
टाटा सिएटरा लाँच
नवीन लुकमधील टाटा सिएरा लाँच करत टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्स लिमिटेडचे एमडी व सीईओ शैलेश चंद्रा म्हणाले, ”नवीन सिएरासह आम्ही भारतीयांच्या गतीशीलतेचा अनुभव घेण्याच्या पद्धतीमध्ये नवीन मापदंड स्थापित करत आहोत. टाटा सिएरामधून आमचा विश्वास दिसून येतो की, ग्राहक साधारणपेक्षा अधिक प्रेरित करणारी नाविन्यता, भावनिकतेशी जुळणारी डिझाइन आणि प्रत्येक प्रवासाला उत्साहित करणारा प्रीमियम अनुभव मिळण्यास पात्र आहेत. या प्रतिष्ठित कारने अभिमान जागृत करण्यासाठी, व्यक्तिमत्त्व व्यक्त करण्यासाठी आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी पुनरागमन केले आहे. ही कार उच्च दर्जाचा आरामदायीपणा, तंत्रज्ञान व सुरक्षितता देते. सिएरा नेतृत्व करण्याप्रती, समकालीन पैलूंना आव्हान करण्याप्रती आणि भारतीयांना उद्देश व विशिष्टतेसह पुढे जाण्यास प्रेरित करणारी आयकॉन वितरित करण्याप्रती आमची कटिबद्धता आहे.”
नवीन रूप देण्यात आलेला वारसा
सिएराने १९९१ मध्ये पदार्पण केले तेव्हा भारतातील व्यक्तींनी आकर्षक सिल्हूट, प्रगतीशील डिझाइन आणि अग्रणी वैशिष्ट्ये कधीच पाहिलेली नव्हती, जेथे या गुणांनी या कारला प्रतिष्ठित बनवले. वेईकलपेक्षा ही कार विश्वास होती की भारतातील व्यक्ती साधारण ड्रायव्हिंगपेक्षा अधिक सुविधा मिळण्यास पात्र आहेत, जेथे ड्रायव्हिंगच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व व्यक्त करता येऊ शकते आणि रचनेमधून मर्यादांना दूर करता येऊ शकते. आज, या लीजेण्डने पुनरागमन केले आहे, नवीन युगासाठी या कारला नवीन लुक देण्यात आला आहे. नवीन सिएरा त्या अद्वितीय ओळखीला पुढे घेऊन जाते, तसेच डिझाइन, तंत्रज्ञान, क्षमता व कारागिरी या प्रत्येक बाबीला अधिक दृढ करते, ज्यामधून नाविन्यता, उत्साह व वैयक्तिक अभिव्यक्ती दिसून येतात.
काय सांगता राव! 3 स्क्रिन आणि कमालीचे इंटरिअर, किमतीपूर्वी जाणून घ्या Tata Sierra ची 5 वैशिष्ट्य
नवीन श्रेणीची निर्मिती: प्रीमियम मिड-एसयूव्ही
सिएरा श्रेणीला नव्या उंचीवर घेऊन जाते. ग्राहकांच्या गरजा व त्यांच्या विकसित होत असलेल्या महत्त्वाकांक्षा जाणून घेत डिझाइन करण्यात आलेली सिएरा मध्यम आकाराच्या एसयूव्हीला अधिक लक्षवेधक करते. या कारमधील एैसपैस जागा, आरामदायीपणा, आलिशान सुविधा, सुरक्षितता व दैनंदिन उपयुक्ता या प्रत्येक वैशिष्ट्याला अधिक दृढ करत प्रीमियम स्तराची भर करण्यात आली आहे, ज्यासह संपूर्ण श्रेणीला उच्च स्तरावर नेण्यात आले आहे. सिएरा फक्त एसयूव्ही नाही तर प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारी वेईकल आहे, जी उत्साहवर्धक व उत्तम ड्रायव्हिंग अनुभव देते, ज्यामधून व्यक्तिमत्त्व व महत्त्वाकांक्षा दिसून येते.
प्रत्येक पिढीचे लक्ष वेधून घेणारी एसयूव्ही
भारतातील व्यक्ती विकसित होत आहेत, तसेच त्यांच्या महत्त्वाकांक्षा देखील बदलत आहेत. नवीन सिएरा प्रत्येक पिढीसोबत भावनिक नाते निर्माण करते. मासिकांमध्ये या कारला पाहिलेल्या व्यक्तींची आता कार खरेदी करण्याची महत्त्वाकांक्षा आहे. रस्त्यावर या कारच्या ड्रायव्हिंगचा आनंद घेतलेल्या व्यक्तींची महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली आहे. आणि आता ही कार तरूण ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे.
या कारच्या उत्कृष्ट डिझाइनची जागतिक स्तरावर प्रशंसा करण्यात आली आहे, जेथे हिला प्रतिष्ठित रेड डॉट डिझाइन अवॉर्डसह सन्मानित करण्यात आले आहे. ही एसयूव्ही इतर वेईकल्सपेक्षा अद्वितीय आहे. स्टायलिश एसयूव्हीपेक्षा अधिक सिएरा लक्षवेधक आहे, ओळख व महत्त्वाकांक्षेशी संलग्न होते आणि उत्साहवर्धक व सर्वोत्तम ड्रायव्हिंग अनुभव देते.
पुन्हा दिसली Tata Sierra; मिळाली ‘ही’ महत्वाची माहिती, केव्हा होणार लाँच?
साहसी ड्रायव्हिंगचा आनंद
सिएरा परिवर्तनाला सादर करते, जे भारतातील ग्राहक स्वीकारण्यास उत्सुक आहेत. दीर्घकाळापासून बाजारपेठेत पर्याय साधारण, अंदाज लावता येणारे आणि न बदलणारे राहिले आहेत. सिएराने त्यामध्ये बदल घडवून आणला आहे. ‘एस्केप मेडिओकर’ हे केवळ शब्द नाहीत तर विश्वास आहे. आजच्या ग्राहकांना एकसारखेपणापेक्षा लक्षवेधक उपस्थिती, समान पैलूंपेक्षा खासियत आणि उत्साहित करणाऱ्या ड्राइव्हचा आनंद पाहिजे. पुनरागमन केलेली ही प्रतिष्ठित कार साधारणपेक्षा अधिक उत्साही व संस्मरणीय ड्रायव्हिंगचा आनंद देते. तसेच सिएरा अभिमान, ओळख देण्यासोबत कालातीत महत्त्वाकांक्षेची पूर्तता करते. या कारमधून मिळणारा ड्रायव्हिंग आनंद इतर सामान्य वेईकलमधून मिळू शकत नाही.