Honda Car Sales in August 2026: Maruti Dzireची ‘ही’ प्रतिस्पर्धी कार अचानक झाली हिट (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Honda India Sales Report: होंडा कंपनीसाठी गेल्या महिन्याचा म्हणजे ऑगस्टचा काळ खूप चांगला गेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या गाड्यांच्या विक्रीत तब्बल 40 टक्के वाढ झाली आहे. या वाढीमागचं सर्वात मोठं कारण म्हणजे होंडा Amaze आहे. ही गाडी सर्वात स्वस्त गाडी असल्याने लोक तिला खूप पसंत आहे.
होंडा कार्स इंडियाने ऑगस्टमध्ये एकूण 5,385 गाड्या विकल्या. गेल्या वर्षी ऑगस्ट 2025 मध्ये हा आकडा फक्त 3,850 होता त्याने थेट 40 टक्के वाढ. हे होंडासाठी खूप मोठं यश आहे. पण जर जुलै महिन्याशी तुलना केली तर थोडा फरक आहे. जुलै 2026 मध्ये कंपनीने 6,014 गाड्या विकल्या होत्या. त्यामानाने ऑगस्टमध्ये 10 टक्के घट असून सध्या होंडाकडे Amaze, Elevate, City आणि ZR-V अशा चार गाड्या आहेत. Honda Car Sales in August 2026:
सगळ्यात जास्त विकलेली ही Amaze गाडी आहे. होंडाची ही लाडकी गाडी ऑगस्टमध्ये 3,512 लोकांनी विकत घेतली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 100 टक्के वाढ झाली असून म्हणजे दुप्पट विक्री. जुलैमध्ये Amaze च्या 3,436 गाड्या विकल्या होत्या, त्यामानाने ऑगस्टमध्ये 2 टक्के वाढ झाली.
दुसरीकडे होंडा Elevate ची विक्री थोडी कमी झाली आहे. ऑगस्टमध्ये Elevate चे फक्त 1,326 युनिट विकले गेले. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये 20 टक्के म्हणजेच 1,660 गाड्या विकल्या होत्या. जुलैमध्ये तर 1,949 गाड्या विकल्या होत्या, त्यामानाने गेल्या महिन्यात 32 टक्के घट झाली.
फोक्सवॅगन डुकाटीला पोर्टफोलिओमधून बाहेरचा रस्ता दाखवणार? कंपनीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह
होंडा City बद्दल बोलायचं तर ऑगस्टमध्ये फक्त 514 गाड्या विकल्या गेल्या. आणि होंडाची सगळ्यात महागडी गाडी ZR-V, तिचे फक्त 33 युनिट विकले गेले. City चं नवीन मॉडेल नुकतंच आलंय आणि ZR-V ही तर बाहेरून आणलेली CBU गाडी आहे, त्यामुळे ती महाग आहे.
Amaze ही 4 मीटरपेक्षा लहान सेडान आहे. तिची थेट टक्कर मारुती Dzire शी आहे. तिची किंमत 7.65 लाख रुपयांपासून सुरु होते, त्यामुळे मध्यमवर्गीय लोकांना ती परवडते.या गाडीला सेफ्टीसाठी 5 स्टार रेटिंग मिळालं आहे, जी खूप मोठी गोष्ट आहे. यात 1.2 लिटरचं पेट्रोल इंजिन आहे जे 89 BHP पॉवर देतं. मायलेज पण चांगलं आहे, कंपनी म्हणते की ती 19.46 किलोमीटर प्रति लिटर धावते.
यात 416 लिटरची मोठी डिकी आहे आणि 172 mm ग्राउंड क्लिअरन्स आहे. त्यामुळे खड्ड्यात पण गाडी सहज चालते. यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही पर्याय आहेत आणि कंपनी CNG चा पर्याय पण देते. एकंदरीत बघायचं तर होंडाला Amaze ने तारलं आहे. स्वस्त किंमत, चांगलं मायलेज आणि 5 स्टार सेफ्टी, यामुळेच लोक Amaze ला पसंती देत आहेत.






