Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Punch Facelift Vs Maruti Swift: फीचर्स, किंमत आणि इंजिनच्या बाबतीत कोणत्या कारचा पगडा भारी?

नुकतेच मार्केटमध्ये Tata Punch Facelift लाँच झाली आहे. ही नवीन कार थेट मारुती स्विफ्टसोबत स्पर्धा करणार आहे. चला या दोन्ही कारच्या फीचर्स, किंमत आणि इंजिनबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 15, 2026 | 06:16 PM
Tata Punch Facelift Vs Maruti Swift: फीचर्स, किंमत आणि इंजिनच्या बाबतीत कोणत्या कारचा पगडा भारी?

Tata Punch Facelift Vs Maruti Swift: फीचर्स, किंमत आणि इंजिनच्या बाबतीत कोणत्या कारचा पगडा भारी?

Follow Us
Close
Follow Us:
  • टाटा पंचचा फेसलिफ्ट व्हर्जन लाँच
  • थेट Maruti Swift सोबत असेल स्पर्धा
  • जाणून घ्या दोन्ही कार्सबद्दल
भारतात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या नेहमीच ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार दमदार कार ऑफर करत असतात. तसेच, बदलत्या काळानुसार ते त्यांच्या कारचे अपडेटेड व्हर्जन देखील मार्केटमध्ये आणतात. नुकतेच Tata Motors ने त्यांच्या लोकप्रिय पंचचे फेसलिफ्ट व्हर्जन भारतात आणले आहे.

मारुती स्विफ्टच्या किमतीत Tata Punch Facelift लाँच झाल्याने दोन्ही कारची एकमेकांसोबत स्पर्धा होणार हे नक्की. चला दोन्ही कारच्या इंजिन, फीचर्स आणि किंमतीबद्दल जाणून घेऊयात.

इंजिन

अलीकडेच टाटा पंच एसयूव्हीने त्याचे फेसलिफ्ट लाँच केले. 1.5-लिटर रेव्होट्रॉन इंजिनद्वारे समर्थित जे 87.8 पीएस पॉवर आणि 115 एनएम टॉर्क निर्माण करते. दुसऱ्या इंजिन पर्याय 1.2 -लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे जे 120 पीएस पॉवर आणि 170 एनएम टॉर्क निर्माण करते. तिसरा इंजिन पर्याय 1.2-लिटर सीएनजी इंजिन आहे, जो 73.4 पीएस पॉवर आणि 103 एनएम टॉर्क निर्माण करतो.

मारुतीची स्विफ्ट 1.2-लिटर झेड-सिरीज माइल्ड हायब्रिड पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे. 1197 सीसी झेड-सिरीज माइल्ड हायब्रिड पेट्रोल इंजिन 81.6 पीएस पॉवर आणि 112 एनएम टॉर्क निर्माण करते. हे पाच-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि एएमटी ट्रान्समिशनसह ऑफर केले जाते.

Kia India ने उडवली झोप! भारतीय रस्त्यांवर तब्बल 5 लाख कनेक्टेड कार्स अन्…; वाचा सविस्तर…

फीचर्स

टाटा पंच फेसलिफ्टमध्ये अनेक आधुनिक आणि प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये ड्युअल-टोन डॅशबोर्ड, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्ले, टाइप-सी चार्जिंग पोर्ट, एक्सप्रेस कूल फंक्शन, ऑटो-डिमिंग IRVM, पुढील आणि मागील थाय सपोर्ट, सहा एअरबॅग्स, ESP, ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज, ऑटो हेडलाइट्स, रेन-सेंसिंग वायपर्स, 26.03 सेमी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 17.78 सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, LED टेल लॅम्प्स, 16-इंच अलॉय व्हील्स, 360 डिग्री कॅमेरा, LED फॉग लॅम्प्स, इको आणि सिटी ड्राइव्ह मोड्स तसेच आयडल स्टार्ट/स्टॉपसारखी फीचर्स देण्यात आले आहेत.

मारुती स्विफ्टमध्ये सहा-स्पीकर साउंड सिस्टीम, फ्रंट ट्वीटर्स, 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, नवीन सस्पेंशन सेटअप, वायरलेस अँड्रॉइड ऑटो व अ‍ॅपल कारप्ले, सुजुकी कनेक्ट, हायड्रॉलिक क्लच, मागील प्रवाशांसाठी एसी व्हेंट्स, दोन चार्जिंग पोर्ट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्टिअरिंग-माउंटेड ऑडिओ कंट्रोल्स आणि क्रूझ कंट्रोल यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. सुरक्षिततेसाठी स्विफ्टमध्ये सहा एअरबॅग्ससह हिल होल्ड असिस्ट, ESP, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, ABS आणि EBD सारखी सेफ्टी फीचर्स उपलब्ध आहेत.

Tata Punch Old vs New: जुन्या व्हर्जनपेक्षा नवीन टाटा पंच किती वेगळी आणि खास? जाणून घ्या

किंमत

टाटा कंपनीने पंच फेसलिफ्ट भारतीय बाजारात 5.59 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत लाँच केला आहे. या कारच्या पेट्रोल इंजिनच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 8.99 लाख रुपये आहे. तर पंचचे CNG व्हेरिएंट्स 6.69 लाख रुपयांपासून उपलब्ध असून, CNG मधील टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 9.69 लाख रुपये इतकी आहे.

दुसरीकडे, मारुती स्विफ्ट भारतात 5.79 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत लाँच करण्यात आली आहे. स्विफ्टच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 8.65 लाख रुपये आहे.

Web Title: Tata punch facelift vs maruti swift which car is best in features price and engine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • automobile
  • Maruti Suzuki
  • tata punch

संबंधित बातम्या

नवीन रंग आणि ग्राफिक्ससह अपडेट झाली Suzuki Gixxer 250, जाणून घ्या किंमत
1

नवीन रंग आणि ग्राफिक्ससह अपडेट झाली Suzuki Gixxer 250, जाणून घ्या किंमत

Tata Punch Old vs New: जुन्या व्हर्जनपेक्षा नवीन टाटा पंच किती वेगळी आणि खास? जाणून घ्या
2

Tata Punch Old vs New: जुन्या व्हर्जनपेक्षा नवीन टाटा पंच किती वेगळी आणि खास? जाणून घ्या

पहिल्यांदाच नोकरी करणारे आरामात खरेदी करू शकतात देशातील ‘या’ सर्वात स्वस्त कार
3

पहिल्यांदाच नोकरी करणारे आरामात खरेदी करू शकतात देशातील ‘या’ सर्वात स्वस्त कार

2026 मध्ये Nissan ‘या’ 3 कार सादर करणार, थियरी साबाघ यांच्यावर सोपवली नवी जबाबदारी
4

2026 मध्ये Nissan ‘या’ 3 कार सादर करणार, थियरी साबाघ यांच्यावर सोपवली नवी जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.