फोटो सौजन्य: Pinterest
नवीन किया सेल्टोस ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मिड-एसयूव्हींपैकी एक असलेल्या मॉडेलची अधिक मोठी, अधिक आकर्षक आणि तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत अशी पुढील जनरेशन आवृत्ती आहे. भारतीय ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन या एसयूव्हीचे डिझाइन करण्यात आले असून, यामध्ये अधिक प्रशस्त केबिन, सुधारित राइड कम्फर्ट, आत्मविश्वासपूर्ण हँडलिंग, प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये आणि नेक्स्ट-जनरेशन डिजिटल तंत्रज्ञान देण्यात आले आहे.
CID फेम Daya ने ‘ही’ प्रीमियम फीचर्स असणारी आलिशान कार, किंमत थेट कोटींच्या घरात
या प्रसंगी बोलताना किया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ग्वांगू ली म्हणाले,
“ऑल-न्यू किया सेल्टोसचे उत्पादन सुरू होणे हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. सेल्टोसने मिड-एसयूव्ही सेगमेंटमध्ये दीर्घकाळ मापदंड स्थापित केले आहेत. नव्या जनरेशनमध्ये ग्राहकांच्या अभिप्रायावर आधारित अधिक मोठे, आकर्षक आणि प्रगत मॉडेल सादर करण्यात आले आहे. अनंतपूर प्लांटमधील आमची टीम वेळेत डिलिव्हरी सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.”
अनंतपूर येथील उत्पादन प्रकल्प हा किया इंडियाचा पहिला आणि प्रमुख जागतिक उत्पादन केंद्र आहे. २०१९ मध्ये सुरू झालेल्या या प्लांटमध्येच पहिल्यांदा किया सेल्टोसचे उत्पादन करण्यात आले होते. देशांतर्गत बाजारपेठेसोबतच निर्यातीसाठीही हा प्लांट महत्त्वाची भूमिका बजावत असून, येथे प्रगत ऑटोमेशन, उच्च दर्जाचे उत्पादन मानक आणि कुशल मनुष्यबळ कार्यरत आहे.
फक्त 1 लाखाचे डाउन पेमेंट Maruti Dzire CNG ची चावी डायरेक्ट तुमच्या खिशात, जाणून घ्या EMI
ऑल-न्यू किया सेल्टोसचा आकार पूर्वीच्या मॉडेलपेक्षा मोठा करण्यात आला आहे. या एसयूव्हीची लांबी 4,460 mm, रुंदी 1,830 mm असून 2,690 mm व्हीलबेस देण्यात आला आहे. यामुळे केबिनमध्ये अधिक जागा, चांगली स्थिरता आणि प्रीमियम ड्रायव्हिंग अनुभव मिळतो.
डिझाइनच्या बाबतीत, ही एसयूव्ही किया ब्रँडच्या ‘Opposites United’ तत्त्वज्ञानावर आधारित असून, यात नवीन डिजिटल टायगर फेस, Ice Cube LED प्रोजेक्शन हेडलॅम्प्स, डायनॅमिक वेलकम फंक्शन, स्पोर्टी क्रिस्टल कट अलॉय व्हील्स आणि आधुनिक सिल्हूट देण्यात आला आहे. या वैशिष्ट्यांमुळे ऑल-न्यू सेल्टोस अधिक प्रीमियम आणि लक्षवेधक ठरते.






