फोटो सौजन्य: @MotorOctane (X.com)
भारतीय मार्केटमध्ये अनेक ऑटोमोबाईल ब्रँड्स आहेत, ज्या ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार चांगल्या आणि उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर करत असतात. आज भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्र हे टाटा मोटर्स शिवाय अपुरे आहे. टाटाने मार्केटमध्ये अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत.
काही महिन्यांपूर्वीच टाटा मोटर्सने देशात Tata Curvv लाँच केली होती. ही कार लाँच होताच मार्केटमध्ये याबद्दल चर्चा होऊ लागली होती. ही कार लाँच झाल्यानंतर अनेक कार्सनी यासोबत स्पर्धा केली पण आजही टाटा कर्व्ह आपले स्थान राखून आहे. आज आपण अशा एका कारबद्दल जाणून घेणार जी टाटा कर्व्हला भिडायला गेली होती, पण आता याच कारची विक्री ढासळली आहे.
Skoda Auto Volkswagen India ची दमदार कामगिरी ! स्थानिक स्तरावर 5 लाख इंजिन्सचे केले उत्पादन
Citroen Basalt Coupe ही एक स्टायलिश C1-सेगमेंट एसयूव्ही आहे ज्याच्या विक्रीत फेब्रुवारी 2025 मध्ये मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. फेब्रुवारीत बेसाल्ट कूप एसयूव्हीच्या फक्त 37 युनिट्स विकल्या गेल्या, जानेवारी 2025 च्या तुलनेत 39.34 टक्क्याने कमी आहे. हा आकडा कंपनीसाठी चिंतेचा विषय असू शकतो, कारण सिट्रोएन बेसाल्ट कूप ही प्रीमियम एसयूव्ही म्हणून सादर करण्यात आली होती. महिंद्राच्या कूप एसयूव्ही कर्व्हला टक्कर देण्यासाठी सिट्रोएनने ही एसयूव्ही भारतीय बाजारात लाँच केली होती. चला या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
जानेवारी 2025 मध्ये Citroen Basalt Coupe चे फक्त 61 युनिट्स विकले गेले आहे. तर फेब्रुवारी 2025 मध्ये फक्त 37 युनिट्स विकले गेले आहे.
भर उन्हात कार होतेय Overheat? इंजिनला थंड ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 टिप्स
गेल्या 6 महिन्यांतील Citroen Basalt Coupe ची सर्वात कमी विक्री फेब्रुवारी 2025 च्या शेवटच्या महिन्यात झाली आहे. त्याच वेळी, सप्टेंबर २०२४ मध्ये सर्वाधिक 341 युनिट्सची विक्री झाली होती. कंपनीने ही एसयूव्ही टाटा कर्व्हशी स्पर्धा करण्यासाठी लाँच केली होती.
फेब्रुवारी 2025 मध्ये टाटा कर्व्हची दमदार विक्री झाली असून या कालावधीत कंपनीने एकूण 3,483 कार्सची विक्री केली आहे.
कमी ब्रँड ओळख: सिट्रोएन अजूनही भारतीय बाजारपेठेत तितकी लोकप्रिय नाही, ज्यामुळे या कारची मागणी कमी आहे.
जास्त स्पर्धा: या कारसाठी मारुती, ह्युंदाई आणि टाटा सारख्या कंपन्यांच्या एसयूव्हीशी स्पर्धा करणे कठीण होत चालले आहे.
कमी डीलर नेटवर्क: सिट्रोएनचे सर्व्हिस आणि डीलर नेटवर्क अजूनही मर्यादित आहे, ज्यामुळे ग्राहकांपर्यंत त्यांची पोहोच कमी होत आहे.