
फोटो सौजन्य: Gemini
अनेक वर्षांपासून कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये Creta आघाडीवर आहे, त्यामुळे Sierra विरुद्ध Creta यामध्ये कोणती SUV तुमच्यासाठी जास्त फायदेशीर ठरेल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चला, किंमत, फीचर्स, इंजिन, डिझाइन आणि आकार यांच्या आधारे तुलना करूयात.
Tata Sierra ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 11.49 लाख रुपये आहे, तर Hyundai Creta 10.72 लाख रुपयांपासून सुरू होते. म्हणजे Sierra सुमारे 76,000 रुपये महाग आहे. मात्र मोठा आकार, आधुनिक फीचर्स आणि प्रीमियम अपीलमुळे ही किंमत वाजवी वाटू शकते.
Tata Sierra ची बुकिंग कधीपासून सुरु होणार? आणि डिलिव्हरीचं काय? जाणून घ्या एका क्लिकवर
आकाराच्या बाबतीत Tata Sierra ही Hyundai Creta पेक्षा लक्षणीय मोठी आहे. Sierra ची उंची 1715 mm तर Creta 1635 mm आहे. Sierra चा व्हीलबेस 2730 mm, तर Creta चा 2610 mm आहे. त्याशिवाय Sierra मध्ये 622 लिटर बूट स्पेस मिळतो, तर Creta मध्ये 433 लिटर आहे. मोठे 19-इंच अलॉय व्हील्स Sierra ला अधिक दमदार रोड प्रेझेन्स देतात. त्यामुळे मोठं केबिन आणि स्पेस हवी असलेल्यांसाठी Sierra चांगला पर्याय.
Tata Sierra मध्ये 1.5-लीटर NA पेट्रोल, 1.5-लीटर Turbo TGDi पेट्रोल आणि 1.5-लीटर Cryojet डिझेल असे 3 इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. ही SUV Manual आणि DCT गिअरबॉक्समध्ये उपलब्ध आहे.
Hyundai Creta मध्ये 1.5-लीटर पेट्रोल, 1.5-लीटर डिझेल आणि 1.5-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळते, ज्यासोबत CVT, 6AT आणि DCT पर्याय आहेत. इंजिन रेंज जवळपास समान असली तरी Sierra चा TGDi इंजिन जास्त स्पोर्टी आणि शक्तिशाली फील देतो.
Sierra चे Alpine Window डिझाइन, फुल-LED लाईटिंग, EV-इंस्पायर्ड DRLs आणि 19-इंच अलॉय व्हील्स तिला अधिक फ्युचरिस्टिक आणि प्रीमियम लुक देतात. तर Creta आपला Bold पॅरामेट्रिक ग्रिल, क्वाड-बीम LED हेडलॅम्प आणि कनेक्टेड LED टेललॅम्पमुळे स्पोर्टी दिसते.
Sierra मध्ये Theatre Pro ट्रिपल-स्क्रीन डॅशबोर्ड, JBL चे 12-स्पीकर साउंड सिस्टम, पॅनोरमिक सनरूफ आणि सॉफ्ट-टच मटेरियल दिले आहे. Creta मध्ये 10.25-इंच ड्युअल-स्क्रीन सेटअप, आरामदायी सीटिंग आणि सुटसुटीत केबिन आहे.
Sierra कडे जास्त फीचर्स असले तरी Creta फिट-फिनिश, राइड कम्फर्ट आणि यूजर-फ्रेंडली इंटरफेसमध्ये पुढे आहे. दोन्ही SUVs मध्ये Level-2 ADAS, ESP, TPMS, 360° कॅमेरा, EPB यांसारखी सेफ्टी फीचर्स आहेत. Creta मध्ये 6 एअरबॅग्स स्टँडर्ड, तर Sierra मध्ये मजबूत बॉडी स्ट्रक्चरसोबत मल्टीपल एअरबॅग्स मिळतात.
जर तुम्हाला प्रीमियम लुक, मोठं SUV फील, आधुनिक टेक्नॉलॉजी, विशाल स्पेस हवं असेल तर Tata Sierra उत्तम पर्याय. तसेच किफायतशीर किंमत, रिफाइंड परफॉर्मन्स, आरामदायी राइड, विश्वासार्हता आणि चांगली रिसेल व्हॅल्यू हवी असेल तर Hyundai Creta तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरेल.