फोटो सौजन्य: Pinterest
स्कोडाकडून भारतीय बाजारात अनेक उत्कृष्ट कार्स ऑफर करण्यात आल्या आहेत. Skoda Kylaq तर कंपनीची लोकप्रिय कार. जर तुम्ही या SUV चा बेस मॅन्युअल व्हेरिएंट, Classic खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 2 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला दरमहा किती EMI भरावा लागू शकतो? याबद्दल जाणून घेऊयात.
झी टीव्हीच्या आयडियाबाज स्टार्टअप रिॲलिटी शोमध्ये Oben Electric ची यशोगाथा सादर
स्कोडा कायलॅकचा बेस व्हेरिएंट म्हणून Classic Manual ऑफर करते. या एसयूव्हीचा बेस व्हेरिएंट 7.59 लाखांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. जर तुम्ही ही खरेदी केली तर 7.59 लाखांच्या एक्स-शोरूम किमतीत रेजिस्ट्रेशन टॅक्स आणि आरटीओ शुल्क देखील समाविष्ट असेल. हे वाहन खरेदी करण्यासाठी, तुम्हाला RTO साठी 53000 आणि इंश्युरन्ससाठी 34000 द्यावे लागतील. यामुळे दिल्लीमध्ये वाहनाची ऑन-रोड किंमत 8.55 लाखांवर जाते.
जर तुम्ही Skoda Kylaq च्या मॅन्युअलमधील बेस व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर बँककडून या कारसाठी एक्स-शोरूम किमतीवरच कर्जाची सुविधा दिली जाईल. अशा परिस्थितीत 2 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर उर्वरित रक्कम सुमारे 6.55 लाख रुपये तुम्हाला बँकेकडून कर्जाच्या रूपात घ्यावे लागतील. बँकेने ही रक्कम 9 टक्के व्याजदराने आणि 7 वर्षांच्या कालावधीसाठी मंजूर केल्यास, पुढील सात वर्षांसाठी तुम्हाला दरमहा 10,548 रुपयांचा EMI भरावा लागेल.
राजकीय नेत्यांची आवडती SUV महागली! नवीन वर्षात किंमत 74000 रुपयांनी वाढली
जर तुम्ही 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी 6.55 लाख रुपयांचे कार लोन घेतले, तर सात वर्षांत दरमहा 10,548 रुपयांचा EMI भरावी लागेल. या कालावधीत Skoda Kylaq च्या Classic Manual व्हेरिएंटसाठी तुम्हाला सुमारे 2.30 लाख रुपयांचा व्याज द्यावा लागेल. त्यामुळे एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज मिळून या कारची एकूण किंमत सुमारे 10.86 लाख रुपये इतकी होईल.






