फोटो सौजन्य: X.com
Tata Punch Facelift मध्ये अनेक बदल केले गेले आहेत. मात्र, आता अनेक ग्राहकांना प्रश्न पडला आहे की जुन्या पंचच्या तुलनेत नवीन पंचमध्ये काय नवीन आहे? चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
December 2025 मध्ये ‘या’ 7 Seater Cars ने ग्राहकांना शोरूमपर्यंत खेचून आणले!
नवीन टाटा पंचमध्ये फ्रंटपाससून ते रिअरपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. साइड प्रोफाइलमध्येही थोडासा बदल करण्यात आला आहे, ज्यामुळे त्याचा बॉक्सी लूक कायम आहे.
फ्रंट लूक: फेसलिफ्ट केलेल्या पंचचा फ्रंट लूक आता अधिक आकर्षक आणि मस्क्युलर झाला आहे. जुन्या पंचमध्ये पारंपारिक हेडलॅम्प होते, तर नवीन पंचमध्ये व्हर्टिकल हेडलाइट क्लस्टर आहेत. हे आता टाटा मोटर्सच्या सर्व नवीन एसयूव्हीमध्ये दिले जात आहे. नवीन पंचमध्ये बोनेटजवळ शार्प एलईडी डीआरएल आहेत, जे टर्न इंडिकेटर म्हणून देखील काम करतात. हे एका स्लिम ब्लॅक ग्रिलमध्ये एकत्रित केले आहेत. बंपर पूर्वीप्रमाणेच उंच आहे, परंतु त्यात नवीन सिल्व्हर-फिनिश स्किड प्लेट आहे. फॉग लॅम्प बंपरवरून हेडलॅम्प क्लस्टरमध्ये हलवण्यात आले आहेत आणि आता त्यांच्यात कॉर्नरिंग फंक्शन देखील आहे.
2025 मध्ये ‘या’ Cars चा वेगळाच जलवा! ग्राहकांनी शोरूमबाहेर रांगा लावून बुक केली कार
रिअर लूक: नवीन पंचचे रिअर जुन्या पंचच्या तुलनेत थोडे मॉडर्न करण्यात आले आहे. नवीन पंचमध्ये कनेक्टेड एलईडी टेललॅम्प आहेत, जे जुन्या मॉडेलच्या लहान ट्राय-एरो सिग्नेचर लॅम्पची जागा घेतात. नवीन पंचमध्ये शार्क-फिन अँटेना आणि नवीन सिल्व्हर-फिनिश्ड रिअर स्किड प्लेट देखील आहे. मागील वायपर-वॉशर, डिफॉगर, स्पॉयलर आणि मागील पार्किंग सेन्सर्स सारखी फीचर्स जुन्या मॉडेलमधीलच ठेवण्यात आली आहेत.
सेफ्टीच्या बाबतीत Tata Punch आधीपासूनच मजबूत ठरली आहे आणि फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये ती अधिक सुरक्षित करण्यात आली आहे. आता 6 एअरबॅग्स स्टँडर्ड देण्यात आले असून, यासोबत 3-पॉइंट सीटबेल्ट, ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स आणि रेन-सेंसिंग वायपर्स मिळतात. यातील सर्वात मोठा अपडेट म्हणजे 360-डिग्री कॅमेरा. यासोबतच 2026 Punch ची ट्रकसोबत क्रॅश टेस्ट देखील करण्यात आले.
2026 Tata Punch ची किंमत 5.59 लाख रुपये ते 10.54 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवण्यात आली आहे. याआधीच्या टाटा पंचची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.50 लाख रुपये होती. या कारची थेट स्पर्धा Hyundai Exter आणि Citroen C3 सोबत आहे.






