Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Motors चा देशभरात डंका! विविध राज्यांकडून तब्बल 5000 बसेसची मिळाली ऑर्डर

टाटा मोटर्स ही देशातील एक आघाडीची ऑटो कंपनी आहे, ज्यांनी भारतात वेगवेगळी वाहने लाँच केली आहेत. नुकतेच कंपनीला विविध राज्यांकडून 5000 बसेसची दमदार ऑर्डर मिळाली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 16, 2026 | 08:46 PM
विविध राज्यांकडून टाटा मोटर्सला मिळाली 5000 बसेसची ऑर्डर

विविध राज्यांकडून टाटा मोटर्सला मिळाली 5000 बसेसची ऑर्डर

Follow Us
Follow Us:
  • टाटा मोटर्सला मिळाली मोठी ऑर्डर
  • कंपनीला मिळाली 5000 बसेसची ऑर्डर
  • जाणून घ्या कोणत्या राज्यांकडून मिळाली ऑर्डर
भारतातील आघाडीची व्यावसायिक वाहन निर्माता कंपनी Tata Motors ला देशभरातील विविध राज्य परिवहन उपक्रमांकडून 5,000 हून अधिक बसेस आणि बस चेसिसची मोठी ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डर्समुळे सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात टाटा मोटर्सचे स्थान अधिक मजबूत झाले असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

कंपनीच्या माहितीनुसार, या सर्व ऑर्डर्स सरकारच्या खरेदी यंत्रणेअंतर्गत स्पर्धात्मक ई-बोली प्रक्रियेद्वारे मिळाल्या आहेत. संबंधित राज्य परिवहन उपक्रमांसोबत झालेल्या करारानुसार या बसेसची डिलिव्हरी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे.

या ऑर्डर्समध्ये देशातील अनेक प्रमुख परिवहन संस्थांचा समावेश आहे. त्यामध्ये एमएसआरटीसी (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ), जीएसआरटीसी (गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळ), एनडब्‍ल्‍यूकेआरटीसी (वायव्य कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळ), टीजीएसआरटीसी (तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ), बीएसआरटीसी (बिहार राज्य मार्ग परिवहन महामंडळ), आरएसआरटीसी (राजस्थान राज्य मार्ग परिवहन महामंडळ), केएसआरटीसी (केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळ), रस्ते परिवहन विभाग (हरियाणा रोडवेज) आणि सीटीयू (चंदीगड परिवहन उपक्रम) यांचा समावेश आहे.

Yezdi Roadster चा जलवा! हटके डिझाइनसाठी पटकावला ‘बाईक डिझाइन ऑफ द इयर’ पुरस्कार

या ऑर्डर्सबाबत प्रतिक्रिया देताना टाटा मोटर्सच्या कमर्शियल पॅसेंजर व्हेईकल बिझनेसचे उपाध्यक्ष आणि प्रमुख Anand S म्हणाले की, विविध राज्य परिवहन उपक्रमांकडून मिळालेल्या या ऑर्डर्समुळे टाटा मोटर्सच्या मोबिलिटी सोल्यूशन्सवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. कंपनीच्या बसेस विविध प्रदेश आणि वेगवेगळ्या ड्युटी सायकल्समध्ये प्रवाशांना आरामदायी, सुरक्षित आणि विश्वसनीय सेवा देण्यासाठी डिझाइन करण्यात आल्या आहेत.

या ऑर्डर्समध्ये कंपनीच्या प्रवासी वाहतूक सोल्यूशन्समधील विविध मॉडेल्सचा समावेश आहे. त्यामध्ये Tata Magna, Tata CityRide, Tata Starbus, Tata Starbus Prime, तसेच Tata LPO 1618, Tata LPO 1622 आणि Tata LPO 1822 यांसारख्या व्हेरिएंट्सचा समावेश आहे. या बसेस इंटरसिटी, लांब पल्ल्याच्या आणि शहरांतर्गत वाहतुकीसाठी तयार करण्यात आल्या आहेत.

फेब्रुवारीत Hatchback Cars ला ग्राहकांनी कसा दिला प्रतिसाद? ‘या’ कारच्या विक्रीत 25 टक्क्यांची घट

टाटा मोटर्सचे व्यावसायिक प्रवासी वाहन पोर्टफोलिओ 9 सीटर्सपासून ते 55 सीटर्सपर्यंत पसरलेले आहे. यामध्ये विविध पॉवरट्रेन पर्याय उपलब्ध असून देशभरातील सार्वजनिक वाहतूक गरजा पूर्ण करण्यासाठी ते डिझाइन करण्यात आले आहेत.

कंपनीकडून ‘Sampoorna Seva 2.0’ या वाहन लाइफसायकल मॅनेजमेंट प्रोग्रामद्वारे देखभाल सहाय्य, वेळेत दुरुस्ती, अस्सल स्पेअर पार्ट्स आणि ब्रेकडाऊन सहाय्य यांसारख्या सुविधा दिल्या जातात. देशभरातील 4,500 हून अधिक सेल्स आणि सर्व्हिस टचपॉइंट्सच्या नेटवर्कमुळे टाटा मोटर्स शहरी आणि ग्रामीण भागात सुरक्षित, कार्यक्षम आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक सक्षम करत आहे.

Web Title: Tata motors received 5000 buses order from different states of india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 08:46 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • tata motors

संबंधित बातम्या

VinFast Electric Scooter ‘Rasad’: व्हिएतनामच्या VinFast कडून भारतात ‘Rasad’ इलेक्ट्रिक स्कूटरचे पेटेंट; लवकरच होणार लाँच?
1

VinFast Electric Scooter ‘Rasad’: व्हिएतनामच्या VinFast कडून भारतात ‘Rasad’ इलेक्ट्रिक स्कूटरचे पेटेंट; लवकरच होणार लाँच?

EV Upgrade: ईव्ही अपग्रेडचे नियोजन करत आहात? या ५ कौटुंबिक ईव्ही ४०० किमीपेक्षा जास्त रेंज देतात
2

EV Upgrade: ईव्ही अपग्रेडचे नियोजन करत आहात? या ५ कौटुंबिक ईव्ही ४०० किमीपेक्षा जास्त रेंज देतात

Mahindra: महिंद्रा BE6 Sporteq १५ ऑगस्टला होणार लाँच; ट्रिपल स्क्रीनसह मिळणार जबरदस्त लूक
3

Mahindra: महिंद्रा BE6 Sporteq १५ ऑगस्टला होणार लाँच; ट्रिपल स्क्रीनसह मिळणार जबरदस्त लूक

RTO कार्यालयांमध्ये लवकरच उभारणार EV चार्जिंग स्टेशन; PPP तत्त्वावरील प्रस्ताव राज्य शासनाकडे जाणार
4

RTO कार्यालयांमध्ये लवकरच उभारणार EV चार्जिंग स्टेशन; PPP तत्त्वावरील प्रस्ताव राज्य शासनाकडे जाणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.