फोटो सौजन्य: Gemini
भारतीय ऑटो बाजारात अनेक कंपन्या Two Wheeler सेगमेंटमध्ये दमदार बाईक आणि स्कूटर ऑफर करतात. नोव्हेंबर 2025 मध्ये देखील अनेक नवनवीन बाईक आणि स्कूटर लाँच होण्याच्या तयारीत आहे. काही बहुप्रतिक्षित Yamaha बाईक्सपासून ते नवीन इलेक्ट्रिक दुचाक्यांपर्यंत, या महिन्यात अनेक गोष्टी पाहायला मिळेल. याचा अर्थ पेट्रोलवर चालणारे आणि बॅटरीवर चालणारे दोन्ही रायडर्स आनंदी असतील. नोव्हेंबर २०२५ मध्ये लाँच होणाऱ्या मोटारसायकली आणि स्कूटरवर बारकाईने नजर टाकूया.
यामाहा 11 नोव्हेंबर रोजी भारतीय बाजारात एक नवीन बाईक लाँच करणार आहे. या लिस्टमध्ये यामाहा WR155 R सोबत यामाहा XSR 155 चा समावेश आहे.
HSRP Number Plate नाही? ‘इतका’ मोठा दंड भरायला तयार राहा! सगळा खिसा होईल रिकामा
ही बाईक यामाहाची सर्वात लोकप्रिय मॉडेल आहे, ज्याची भारतीय रायडर्स बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. यामाहा XSR155 हे एक निओ-रेट्रो रोडस्टर आहे, जे R15 V4 आणि MT-15 V2 सारख्याच प्लॅटफॉर्मवर बनवले आहे. यात समान 155cc लिक्विड-कूल्ड इंजिन असेल, परंतु डिझाइन पूर्णपणे क्लासिक आहे. ते R15 आणि MT-15 च्या दरम्यान असण्याची अपेक्षा आहे आणि त्याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.60 लाख रुपये असू शकते.
यामाहा कंपनीची WR155 R बाईक सध्या भारतात चर्चेचा विषय ठरली आहे. अलीकडेच ही बाईक बेंगळुरू शहरात कोणत्याही कव्हरिंगशिवाय दिसल्याने ग्राहकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या होत्या. ही एक ड्युअल-स्पोर्ट बाइक आहे, ज्यात 21-इंच फ्रंट व्हील, 18-इंच रियर व्हील, लाँग-ट्रॅव्हल सस्पेन्शन आणि ऑफ-रोडिंगसाठी खास ट्यून केलेला 155cc इंजिन मिळणार आहे. जर ही बाईक भारतात लाँच झाली, तर ती देशातील सर्वात ॲडव्हेंचर लाइटवेट ड्युअल-स्पोर्ट बाइक ठरू शकते.
सुझुकी ई ॲक्सेस स्कूटरची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून या इलेक्ट्रिक स्कूटरच्या लाँचबाबत चर्चा सुरू आहे, पण प्रत्येक वेळी काहीतरी कारणामुळे ती पुढे ढकलली जाते. मात्र, यावेळी थोडी आशा निर्माण झाली आहे, कारण एका डीलरशिपच्या बाहेर फास्ट चार्जर सेटअप बसवण्यात आला आहे. ही स्कूटर 2025 Bharat Mobility Global Expo (Auto Expo) मध्ये सादर करण्यात आली होती, पण त्यानंतर मार्केटमध्ये TVS Orbiter सारखे नवे प्रतिस्पर्धी उतरले आहेत. त्यामुळे Suzuki ला e-Access द्वारे प्रभाव निर्माण करायचा असेल, तर आता गती दाखवावीच लागेल.
TVS कंपनीची पहिली अॅडव्हेंचर बाईक Apache RTX 300 ची डिलिव्हरी या महिन्यात सुरू होत आहे. दमदार डिझाइन आणि वॅल्यू-फॉर-मनी पॅकेजमुळे ही बाइक कंपनीसाठी एक संभाव्य बेस्टसेलर ठरू शकते.
इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये Raptee कंपनी शेवटी आपल्या ग्राहकांना T30 बाईक देण्यासाठी सज्ज झाली आहे. फ्युचरिस्टिक डिझाइन आणि अत्याधुनिक फीचर्ससह ही ई-बाईक थेट Ultraviolette सारख्या बाईक्सना टक्कर देण्याच्या इराद्याने बाजारात येत आहे.






