Skoda Auto Volkswagen India ची दमदार कामगिरी ! स्थानिक स्तरावर 5 लाख इंजिन्सचे केले उत्पादन
स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (SAVWIPL) ने चाकण, पुणे येथील अत्याधुनिक उत्पादन सुविधेत स्थानिक पातळीवर 500000 इंजिन्सचे उत्पादन करून आपल्या उत्पादनक्षमतामध्ये मोठी प्रगती केली आहे. या उपक्रमातून देशातील आणि जागतिक बाजारपेठांसाठी पॉवरट्रेन सोल्यूशन्सचा पुरवठा केला जात आहे. यामुळे स्कोडा आणि फॉक्सवॅगन ग्रुपच्या उत्पादन क्षमतेत वाढ झाली आहे आणि ‘मेक इन इंडिया’ अभियानाला प्रोत्साहन मिळालं आहे. या उपक्रमाने भारतात कार निर्मितीच्या क्षेत्रात नव्या मानकांची स्थापना केली असून, भारतीय बाजारपेठेत स्थानिक उत्पादनाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली आहे.
Mercedes-Benz लाँच करणार नवीन कार; असेल स्पोर्ट्स आणि लक्झरीचा मिलाफ
हा महत्त्वाचा टप्पा फॉक्सवॅगन समूहासाठीचा मुख्य उत्पादक म्हणून भारताची स्थिती मजबूत करतो. शाश्वत उत्पादन आणि तांत्रिक प्रगतीवर भर देत, कंपनी नवनवे उच्चांक गाठत आहे.
या महत्त्वाच्या टप्प्याविषयी बोलताना अँड्रियाज डिक, स्कोडा ऑटो ए. एस. बोर्ड मेंबर फॉर प्रॉडक्शन अँड लॉजिस्टिक्स म्हणाले, “आमच्या पुणे येथील सुविधेत 500000 इंजिने बनविणे ही एक लक्षणीय सिद्धी आहे. यामुळे आमच्या जागतिक उत्पादन नेटवर्कमध्ये भारताची भूमिका अधिक मजबूत झाली आहे. टेक्नॉलॉजी आणि कार्यबल विकास यामध्ये आम्ही केलेल्या गुंतवणुकीमुळे आमची उत्पादन क्षमता वाढत आहे आणि दर्जेदार आणि किफायतशिर पॉवरट्रेन्सचे उत्पादन होत आहे. भारतातील प्रगत उत्पादन ईकोसिस्टम आणि कुशल कार्यबल यांची दर्जेदार आणि कार्यक्षम पॉवरट्रेन सोल्यूशन्स द्वारे जागतिक मागणी पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका आहे. आम्ही प्राप्त केलेल्या या सिद्धीमुळे या समूहाच्या आंतरराष्ट्रीय संचालनाला आणि भावी विकासाला समर्थन देण्याच्या भारताच्या क्षमतेमधील आमचा विश्वास दृढावला आहे.”
Kia Syros Vs Mahindra XUV 3XO: फीचर्स, इंजिन आणि किमतीच्या बाबतीत कोणत्या एसयूव्हीचा पगडा भारी
स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनिजिंग डायरेक्टर आणि सीईओ पियुष अरोरा म्हणाले, “ही गोष्ट पॉवरट्रेन उत्पादनात लोकलाईझेशन आणि इनोव्हेशन प्रती असलेली आमची वचनबद्धता अधोरेखित करते. 2014 पासून आम्ही एक मजबूत पाया घातला आहे आणि त्याच्या जोरावर आम्ही मार्केटच्या गरजा जागतिक दर्जाच्या इंजिन्सद्वारे पूर्ण करत आहोत. आमच्या मेड-इन-इंडिया इंजिन्समध्ये असलेल्या उच्च स्तराच्या लोकलाईझेशनमधून भारतीय ऑटोमोटिव्ह उत्पादन आणि पुरवठा ईकोसिस्टम मजबूत करण्यासाठी या ग्रुपचे स्थानिक स्रोतांचा वापर करण्याचे धोरण आणि योगदान दिसून येते. आमच्या क्षमता वाढवण्यासाठी आणि जागतिक-दर्जाच्या ऑटोमोटिव्ह उत्पादनासाठीचे केंद्र म्हणून भारताचे स्थान मजबूत करण्यासाठी गुंतवणूक करण्याचे आम्ही चालू ठेवणार आहोत.”