फोटो सौजन्य: iStock
भारतीय बाजारात अनेक ऑटो कंपन्या आहेत ज्या विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर करत असतात. यातही सर्वाधिक मागणी SUV सेगमेंटमधील कारला असते. म्हणूनच अनेक ऑटो कंपन्या देशात दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या एसयूव्ही कार ऑफर करत असतात. आता तर Automobile मार्केटमध्ये इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील लाँच होताना दिसत आहे, ज्यांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद देखील मिळताना दिसत आहे.
भारतात दरमहा लाखो युनिट्स विकल्या जातात. यातही एसयूव्ही विभागाचा सर्वाधिक वाटा आहे. अहवालांनुसार, गेल्या महिन्याभरात म्हणजेच ऑगस्ट 2025 मध्ये सब फॉर मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये कोणत्या कंपन्यांच्या एसयूव्हींना सर्वाधिक मागणी मिळाली आहे, त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
Ducati च्या दोन बाईकमध्ये आली खराबी, 393 युनिट्ससाठी रिकॉल जाहीर
टाटा मोटर्स सब फोर मीटर सेगमेंटमध्ये टाटा नेक्सॉन ऑफर करते. ही एसयूव्ही ICE आणि EV या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध केली जाते. गेल्या महिन्यात या एसयूव्हीची एकूण 14004 युनिट्सची विक्री झाली, ज्यामुळे ती टॉप-5 यादीत प्रथम क्रमांकावर आहे.
मारुती सुझुकी सब फोर मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये Maruti Suzuki Brezza विकते. गेल्या महिन्यात या एसयूव्हीच्या 13620 युनिट्स विकल्या गेल्या, जे मागील वर्षीच्या तुलनेत 29% कमी आहे.
मारुती सुझुकी सब फोर मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये अजून एक कार ऑफर करते. ही कार म्हणजे मारुती सुझुकी फ्रॉन्क्स. गेल्या महिन्यात या एसयूव्हीच्या 12422 युनिट्सची विक्री झाली आहे. विक्रीत वर्षभरात वाढ झालेली नाही.
Maruti Suzuki Victoris चा बेस व्हेरिएंटची चावी हातात मिळवण्यासाठी किती करावे Down Payment?
Tata Motors ने मायक्रो एसयूव्ही म्हणून सादर केलेली टाटा पंच देखील ऑटो बाजारात खूप लोकप्रिय आहे. कंपनीने गेल्या महिन्यात या एसयूव्हीच्या 10704 युनिट्स विकल्या आहेत.
ह्युंदाई देखील या सेगमेंटमध्ये व्हेन्यू ऑफर करते. या एसयूव्हीने गेल्या महिन्यात 8109 युनिट्स विकल्या. विक्रीतही वर्षानुवर्षे 11 टक्क्यांनी घट झाली, परंतु ती टॉप 5 मध्ये कायम आहे.