फोटो सौजन्य: @Kia_Worldwide/X.com
भारतीय बाजारात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार दमदार कार ऑफर करत असतात. अशीच एक कंपनी म्हणजे किया मोटर्स. कंपनीची Kia Seltos ही भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कॉम्पॅक्ट SUVs पैकी एक आहे. आता कंपनीने या पॉप्युलर कारवर खास ऑफर जाहीर केली आहे. जर आपण या महिन्यात नवी Seltos खरेदी केली, तर 22 सप्टेंबर 2025 पूर्वी तुम्हाला 2.25 लाखांपर्यंत बचत होऊ शकते. हे डिस्काउंट वेगवेगळ्या राज्यांनुसार बदलू शकते, पण ग्राहकांना एकूणच मोठा फायदा मिळत आहे. चला या कारच्या इतर गोष्टींबद्दल जाणून घेऊयात.
Kia Seltos त्याच्या प्रीमियम आणि बोल्ड डिझाइनसाठी ओळखली जाते. यात Tiger Nose Grille आणि Star Map LED DRL दिले आहेत, ज्यामुळे फ्रंट लुक आणखी आकर्षक दिसतो. Flat Bonnet, Quad-Barrel LED Headlamps आणि Vertical DRL तिच्या स्पोर्टी स्टाईलला खास बनवतात. साइड प्रोफाइलमध्ये Black Alloy Wheels आणि Chrome Detailing SUV ला शार्प लुक देतात, तर मागील बाजूस Connected LED Tail Lamps आणि Dual Sport Exhaust Tips याची प्रीमियम ओळख वाढवतात.
Kia Seltos चे केबिन अतिशय प्रीमियम आहे. यात 12.3-इंच Infotainment Screen आणि 12.3-inch Instrument Cluster एकत्र मिळून पॅनोरॅमिक डिस्प्लेसारखे दिसतात. याशिवाय 5-इंच टचस्क्रीन क्लायमेट कंट्रोल, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, Power Adjustable Driver Seat, Wireless Android Auto आणि Apple CarPlay सारखे फीचर्स मिळतात. सर्वात खास म्हणजे यातील Panoramic Sunroof, जे केबिनला ओपन आणि प्रीमियम फील देते.
ही SUV फीचर्सच्या बाबतीत अग्रेसर आहे. यामध्ये 26 इंचाचा मोठा एचडी टचस्क्रीन नेव्हिगेशन, 20-इंचाचा हेड-अप डिस्प्ले आणि 360° कॅमेरा यासारख्या प्रगत फीचर्सचा समावेश आहे. याशिवाय, किआ कनेक्ट ॲप, ओटीए अपडेट्स, स्मार्ट प्युअर एअर प्युरिफायर, वायरलेस चार्जिंग आणि बोसची 8-स्पीकर साउंड सिस्टम ड्रायव्हिंगचा अनुभव आणखी चांगला बनवते.
Kia Seltos सेफ्टीच्या दृष्टीने विश्वासार्ह आहे. यात ADAS 2.0 पॅकेजसह 6 एअरबॅग्ज, ABS, EBD, हिल स्टार्ट असिस्ट आणि व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट यासारख्या मूलभूत फीचर्सचा समावेश आहे. या पॅकेजमध्ये लेन कीप असिस्ट, अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग सारख्या 19 प्रगत सेफ्टी फीचर्सचा समावेश आहे.
Kia Seltos तीन इंजिन पर्यायांसह येते – 1.5 लिटर पेट्रोल, 1.5 लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल. पेट्रोल इंजिन 17 ते 17.9 किमी/लीटर मायलेज देते, तर डिझेल इंजिन 20.7 किमी/लीटर पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे. यात मॅन्युअल, सीव्हीटी ऑटोमॅटिक, आयएमटी आणि डीसीटी गिअरबॉक्स पर्याय आहेत, जे प्रत्येक प्रकारच्या ड्रायव्हरसाठी तयार करण्यात आले आहे.