फोटो सौजन्य: insidesportcricket/ Instagram
क्रिकेटर तिलक वर्मा हा त्याच्या तुफान बॅटिंगसाठी ओळखला जातो. जेव्हा कधी टीम इंडियाला जास्त धावांची गरज भासते. तेव्हा तिलक वर्माची खेळी नेहमीच भारताला सामना जिंकून देते. मात्र यंदा त्याच्या एका कृत्याने त्याने त्यांच्या चाहत्यांची मनं जिंकली आहे. तिलकने त्यांच्या वडिलांना Mahindra ची इलेक्ट्रिक एसयूव्ही गिफ्ट म्हणून दिली आहे.
भारतात अनेक क्रिकेटर मंडळी आहेत, ज्यांना विविध कारची आवड असते. अलीकडेच, टीम इंडियाच्या तिलक वर्माने त्याच्या वडिलांना महिंद्रा XEV 9e भेट दिली. चला या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या फीचर्स आणि किमतीबद्दल जाणून घेऊयात.
Tata Nexon, Maruti Brezza की Hyundai Venue, August 2025 मध्ये कोणत्या SUV ने मारली बाजी?
भारतीय संघाचा खेळाडू तिलक वर्माने नुकतीच महिंद्रा XEV 9e खरेदी केली. या क्रिकेटपटूने ही इलेक्ट्रिक एसयूव्ही त्याच्या वडिलांना भेट दिली, ज्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माहितीनुसार, या क्रिकेटपटूने ही ब्लॅक एसयूव्ही खास त्याच्या वडिलांना भेट दिली आहे.
महिंद्राने XEV 9e इलेक्ट्रिक SUV अनेक व्हेरिएंट्समध्ये बाजारात उपलब्ध करून दिली आहे. यात 12.3-इंचाची ट्रिपल स्क्रीन, AR-HUD, इन्फिनिटी रूफ, एम्बिएंट लाइटिंग, 16-स्पीकर हरमन कार्डन डॉल्बी अॅटमॉस ऑडिओ सिस्टीम दिले आहे. तसेच Calm, Cozy आणि Club असे प्री-सेट थीम्स, Every Day, Race आणि Boost असे ड्रायव्हिंग मोड्स दिले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यात 5 रडार आणि एक व्हिजन सिस्टीमसह Level-2 ADAS, ड्रायव्हर व ऑक्युपंट मॉनिटरिंग सिस्टीम, 360-डिग्री कॅमेरा आणि ऑटोपार्क सारखे आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.
Maruti Suzuki Victoris चा बेस व्हेरिएंटची चावी हातात मिळवण्यासाठी किती करावे Down Payment?
या SUV मध्ये 79kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी फुल चार्ज केल्यावर 656 किमीची MIDC रेंज प्रदान करते. यात दिलेल्या मोटरमुळे कारला 210kW ची पॉवर आणि 380Nm टॉर्क मिळतो. या मोटरमुळे SUV केवळ 6.8 सेकंदांत 0 ते 100 किमी/ता वेगाने धावू शकते. याशिवाय, 175kW फास्ट चार्जरने 20% ते 80% पर्यंत चार्ज करण्यासाठी फक्त 20 मिनिटे लागतात.
महिंद्रा XEV 9e ची किंमत 22.65 लाख (एक्स-शोरूम) आहे, तर टॉप-स्पेक व्हेरिएंटची किंमत 31.25 लाख (एक्स-शोरूम) आहे.