627 KM रेंजसह दमदार फीचर्स ! अखेर भारतात Tata Harrier EV झाली लाँच
अखेर टाटाने आपली दमदार ईव्ही टाटा ईव्ही भारतीय मार्केटमध्ये लाँच केली आहे. ही इलेक्ट्रिक कार तब्बल 627 km ची रेंज देणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
भारतीय मार्केटमध्ये ईव्हीची वाढती क्रेझ अनेक ऑटो कंपन्यांना नवनवीन EVs मार्केटमध्ये लाँच करण्याबाबत प्रोत्साहित करीत आहे. सध्या भारतीय बाजारात EVs ऑफर करणाऱ्या अनेक ऑटो कंपन्या आहेत. टाटा मोटर्स ही त्यातीलच एक आघाडीची कार उत्पादक कंपनी. नुकतेच कंपनीने मार्केटमध्ये Tata Harrier EV
लाँच केली आहे.
टाटा मोटर्सने भारतीय बाजारात नवीन एसयूव्ही म्हणून टाटा हॅरियर ईव्ही लाँच केली आहे. या एसयूव्हीमध्ये कंपनीने कोणत्या प्रकारचे फीचर्स दिले आहेत? ही एसयूव्ही किती किमतीत खरेदी करता येणार आहे? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
कंपनीने या एसयूव्हीमध्ये अनेक उत्तम फीचर्स दिले आहेत, यासोबतच, ही एसयूव्ही मोठ्या रेंजसह लाँच करण्यात आली आहे. ही एसयूव्ही नवीन प्लॅटफॉर्म Actiev + सह तयार करण्यात आली आहे.
एसयूव्हीमधील बॅटरी दोन पर्यायांसह आणण्यात आली आहे. त्यात 65 आणि 75 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरीचा पर्याय आहे. जे तिला 627 किमी पर्यंतची रेंज देते. 120 किलोवॅट फास्ट चार्जिंगसह ही एसयूव्ही 20 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी 25 मिनिटे लागतात. 15 मिनिटांच्या फास्ट चार्जिंगमुळे 250 किमीची रेंज मिळते.
एसयूव्हीमध्ये ड्युअल मोटर देण्यात आली आहे. जे या कारला 238 पीएसची पॉवर आणि 504 न्यूटन मीटरचा टॉर्क देते. एसयूव्हीच्या दोन्ही बॅटरीमध्ये अॅडव्हान्स कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे, जे बॅटरीचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करते. एसयूव्ही 6.3 सेकंदात 0-100 किमीचा वेग गाठू शकते.
एसयूव्हीमध्ये अल्ट्रा ग्लाइड सस्पेंशन देण्यात आले आहे, ज्यामुळे खराब रस्त्यांवरही ही एसयूव्ही सुरळीत चालते. तसेच, त्यात QWD तंत्रज्ञान देण्यात आले आहे, जेणेकरून ती कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर चालवता येईल.
टाटा हॅरियर ईव्हीमध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात आली आहेत. त्यात ड्युअल टोन इंटिरिअर देण्यात आले आहेत. यासोबतच, यात पॅनोरॅमिक सनरूफ, 36.9 सेमी क्यूएलईडी इन्फोटेनमेंट सिस्टम, ड्युअल झोन टेम्परेचर मोड्स, अँबियंट लाइट्स, ऑटो पार्क सिस्टम, कीलेस एंट्री, फोन अॅक्सेस एंट्री, 540 डिग्री सराउंड व्ह्यू सिस्टम, ई-आयआरव्हीएम, जेबीएल ऑडिओ सिस्टम, अँड्रॉइड ऑटो, कार प्ले, 6 टेरेन मोड्स नॉर्मल, मड, रॉक क्रॉल, सँड, स्नो/ग्रास आणि कस्टम मोड्स, 22 सेफ्टी फीचर्ससह लेव्हल-2 एडीएएस, आणि अनेक उत्तम फीचर्स मिळतात.
ही एसयूव्ही चार रंगांच्या ऑप्शन्समध्ये देण्यात आले आहे. यासोबतच, स्टील्थ एडिशन देखील लाँच करण्यात आली आहे. टाटा हॅरियर ईव्ही भारतीय बाजारात 21.49 लाख रुपयांच्या इंट्रोडक्टरी एक्स-शोरूम किमतीत लाँच करण्यात आली आहे. एसयूव्हीच्या बॅटरीवर लाइफटाइम किलोमीटर वॉरंटी देण्यात आली आहे. या कारचे बुकिंग 2 जुलै 2025 पासून सुरू होईल.