Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

9000 कोटींची गुंतवणूक आणि 5000 रोजगार निर्मिती! तामिळनाडूत Tata Motors ‘या’ खास कारचे उत्पादन करणार सुरु

टाटा मोटर्स आणि त्यांची उपकंपनी जग्वार लँड रोव्हर (JLR) यांनी तामिळनाडूतील रानीपेट जिल्ह्यातील पनापक्‍कम येथे नवीन प्लांट उभारला आहे. जिथे 'रेंज रोव्हर इव्होक'चे उत्पादन सुरू होणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 09, 2026 | 08:25 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • तामिळनाडूतील रानीपेट जिल्ह्यातील पनापक्‍कम येथे टाटा मोटर्सचा नवीन प्लांट सुरु
  • ‘रेंज रोव्हर इव्होक’चे उत्पादन सुरू होणार आहे.
  • या प्रकल्पामुळे ५,००० हून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होणार
Tata Motors पॅसेंजर व्हेईकल लिमिटेड (TMPV) आणि त्यांची उपकंपनी जग्वार लँड रोव्हर (JLR) यांनी तामिळनाडूतील रानीपेट जिल्ह्यातील पनापक्‍कम येथे नव्या उत्पादन प्रकल्पाचे कार्यसंचालन औपचारिकरित्या सुरू केले आहे. या अत्याधुनिक प्लांटमधून पहिल्या वाहनाच्या रूपात रेंज रोव्हर इव्होक या लक्झरी SUV चे स्थानिक पातळीवर उत्पादन सुरू करण्यात आले आहे.

हा प्रकल्प TMPV आणि JLR साठी महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, भविष्यातील नेक्स्ट-जनरेशन वाहने आणि इलेक्ट्रिक व्हेईकल्स (EVs) उत्पादनासाठी उभारल्या जाणाऱ्या ग्रीनफिल्ड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे प्रतीक आहे. जागतिक स्तरावर लक्झरी, आधुनिक डिझाइन आणि उत्कृष्ट कारागिरीसाठी ओळखली जाणारी रेंज रोव्हर इव्होक आता भारतातच उत्पादित केली जाणार आहे.

तुमच्याकडे Kia ची EV कार आहे? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठी आहे खास, वाचा सविस्तर…

मुख्यमंत्री आणि टाटा समूहाच्या अध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन

या नव्या उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन तामिळनाडूचे माननीय मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या हस्ते पार पडले. यावेळी टाटा सन्स आणि टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, मंत्री, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच टाटा समूह आणि JLR चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितले की, “टाटा समूहाचा राष्ट्रनिर्मितीतील सहभाग दीर्घकालीन असून तामिळनाडूसोबतचा त्यांचा संबंध ऐतिहासिक आहे. रानीपेटमधील पनापक्‍कम येथे या प्रकल्पाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे ऑटोमोटिव्ह उत्पादन राज्यात येत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. या प्रकल्पामुळे रोजगारनिर्मिती, नवकल्पना आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल.”

प्रगत तंत्रज्ञान आणि स्थानिक कौशल्यांचा मिलाफ

पनापक्‍कम प्लांटमध्ये अत्याधुनिक उत्पादन तंत्रज्ञानासोबत कुशल स्थानिक मनुष्यबळाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. येथे कार्यरत टेक्निशियन ‘लक्ष्य – शिका आणि कमवा’ या टाटा मोटर्सच्या विशेष उपक्रमांतर्गत प्रशिक्षित करण्यात आले असून, त्यांना देश-विदेशातील JLR प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले आहे.

पहिल्यांदाच Maruti Victoris वर मिळतेय धकामकेदार सूट! फेब्रुवारी 2026 मध्ये हजारो रुपये

या कर्मचाऱ्यांना कामासोबत प्रतिष्ठित विद्यापीठांतून कंपनी-प्रायोजित बी.टेक पदवी मिळवण्याची संधीही देण्यात येत आहे. यामुळे वैयक्तिक प्रगतीसोबतच व्यावसायिक कौशल्यविकासाला चालना मिळत आहे.

९,००० कोटींची गुंतवणूक; ५,०००हून अधिक रोजगार

टप्प्याटप्प्याने उत्पादन वाढवून पुढील ५ ते ७ वर्षांत या प्लांटची वार्षिक उत्पादन क्षमता २.५ लाख वाहनांपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी पूर्ण करण्यासाठी जवळपास ९,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

या प्रकल्पामुळे ५,०००हून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होणार असून, संपूर्ण सहाय्यक उद्योगसाखळीला चालना मिळणार आहे.

Web Title: Tata motors new plant inaugurated at panapakkam production of range rover evoque

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 08:25 PM

Topics:  

  • automobile
  • Tamil Nadu
  • tata motors

संबंधित बातम्या

VinFast Electric Scooter ‘Rasad’: व्हिएतनामच्या VinFast कडून भारतात ‘Rasad’ इलेक्ट्रिक स्कूटरचे पेटेंट; लवकरच होणार लाँच?
1

VinFast Electric Scooter ‘Rasad’: व्हिएतनामच्या VinFast कडून भारतात ‘Rasad’ इलेक्ट्रिक स्कूटरचे पेटेंट; लवकरच होणार लाँच?

EV Upgrade: ईव्ही अपग्रेडचे नियोजन करत आहात? या ५ कौटुंबिक ईव्ही ४०० किमीपेक्षा जास्त रेंज देतात
2

EV Upgrade: ईव्ही अपग्रेडचे नियोजन करत आहात? या ५ कौटुंबिक ईव्ही ४०० किमीपेक्षा जास्त रेंज देतात

Mahindra: महिंद्रा BE6 Sporteq १५ ऑगस्टला होणार लाँच; ट्रिपल स्क्रीनसह मिळणार जबरदस्त लूक
3

Mahindra: महिंद्रा BE6 Sporteq १५ ऑगस्टला होणार लाँच; ट्रिपल स्क्रीनसह मिळणार जबरदस्त लूक

RTO कार्यालयांमध्ये लवकरच उभारणार EV चार्जिंग स्टेशन; PPP तत्त्वावरील प्रस्ताव राज्य शासनाकडे जाणार
4

RTO कार्यालयांमध्ये लवकरच उभारणार EV चार्जिंग स्टेशन; PPP तत्त्वावरील प्रस्ताव राज्य शासनाकडे जाणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.