फोटो सौजन्य: @MotorOctane (X.com)
भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत. टाटा मोटर्स ही त्यातीलच एक कंपनी. टाटाने भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात विविध सेगमेंट कार ऑफर केल्या आहेत. Tata Safari ही त्यातीलच एक भन्नाट कार आहे. या कारच्या डार्क एडिशनने तर ग्राहकांना भुरळ घातली आहे.
कंपनी मार्केटमध्ये सात सीटर एसयूव्ही टाटा सफारी विकते. जर तुम्हीही त्याचे डार्क एडिशन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 5 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्ही दरमहा किती EMI भरून ही दमदार कार घरी आणू शकता. त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात. पण त्यापूर्वी या कारची किंमत जाणून घेऊयात.
टाटा सफारीची डार्क एडिशन टाटा एसयूव्ही सेगमेंटमध्ये ऑफर करते. या व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 19.65 लाख रुपये आहे. जर तुम्ही ही कार राजधानी दिल्लीमध्ये खरेदी केली तर, 19.65 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीव्यतिरिक्त, तुम्हाला आरटीओसाठी सुमारे 1.99 लाख रुपये आणि विम्यासाठी सुमारे 87 हजार रुपये द्यावे लागतील. याशिवाय, 19649 रुपये टीसीएस शुल्क देखील भरावे लागेल. त्यानंतर या एसयूव्हीची ऑन-रोड किंमत 22.71 लाख रुपये होईल.
‘या’ नव्या बदलांसह Suzuki Access मार्केटमध्ये लाँच, किंमत फक्त…
जर तुम्ही या कारचे डार्क एडिशन खरेदी केली तर बँक फक्त तुम्हाला एक्स-शोरूम किमतीवरच फायनान्स करेल. अशा परिस्थितीत, 5 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 17.71 लाख रुपयांचे फायनान्स करावे लागेल. जर बँक तुम्हाला सात वर्षांसाठी 9% व्याजदराने 17.71 लाख रुपये देत असेल, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी दरमहा फक्त 28498 रुपये ईएमआय भरावा लागेल.
जर तुम्ही बँकेकडून नऊ टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 17.71 लाख रुपयांचे कार लोन घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी दरमहा 28498 रुपये ईएमआय भरावा लागेल. अशा परिस्थितीत, सात वर्षांत तुम्हाला टाटा सफारीसाठी सुमारे 6.22 लाख रुपये व्याज द्यावे लागेल. त्यानंतर कारची एक्स-शोरूम, ऑन रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 28.93 लाख रुपये होईल.
Yamaha : ‘या’ बाईक आणि स्कूटरना मिळणार १० वर्षांची वॉरंटी, कंपनीने आणली शानदार ऑफर
सफारी ही टाटाने सात-सीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये आणली आहे. ही कार अनेक उत्तम फीचर्ससह सेफ्टी फीचर्स देखील ऑफर करते. ही कार JSW MG Hector Plus, Mahindra Scorpio N, Mahindra XUV 700 सारख्या SUV शी थेट स्पर्धा करते.