Tata Motors कडून 'या' वाहनांवर आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बोनान्झाची घोषणा
Tata Motors ही भारतातील सर्वात मोठी कमर्शियल व्हेईकल उत्पादक कंपनी आहे. नुकतेच कंपनीने आपल्या स्मॉल कमर्शियल व्हेईकल (SCV) आणि पिक-अप (PU) ग्राहकांसाठी या फेस्टिव्ह सिझनमध्ये एक भव्य बोनान्झा घेऊन आली आहे. तसेच जीएसटी दरकपातीचा फायदा ग्राहकांना थेट मिळावा यासाठी कंपनीने आधीच महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. त्यात भर घालत, टाटा मोटर्सने आता ‘इस त्योहार पे उपहार’ नावाची मोहिम जाहीर केली आहे, ज्यामुळे ग्राहकांसाठी खरेदीचा आनंद अधिकच वाढणार आहे.
या विशेष मोहिमेअंतर्गत, टाटा मोटर्स आपल्या लोकप्रिय ब्रँड्स Ace, Ace Pro, Intra आणि Yodha च्या डिझेल, पेट्रोल आणि बाय-फ्युएल व्हेरिएंट्सवर आकर्षक ऑफर्स देत आहे. प्रत्येक खरेदीसोबत ग्राहकांना थेट 32-इंच LED टीव्ही तसेच जवळपास ₹65,000 किमतीचे अतिरिक्त फायदे दिले जाणार आहेत. ही ऑफर 22 सप्टेंबर 2025 पर्यंत केलेल्या बुकिंग्जवर लागू असून, वाहनांची डिलिव्हरी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत केली जाईल.
20 Km चा मायलेज आणि ADAS सेफ्टी फिचर असणाऱ्या ‘या’ कारवर वर 2.25 लाखाची सूट
या बोनान्झामध्ये सर्वात मोठे आकर्षण म्हणजे नुकतेच बाजारात लाँच केलेले Ace Pro. हे वाहन आता फक्त 3.67 लाख (एक्स-शोरूम) च्या सुरूवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. या किंमत कपातीमुळे आणि ऑफर्समुळे उद्योजक आणि लघु व्यवसायिकांसाठी टाटा मोटर्सची विश्वसनीय वाहने खरेदी करणे किंवा व्यवसाय विस्तारासाठी नवी वाहने घेणे अधिकच सोपे झाले आहे.
टाटा मोटर्सने आपल्या SCV आणि पिकअप सेगमेंटमध्ये कायमच ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. मजबूत इंजिन, विश्वासार्ह परफॉर्मन्स कमी मेंटेनन्स कॉस्ट आणि हाय मायलेज यामुळे ही वाहने ग्रामीण तसेच शहरी भागातील लाखो उद्योजकांची पहिली पसंती ठरली आहेत. आता उपलब्ध होणाऱ्या ऑफर्समुळे ही वाहने ग्राहकांना अधिक परवडणारी ठरणार आहेत.
Anime लव्हर्स, Suzuki Avenis चा Naruto एडिशन पाहिलात का? कलर कॉम्बिनेशन तर एकदमच भारी
कंपनीच्या मते, जीएसटी कपात आणि या अतिरिक्त ऑफर्समुळे केवळ ग्राहकांना फायदा होणार नाही, तर देशातील लघु व्यवसाय, ई-कॉमर्स, लॉजिस्टिक्स आणि ग्रामीण वाहतूक क्षेत्रातही नवे संधी निर्माण होतील.
टाटा मोटर्सने ग्राहकांना आवाहन केले आहे की, आपल्या पसंतीच्या व्हेरिएंटची अचूक किंमत अधिकृत टाटा मोटर्स शोरूममध्ये जाऊन निश्चित करावी आणि ऑफर कालावधीदरम्यान लवकर बुकिंग करून वेळेत डिलिव्हरी घ्यावी.