नववर्षात टाटा समुह मेगा आयपीओ आणण्याच्या तयारीत; भरघोस कमाईसाठी पैसे तयार ठेवा!
अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. आता आणखी दोन मोठ्या कंपन्यांही किमती वाढवण्याची तयारी केली आहे. किआ आणि टाटा मोटर्स या भारतीय बाजारपेठेत अनेक सेगमेंटमध्ये वाहनांची विक्री करणाऱ्या कंपन्यांनी किमती वाढवण्याची तयारी केली आहे. दोन्ही कंपन्या नवीन वर्षापासून त्यांच्या कारच्या किमती वाढवणार आहेत.
कधीकाळी कोट्यवधींचा मालक होता ‘हा’ खेळाडू; आज काढतोय एक हजार रुपयांमध्ये दिवस!
किआने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी नवीन वर्षापासून किमती वाढवणार आहे. ही वाढ 1 जानेवारी 2025 पासून करण्यात येणार आहे. किआने आपल्या सर्व कारच्या किमती दोन टक्क्यांनी वाढवणार असल्याची माहिती दिली आहे.
(फोटो सौजन्य – istock)
टाटाच्या गाड्या आणि एसयूव्ही किती महाग?
टाटा मोटर्सनेही आपल्या कारच्या किमती वाढवण्याची तयारी केली आहे. 1 जानेवारी 2025 पासून सर्व वाहनांच्या किमती कंपनीकडून वाढवल्या जाणार आहे. कंपनी नवीन वर्षापासून आपल्या कारच्या किमतीत तीन टक्क्यांनी वाढ करणार आहे. ही वाढ टाटा मोटर्सच्या सर्व कार आणि एसयूव्हीवर असणार आहे. यामध्ये आयसीई आणि ईव्ही कार आणि एसयूव्हीचा समावेश असणार आहे.
धोनीची पत्नी साक्षी आहे तब्बल इतक्या कोटींची मालकीण; आकडा वाचून अवाक् व्हाल!
विविध मॉडेल्ससाठी वाढ वेगळी
दोन्ही कंपन्यांकडून अशी माहिती देण्यात आली आहे की, ते सर्व मॉडेल्स आणि व्हेरियंटमध्ये एकसमान वाढ करणार नाहीत. परंतु वेगवेगळ्या मॉडेल्स आणि व्हेरियंटमध्ये वेगवेगळी वाढ केली जाईल. कंपन्यांकडून माहिती देण्यात आली आहे की, इनपुट कॉस्ट वाढल्यामुळे किमती वाढवण्याचा दबाव होता. त्यानंतर नवीन वर्षापासून किमतीत वाढ जाहीर करण्यात आली आहे.
इतर कंपन्यांच्याही कार महाग
किया आणि टाटा मोटर्सच्या आधी इतर अनेक कंपन्यांनीही किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई, एमजी मोटर्स, महिंद्रा याशिवाय ऑडी, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज बेंझ या कंपन्यांनी त्यांच्या कारच्या किमती वाढवण्याचे जाहीर केले आहे.