
फोटो सौजन्य: Pinterest
Tata Safari Petrol चे डिझाइन अधिक बोल्ड आणि दमदार दिसते. यामध्ये मोठी ग्रिल, Bi-LED हेडलॅम्प्स, कनेक्टेड टेललाइट्स आणि 19-इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. उंच स्टान्समुळे ही SUV खऱ्या अर्थाने रफ-टफ SUV फील देते.
New Kia Seltos च्या उत्पादनाला सुरुवात, ‘या’ दिवशी किंमत होणार जाहीर
दुसरीकडे, MG Hector Plus चा लुक अधिक स्लीक आणि मॉडर्न आहे. यात मोठी डायमंड पॅटर्न ग्रिल, LED लाइट्स आणि 18-इंच अलॉय व्हील्स मिळतात. शहरातील वापरासाठी Hector Plus अधिक प्रीमियम दिसते, तर Safari अधिक दमदार SUV म्हणून जाणवते.
Tata Safari Petrol चे केबिन प्रीमियम आणि स्पोर्टी फील देणारे आहे. यात पॅनोरामिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, जेस्चर कंट्रोल्ड टेलगेट आणि तिसऱ्या रांगेतही चांगली जागा देण्यात आली आहे. ही SUV 6-सीटर आणि 7-सीटर अशा दोन्ही पर्यायांत उपलब्ध आहे.
MG Hector Plus मध्येही लक्झरी केबिनचा अनुभव मिळतो. सॉफ्ट-टच मटेरियल, मोठी टचस्क्रीन, रिक्लायनिंग सेकंड रो सीट्स आणि आरामदायक थर्ड रो यामुळे प्रवास सुखद होतो. लांब व्हीलबेसमुळे तिसऱ्या रांगेतील लेगस्पेस थोडी अधिक चांगली आहे.
Safari Petrol मध्ये 12.3-इंच टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, JBL साउंड सिस्टम, वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay, ADAS आणि कनेक्टेड कार टेक्नोलॉजी मिळते. Hector Plus मध्ये 14-इंच पोर्ट्रेट टचस्क्रीन, i-Smart सिस्टम, 100 पेक्षा अधिक व्हॉइस कमांड्स, OTA अपडेट्स आणि 360-डिग्री कॅमेरा देण्यात आला आहे. टेक्नोलॉजीच्या बाबतीत Hector Plus थोडीशी पुढे आहे.
CID फेम Daya ने ‘ही’ प्रीमियम फीचर्स असणारी आलिशान कार, किंमत थेट कोटींच्या घरात
Tata Safari Petrol ला Global NCAP आणि Bharat NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. यामध्ये 7 एअरबॅग्स आणि प्रगत ADAS फीचर्स दिले आहेत. MG Hector Plus मध्ये 6 एअरबॅग्स, ESP आणि ऑल-डिस्क ब्रेक्स मिळतात, मात्र सेफ्टी रेटिंगच्या बाबतीत Safari अधिक मजबूत ठरते.
Tata Safari Petrol मध्ये 1.5-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 170 PS पॉवर आणि 280 Nm टॉर्क जनरेट करते. हायवे ड्रायव्हिंगदरम्यान ही SUV अधिक पावरफुल वाटते. MG Hector Plus Petrol मध्ये 1.5-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळते, जे 143 PS पॉवर देते आणि शहरातील ड्रायव्हिंगसाठी स्मूद अनुभव देते.
जर तुमची प्राथमिकता जास्त पॉवर, उत्तम सेफ्टी आणि खऱ्या SUV सारखा फील असेल, तर Tata Safari Petrol हा उत्तम पर्याय ठरू शकतो. तर अधिक स्पेस, स्मार्ट फीचर्स आणि आरामदायक सिटी ड्रायव्हिंग हवी असल्यास MG Hector Plus तुमच्यासाठी योग्य ठरेल. अंतिम निर्णय तुमच्या गरजा आणि बजेटवर अवलंबून आहे.