Bauma Conexpo 2024 मध्ये टाटा मोटर्स अग्रस्थानी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे केले अनावरण
भारत टाटा मोटर्स देशात अनेक उत्तोमोत्तम कार्स लाँच करत असतात. आता कंपनी इलेक्ट्रिक वाहनांवर आपले लक्ष केंद्रित करत आहे. तसेच आपल्या सर्व कार्समध्ये उत्तम सेफ्टी देखील प्रदान करताना दिसत आहे. नुकतेच कंपनीने आपले पुढील अत्याधुनिक व्हिजन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून Bauma Conexpo 2024 सादर केले आहे.
टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक आणि गतीशीलता सोल्यूशन्स प्रदाता कंपनीने बाऊमा कॉनएक्स्पो २०२४ येथे प्रगत अॅग्रीगेट्सची सर्वसमावेशक श्रेणी दाखवली आहे. यामध्ये २५ केव्हीए ते १२५ केव्हीए पॉवर रेंजमध्ये उपलब्ध असलेले सीपीसीबी IV+ प्रमाणित टाटा मोटर्स जेनसेट्स, ५५-१३८ एचपी पॉवर नोड्सपर्यंतचे सीईव्ही बीएस-५ उत्सर्जन-प्रमाणणित इंडस्ट्रीयल इंजिन्स, लाइव्ह अॅक्सल्स व ट्रेलर अॅक्सल्स आणि कम्पोनण्ट्सचा समावेश होता. मटेरिअल हाताळणी, बांधकाम उपकरण, औद्योगिक उपयोजन व लॉजिस्टिक्स विभागांच्या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्यासाठी सोल्यूशन्स डिझाइन करण्यात आले आहेत, तसेच उच्च कार्यक्षमता व टिकाऊपणासाठी निर्माण करण्यात आले आहेत.
लाँच झाल्याच्या अल्पावधीतच ‘ही’ कार ठरली सुपरहिट! विकल्या 94000 पेक्षा जास्त युनिट्स
बाऊमा कॉनएक्स्पो 2024 येथे टाटा मोटर्स पॅव्हिलियनचे उद्धाटन करत टाटा मोटर्स कमर्शियल व्हेइकल्सचा स्पेअर्स अँड नॉन-वेईकुलर बिझनेसचे प्रमुख विक्रम अग्रवाल म्हणाले, “बाऊमा कॉनएक्स्पो शक्तिशाली व विश्वसनीय तंत्रज्ञानांचा शोध घेणाऱ्या ग्राहकांसाठी टाटा मोटर्स अॅग्रीगेट्स सादर करण्याकरिता परिपूर्ण प्लॅटफॉर्म आहे. हे नवीन अॅग्रीगेट्स ग्राहकांचा प्रत्यक्ष आवाज आहेत, जे व्यापक ग्राहक अभिप्रायांनंतर विकसित करण्यात आले आहेत. आम्ही भारतातील सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्यासाठी आमचा पोर्टफोलिओ वाढवत आहोत, जेनसेट्ससह पॉवर सोल्यूशन्स वितरित करत आहोत, ज्यामुळे पाायाभूत सुविधा सीईव्ही बीएस-५ उत्सर्जन-प्रमाणित इंडस्ट्रीयल इंजिन्स व लाइव्ह अॅक्सल्ससह सक्षम होतील आणि लॉजिस्टिक्स ट्रेलर अॅक्सल्स व कम्पोनण्ट्ससह प्रबळ होईल.”
टाटा मोटर्स अॅग्रीगेट्स त्यांचा उच्च टिकाऊपणा, कार्यक्षमता व परफॉर्मन्ससाठी ओळखले जातात. व्यापक संशोधनाच्या माध्यमातून विकसित आणि अत्याधुनिक केंद्रांमध्ये उत्पादित करण्यात आलेल्या या सोल्यूशन्सना देशभरातील २५००० हून अधिक अधिकृत सर्विस आऊटलेट्सचे पाठबळ आहे. कंपनी प्रखर औद्योगिक वैशिष्ट्यांची पूर्तता करणारे नाविन्यपूर्ण, उच्च-कार्यक्षम अॅग्रीगेट्स देत भारतातील पायाभूत सुविधा विकासाला पाठिंबा देण्याप्रती कटिबद्ध आहे.
नवीन वर्षापासून किआ आणि टाटाच्या कार महागणार; वाचा… कितीने वाढणार किंमती!