्यमातून निलेश सिंगित यांचा प्रेरणादायी प्रवास
3

Inspirational Story : दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढा; सुगमतेच्या माध्यमातून निलेश सिंगित यांचा प्रेरणादायी प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.