
EV मालकांनो आता चार्जिंगचे टेन्शन विसरा ! 'या' महामार्गावर TATA.ev मेगाचार्जर सुरू
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. ग्राहक देखील या इलेक्ट्रिक वाहनांना उत्तम प्रतिसाद देताना दिसत आहे. त्याचसोबत सरकार देखील Evs च्या विक्रीबाबत नागिरकांना प्रोत्साहन देत आहे. भारतात इलेक्ट्रिक कार्स उत्पादित करण्यात टाटा मोटर्सचा मोठा वाटा आहे. पण EV ऑफर करण्यासोबतच कंपनी चार्जींग नेटवर्कवर सुद्धा लक्ष केंद्रित करत आहे. आता लवकरच पुणे-नाशिक महामार्गावर नवीन मेगाचार्जर सुरु होणार आहे.
भारताच्या इव्ही क्रांतीत अग्रणी भूमिका बजावणाऱ्या आणि देशातील सर्वात मोठा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक असलेल्या टाटा.इव्ही ने आज पुणे-नाशिक महामार्गावरील आकाश मिसळ हाऊस येथे आपला टाटा.इव्ही मेगाचार्जर सुरू करून इव्ही चार्जिंग सुविधांच्या बळकटीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
मार्केट गाजवण्यासाठी Honda Rebel 500 झाली लाँच, लूक असा की पाहतच राहाल
फेब्रुवारी 2025 मध्ये टाटा.इव्ही ने Open Collaboration 2.0 या फ्रेमवर्क अंतर्गत 2027 पर्यंत देशभरातील चार्जिंग पायाभूत सुविधांची संख्या दुप्पट करून 4 लाख चार्जिंग पॉइंट्सपर्यंत वाढविण्याचा संकल्प केला होता. आजचे हे उद्घाटन त्याच दीर्घकालीन दृष्टिकोनाचा एक भाग आहे.
इव्ही वापरकर्त्यांच्या दृष्टीने सहज प्रवेशयोग्यता, जलद चार्जिंग आणि विश्वासार्हता या प्राथमिक गरजा लक्षात घेऊन टाटा.इव्ही ने चार्जझोन सोबत भागीदारी करून देशभरात उच्च-गतीचे, को-ब्रॅंडेड टाटा.इव्ही मेगाचार्जर नेटवर्क उभारण्यास सुरुवात केली आहे. हे चार्जर सर्व इलेक्ट्रिक वाहनांसाठी खुले असले तरी टाटा.इव्ही वापरकर्त्यांना खास लाभ दिले जातील – जसे की चार्जिंग पॉइंटवर प्राधान्याने प्रवेश आणि 25% पर्यंत चार्जिंग दरांमध्ये सवलत.
आकाश मिसळ हाऊस हे स्थान पुण्यापासून 60 किमी आणि नाशिकपासून 160 किमी अंतरावर असून, हा महामार्गावरील एक महत्त्वाचा विश्रांती बिंदू असणार आहे. 120 केडब्ल्यू क्षमतेचा मेगाचार्जर, 4 समर्पित पार्किंग बेसह, जलद आणि कार्यक्षम सेवा पुरवतो. या ठिकाणी प्रवाशांना स्थानिक चविष्ट मिसळ पावसह स्वच्छ स्वच्छतागृहे आणि आरामदायक बैठक व्यवस्थाही उपलब्ध आहे – त्यामुळे वाहनासोबतच प्रवाशांचा अनुभवही ‘रीचार्ज’ होतो.
फक्त भारतात नाही तर जगभरात EVs चा डंका ! येत्या काळात पेट्रोल-डिझेलच्या कार नाहीसे होणार?
या प्रसंगी, टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि. आणि टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लि. चे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर बालाजी राजन म्हणाले, “पुणे-नाशिक महामार्गावर हे मेगाचार्जिंग स्टेशन सुरू झाल्याने या मार्गावरील चार्जिंग सुविधा अधिक विश्वासार्ह झाल्या आहेत. ही सुविधा केवळ ऊर्जा पुरवठाच करत नाही, तर प्रवाशांना आरामदायक अनुभव आणि स्थानिक संस्कृतीचीही झलक देते.”
चार्जझोनचे सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर कार्तिकेय हरियाणी म्हणाले, “टाटा.इव्ही सोबत भागीदारी करून एनएच48 वर पहिले को-ब्रॅंडेड सुपरचार्जिंग स्टेशन सुरू करताना आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही एक आधुनिक, नाविन्यपूर्ण ईव्ही इकोसिस्टम उभारत आहोत जी ऑटो चार्ज, RFID टॅप अँड चार्ज सारख्या सुविधांना समर्थन देते, आणि भविष्यातील मोबिलिटीच्या गरजा पूर्ण करू शकते.”