फोटो सौजन्य: @Tataev/X.com
आपली स्वतःची कार असावी हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. हेच स्वप्न सत्यात आणण्यासाठी अनेकांना कित्येक वर्ष लागतात. मात्र, जेव्हा कार खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा टॅक्स म्हणून GST देताना खरेदीदारांना आपण अतिरिक्त पैसे देत आहोत ही भावना मनात निर्माण होताना दिसते. अनेकदा सरकारने जीएसटी कमी करावा ही मागणी सर्वसामान्यांकडून केली जात होती. अखेर केंद्र सरकारने जीएसटीचे नवीन दर येत्या 22 सप्टेंबरपासून लागू होणार असल्याची घोषणा केली आहे.
कार खरेदी पूर्वी 28 टक्के जीएसटी द्यावा लागायचा. मात्र, आता केंद्र सरकारच्या नवीन GST Rates नुसार वाहनांवर फक्त 18 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. यामुळे एकंदरीत कार खरेदीदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कित्येक कारच्या किमती या मोठ्या प्रमाणात ढासळल्या आहेत.
भारतीय क्रिकेटर Tilak Verma कडून वडिलांना ‘ही’ खास इलेक्ट्रिक एसयूव्ही भेट, जाणून घ्या किंमत
भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी Tata Motors ने देखील त्यांच्या प्रीमियम कार Tata Curvv ची किंमत कमी केली आहे. टाटा कर्व्हच्या किमतीत व्हेरिएंट आणि फ्युएल टाइपनुसार 34000 ते 67,000 पर्यंत कपात करण्यात आली आहे. चला टाटा कर्व्हच्या व्हेरिएंटनुसार किमतीत कपात करण्यावर बारकाईने नजर टाकूया.
Tata Curvv Petrol MT च्या किंमतींमध्ये कंपनीने मोठी कपात करण्यात आली आहे. सर्व व्हेरिएंट्सवर साधारणपणे 3.55 ते 3.56 टक्क्यांपर्यंतची किंमत कमी करण्यात आली आहे. आता या कारची सुरुवातीची किंमत Smart व्हेरिएंटसाठी 9.65 लाख रुपये ठेवण्यात आली आहे, जी आधीपेक्षा 34,300 रुपयांनी कमी आहे.
Tata Nexon, Maruti Brezza की Hyundai Venue, August 2025 मध्ये कोणत्या SUV ने मारली बाजी?
Pure+ व्हेरिएंट 10.91 लाख रुपये, Pure+S 11.58 लाख रुपये, Creative 12.06 लाख रुपये आणि Creative S 12.55 लाख रुपये इतकी स्वस्त झाली आहे. त्याचबरोबर, Creative+S, Creative S GDI, Accomplished S यांसारख्या व्हेरिएंट्समध्येही 48,000 ते 55,000 रुपयांपर्यंतची कपात झाली आहे. उच्च श्रेणीतील Accomplished S DKGDI, Accomplished+AGDI आणि Accomplished+A DKGDI या मॉडेल्समध्ये तब्बल 60,000 ते 62,000 रुपयांपर्यंतची किंमत कमी करण्यात आली आहे. या कपातीमुळे Tata Curvv Petrol MT ग्राहकांसाठी अधिक आकर्षक पर्याय ठरणार आहे.