फोटो सौजन्य: @utsavtechie (X.com)
पूर्वी भारतीय रस्त्यांवर इंधनावर चालणाऱ्या कार्स मोठ्या प्रमाणात दिसत असत. मात्र आज त्याच रस्त्यांवर इलेक्ट्रिक वाहनं वेगाने धावताना दिसतात. यावरून स्पष्ट होते की भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांना जोरदार प्रतिसाद मिळतो आहे. वाढती इंधन किंमत, पर्यावरणाची गरज आणि शासकीय प्रोत्साहन यामुळे ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे.
भारतातील अनेक ऑटोमोबाईल कंपन्या आता उत्कृष्ट इलेक्ट्रिक कार्स उपलब्ध करून देत आहेत. या क्षेत्रात टाटा मोटर्सने आपले खास स्थान निर्माण केले आहे. टाटाच्या नेक्सॉन ईव्ही, टिगोर ईव्ही आणि पंच ईव्ही यांसारख्या कार्सना ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे टाटा मोटर्स ही मार्केटमधील आघाडीची कंपनी ठरली आहे.
Tata Safari Dark Edition क्षणार्धात होईल तुमची ! फक्त असा असेल EMI चा संपूर्ण हिशोब
टाटा मोटर्सने देशात अनेक उत्तम कार्सचे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच केले आहेत, ज्याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आता कंपनी त्यांच्या एसयूव्ही TATA Harrier चा इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करणार आहे. भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये Tata Harrier EV प्रदर्शित करण्यात आली होती. एका वृत्तपत्रात झालेल्या बातमीनुसार, हॅरियर ईव्ही 3 जून रोजी बाजारात लाँच होणार आहे. बाजारात, हॅरियर ईव्ही महिंद्रा XEV 9e सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करेल. या ईव्हीची संभाव्य फीचर्स, पॉवरट्रेन आणि किंमत याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.
डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर, हॅरियर ईव्ही मल्टी-लिंक सस्पेंशनने सुसज्ज आहे. तर या EV मध्ये बंद फ्रंट ग्रिल आहे. सर्वात लक्षणीय अपडेट म्हणजे खालच्या बंपरवरील व्हर्टिकल स्लॅट्स. दुसरीकडे, फीचर्सच्या बाबतीत, EV मध्ये 12.3-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25 -इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि कनेक्टेड कार तंत्रज्ञान असेल. याशिवाय, ADAS L2+ सारखे सेफ्टी फीचर्स देखील EV मध्ये असतील.
इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये Royal Enfield ची एंट्री होणार ! ‘या’ महिन्यात लाँच होण्याची दाट शक्यता
जर आपण या कारच्या पॉवरट्रेनबद्दल बोललो तर, टाटा हॅरियर ईव्हीमध्ये 75 किलोवॅट प्रति तास लिथियम आयन बॅटरी वापरली जाईल, जी फास्ट चार्जिंगसाठी उत्तमरीत्या चार्जिंगला देखील सपोर्ट करेल. याशिवाय, एसयूव्हीमध्ये एक लहान बॅटरी युनिट देखील असेल. हॅरियर ईव्हीमध्ये ड्युअल-मोटर ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टम असेल ज्यामध्ये दोन्ही एक्सलवर मोटर्स बसवल्या जातील. ही हॅरियर ईव्ही पूर्णपणे चार्ज केल्यावर ग्राहकांना 500 किलोमीटरपेक्षा जास्त ड्रायव्हिंग रेंज मिळू शकते.