Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata च्या इलेक्ट्रिक कार खरेदी केल्यास होईल धमाकेदार फायदा, 2 लाख EV च्या विक्रीमुळे कंपनी झाली दिलदार

टाटाच्या ईव्ही लाइन-अपवर मोठी ऑफर दिली जात आहे. एक्सचेंज बोनससोबतच लॉयल्टी बोनस देखील कंपनीकडून दिला जात आहे. टाटाने ही ऑफर दोन लाख ईव्हीच्या विक्रीच्या निमित्ताने दिली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 21, 2025 | 06:55 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्र टाटा मोटर्सशिवाय अपुरे आहे. आज टाटा मोटर्सच्या कार भारतातच नव्हे, तर विदेशात देखील लोकप्रिय आहेत. अनेक वर्षांपासून कंपनी ग्राहकांच्या विविध मागणी आणि आवश्यकतेनुसार विविध प्रकारच्या उत्तम कार ऑफर करत आहे. या कंपनीने नेहमीच तंत्रज्ञान, गुणवत्ता आणि किमतीचा योग्य ताळमेळ साधला आहे. टाटा मोटर्सने देशात फोर व्हीलर श्रेणीत आपली छाप सोडली आहे, आणि आज त्याची कार्स ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.

सध्या, इलेक्ट्रिक वाहने आणि पर्यावरणीय मुद्द्यांचा विचार करून कंपनी EV (इलेक्ट्रिक व्हेइकल) क्षेत्रावर अधिक लक्ष देत आहे.टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक कारला मार्केटमध्ये उत्तम मागणी आहे. कंपनीने उत्कृष्ट EV मॉडेल्स सादर करून आपली क्षमता सिद्ध केली आहे.

New Fastag Rules: कार चालकांसाठी महत्त्वाची बातमी; आता ही चूक पडणार महागात, Fastag च्या नियमांमध्ये आजपासून बदल

टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत एक मोठा टप्पा गाठला आहे. टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीने एका प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत दोन लाख युनिट्सचा आकडा ओलांडला आहे. या निमित्ताने, टाटा कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे, जी पुढील 45 दिवस सुरू राहील.

Tata EV वर स्पेशल ऑफर

टाटा कंपनीने त्यांच्या सर्व इलेक्ट्रिक कारवर एक खास ऑफर आणली आहे. टाटाच्या या ऑफरमध्ये एक्सचेंज बोनस आणि 100% ऑन-रोड फायनान्स पर्याय समाविष्ट आहे. यासोबतच, कंपनीने टाटा पॉवर चार्जिंग स्टेशनवरून मोफत चार्जिंगच्या फायद्याची मर्यादाही सहा महिन्यांनी वाढवली आहे. कंपनी इलेक्ट्रिक कार खरेदीवर 7.2 किलोवॅट एसी फास्ट होम चार्जरची मोफत स्थापना देखील देत आहे.

Hyundai च्या कार खरेदी करण्यासाठी महत्वाची बातमी, कंपनीची ‘ही’ कार झाली महाग

टाटा देत आहे लॉयल्टी बोनस

टाटाने आपल्या ग्राहकांसाठी लॉयल्टी बोनस देखील आणला आहे. ही ऑफर त्यांच्यासाठी आहे, ज्यांच्याकडे आधीच या ब्रँडची कार आहे. ज्या टाटाच्या ग्राहकांकडे आधीच इलेक्ट्रिक कार आहे, त्यांनी नवीन नेक्सॉन ईव्ही किंवा कर्व्ह ईव्ही खरेदी केल्यास त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत लॉयल्टी बोनस दिला जात आहे. तर, ज्या ग्राहकांना ICE व्हेरियंट आहेत त्यांना 20 हजार रुपयांपर्यंतचा लॉयल्टी बोनस दिला जात आहे.

टाटाच्या नवीन इलेक्ट्रिक कार

टाटा मोटर्स ही भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची सर्वात मोठी रेंज असलेली कंपनी आहे. टाटाने अलीकडेच भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये हॅरियर ईव्ही आणि सिएरा ईव्ही सादर केले. टाटाच्या या दोन्ही नवीन इलेक्ट्रिक कार या वर्षाच्या अखेरीस बाजारात लाँच केल्या जाऊ शकतात.

Web Title: Tata motors is offering discounts after 2 lakh ev sales

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 06:55 PM

Topics:  

  • attractive discounts
  • Automobile company
  • tata motors

संबंधित बातम्या

Yamaha कडून विशेष गणेश चतुर्थी ऑफर्सची घोषणा, ‘या’ बाईक-स्कूटरवर असेल खास डिस्काऊंट; एक्स्टेंडेड वॉरंटी सुद्धा मिळणार
1

Yamaha कडून विशेष गणेश चतुर्थी ऑफर्सची घोषणा, ‘या’ बाईक-स्कूटरवर असेल खास डिस्काऊंट; एक्स्टेंडेड वॉरंटी सुद्धा मिळणार

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स
2

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स

Tata Nexon EV च्या बेस व्हेरिएंटसाठी 2 लाखांचं डाउन पेमेंट केल्यास किती असेल EMI?
3

Tata Nexon EV च्या बेस व्हेरिएंटसाठी 2 लाखांचं डाउन पेमेंट केल्यास किती असेल EMI?

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?
4

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.