Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Motors ला लागली दिवाळीची लॉटरी! ऑक्टोबर 2025 विक्रीचा आकडा पाहून प्रतिस्पर्ध्यांची झोप उडाली

नुकतेच टाटा मोटर्सने ऑक्टोबर 2025 मधील त्यांचा विक्रीचा रिपोर्ट सादर केला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर कंपनीने वाहनांची चांगली विक्री केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 01, 2025 | 08:24 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय ऑटो बाजारात Tata Motors कडे एक महत्वपूर्ण ऑटो कंपनीने म्हणून पहिले जाते. कंपनीने आतापर्यंत अनेक उत्तम कार्स ऑफर केल्या आहेत, ज्या नेहमीच विक्रीच्या बाबतीत टॉप मारत असतात. यासोबतच वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ पाहता कंपनीने बेस्ट इलेक्ट्रिक कार देखील ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीचा ऑक्टोबर 2025 मधील कार विक्रीचा रिपोर्ट सादर झाला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Tata Motors पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड (TMPV) ने ऑक्टोबर 2025 मध्ये विक्रमी विक्रीची नोंद केली आहे. कंपनीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये एकूण 61,295 वाहनांची विक्री केली असून, ही आकडेवारी ऑक्टोबर 2024 मधील 48,423 युनिट्सच्या तुलनेत तब्बल 26.6% वाढ दर्शवते.

November 2025 मध्ये एकापेक्षा एक Two Wheeler लाँच होणार, जाणून घ्या अपेक्षित किंमत

या सणासुदीचा काळ टाटा मोटर्ससाठी विशेष ठरला असून, सलग दुसऱ्या महिन्यात कंपनीने सर्वाधिक मासिक घाऊक विक्री नोंदवली आहे. एसयूव्ही विभागाने विक्रीत आघाडी घेतली असून, 47,000 हून अधिक युनिट्स विक्रीसह 77% बाजारहिस्सा नोंदवला आहे. ही विक्री कंपनीच्या SUV श्रेणीवरील ग्राहकांच्या विश्वासाचे आणि वाढत्या मागणीचे द्योतक ठरली आहे.

इलेक्ट्रिक वाहन (EV) विभागानेही या महिन्यात नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. कंपनीने 9,286 युनिट्स ईव्ही विक्री नोंदवून 73% वार्षिक वाढ साध्य केली. ही वाढ टाटा मोटर्सच्या विस्तारित होत असलेल्या EV पोर्टफोलिओवरील ग्राहकांच्या वाढत्या विश्वासाचे प्रतीक आहे.

सणासुदीच्या हंगामात ग्राहकांकडून मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे किरकोळ विक्रीत मोठी झेप दिसली. नेक्सॉन मॉडेलने आपल्या मल्टी-पॉवरट्रेन पर्यायांमुळे 50% वार्षिक वाढ नोंदवली. हॅरियर आणि सफारी यांनी एकत्रित 7000 युनिट्स विक्रीसह नवे विक्रम मोडले, ज्यात अ‍ॅडव्हेंचर एक्स व्हेरिएंट्सची लोकप्रियता आणि हॅरियर EV साठी असलेली मजबूत मागणी निर्णायक ठरली.

HSRP Number Plate नाही? ‘इतका’ मोठा दंड भरायला तयार राहा! सगळा खिसा होईल रिकामा

याशिवाय, कंपनीने या सणासुदीच्या हंगामात म्हणजेच नवरात्री ते दिवाळी या काळात 1 लाखांहून अधिक वाहनांची डिलिव्हरी पूर्ण केली, ज्यात 33% वार्षिक वाढ नोंदवली गेली. हा आकडा टाटा मोटर्सच्या ग्राहककेंद्रित दृष्टिकोनाचा आणि वाढत्या बाजारपेठीय पकडीचा पुरावा मानला जातो.

टाटा मोटर्सच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या यशामागे कंपनीच्या सातत्यपूर्ण नावीन्यपूर्ण प्रयत्नांचा, उत्कृष्ट SUV आणि EV मॉडेल्सचा तसेच मजबूत डिलर नेटवर्कचा मोठा वाटा आहे.

Web Title: Tata motors sales in october 2025 61295 vehicles units sold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 08:24 PM

Topics:  

  • automobile
  • record sales
  • tata motors

संबंधित बातम्या

2026 मध्ये Nissan Motors भारतात ‘ही’ 7 सीटर MPV कार ऑफर करणार
1

2026 मध्ये Nissan Motors भारतात ‘ही’ 7 सीटर MPV कार ऑफर करणार

जर्मनीत Rahul Gandhi यांना ‘या’ खास Rolls-Royce कारची भुरळ, भारतातील किंमत वाचून हडबडून जाल
2

जर्मनीत Rahul Gandhi यांना ‘या’ खास Rolls-Royce कारची भुरळ, भारतातील किंमत वाचून हडबडून जाल

‘या’ Car चा दरारा तर बघा! आतापर्यंत 35 लाख युनिट्सपेक्षा जास्त उत्पादन
3

‘या’ Car चा दरारा तर बघा! आतापर्यंत 35 लाख युनिट्सपेक्षा जास्त उत्पादन

सेफ्टी महत्वाची! ADAS टेक्नॉलॉजी असणाऱ्या ‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त कार
4

सेफ्टी महत्वाची! ADAS टेक्नॉलॉजी असणाऱ्या ‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.