
Tata Motors Car Sales in August 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
पेट्रोल असो, डिझेल असो, CNG असो किंवा इलेक्ट्रिक, प्रत्येक प्रकारात टाटाच्या गाड्या आहेत जे नागरिकांच्या पसंतीस पडत आहे. कंपनीने गेल्या काही वर्षात आपल्या गाड्यांमध्ये खूप सुधारणा केली, सेफ्टी वाढवली, फीचर्स दिले आणि त्याचाच परिणाम आता विक्रीत दिसत आहे.
ऑगस्ट महिन्यात टाटाने 16 हजारांपेक्षा जास्त इलेक्ट्रिक गाड्या विकल्या. विचार करा, एकूण विक्रीपैकी 25 टक्के वाटा हा फक्त इलेक्ट्रिक गाड्यांचा होता. प्रत्येक चार गाड्यांमागे एक गाडी इलेक्ट्रिक विकली जात आहे. टाटा पंच EV आणि नेक्सॉन EV या दोन गाड्यांना लोकांनी डोक्यावर घेतलं आहे. जास्त रेंज, 5 स्टार सेफ्टी आणि सगळीकडे चार्जिंग स्टेशन मिळत असल्यामुळे लोक आता पेट्रोल-डिझेल सोडून इलेक्ट्रिककडे वळत आहेत. Tata Motors Car Sales in August 2026:
EV सोबतच CNG गाड्यांची पण जोरदार मागणी आहे. टाटाच्या एकूण विक्रीमध्ये CNG गाड्यांचा वाटा 28 टक्के आहे. टाटा टियागो, टिगोर, पंच आणि अल्ट्रोज या गाड्यांमध्ये CNG पर्याय आहे. या गाड्यांची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे यात डिक्कीची जागा कमी होत नाही. टाटाने दोन सिलेंडरची टेक्नॉलॉजी आणली आहे त्यामुळे बूट स्पेस तसाच राहतो. शिवाय या CNG गाड्यांमध्ये ऑटोमॅटिक गिअरचा पण पर्याय दिला आहे, जो दुसऱ्या कोणत्याच कंपनीकडे नाही.
टाटा पंच आणि नेक्सॉन या दोन गाड्या टाटाच्या हिरो आहेत. पंच तर सगळ्यात जास्त विकली जाणारी SUV बनली आहे. तिचा रोड प्रेझेन्स, मोठी ग्राउंड क्लिअरन्स आणि कमी किंमत यामुळे लोक तिला पसंत करतात.दुसरीकडे टाटा कर्व्ह या नवीन गाडीला पण लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. तिचा लूक एकदम वेगळा आहे आणि त्यामुळे तरुण वर्ग तिच्याकडे आकर्षित होत आहे.
फोक्सवॅगन डुकाटीला पोर्टफोलिओमधून बाहेरचा रस्ता दाखवणार? कंपनीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह
टाटा मोटर्स इथेच थांबणार नाही. कंपनी येत्या काळात अजून नवीन गाड्या आणणार आहे. खासकरून इलेक्ट्रिक आणि CNG वरच त्यांचा जास्त फोकस असणार आहे. कंपनीला वाटतंय की, सेफ्टी, कमी मेंटेनन्स आणि नवीन मॉडेल्समुळे दिवाळीच्या सणासुदीच्या काळात विक्री अजून वाढेल. सध्या तरी टाटाने मारुतीला जोरदार टक्कर दिली आहे आणि ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे.एक काळ होता जेव्हा टाटाच्या गाड्यांना कोणी विचारत नव्हतं, पण आज परिस्थिती पूर्ण बदलली आहे. लोक अभिमानाने सांगतात की आमची गाडी टाटाची आहे.