Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ खास वैशिष्ट्यांमुळेच तर MG Windsor EV ग्राहकांच्या थेट हृदयात राज्य करते, किंमत तर फक्त…

MG Windsor EV ही देशातील एक लोकप्रिय इलेक्ट्रिक कार बनली आहे. मात्र, ही कार इतकी ग्राहकांच्या इतकी पसंतीस उतरली तरी कशी? चला या कारच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 08, 2026 | 03:57 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतात इलेक्ट्रिक कारला ग्राहकांची चांगली पसंती
  • MG Windsor EV ठरतेय ग्राहकांची लोकप्रिय इलेक्ट्रिक कार
  • जाणून घ्या कारचे खास वैशिष्ट्य
भारतात आज प्रत्येक कार उत्पादक कंपनी Electric Car च्या उत्पादनावर विशेष लक्षकेंद्रित करत आहे. टाटा मोटर्सपासून ते मारुती सुझुकीपर्यंत, सगळ्याच वाहन उत्पादक कंपन्या त्यांच्या दमदार इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये आणत आहे. मात्र, या सर्वात एक इलेक्ट्रिक कार आधीपासून ग्राहकांच्या मनात घर करून बसली आहे. ही कार म्हणजे MG Windsor EV.

MG Motors च्या अनेक कार भारतात लोकप्रिय ठरल्या आहेत. इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये MG Windsor EV तर ग्राहकांच्या चांगल्या पसंतीस उतरली आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये कोणत्या प्रकारचे फिचर्स दिले गेले आहेत? ही कार लांब पल्ल्याच्या ड्रायव्हिंगसाठी सर्वोत्तम पर्याय का असू शकते? या सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण जाणून घेऊयात.

Maruti Fronx की Tata Nexon? कोणत्या कारचा EMI तुमच्या खिशाला परवडणार? जाणून घ्या सोपा हिशोब

MG Windsor EV एक उत्तम पर्याय

एमजी विंडसर ईव्ही ही देशातील सर्वात परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कारपैकी एक म्हणून ऑफर केली जाते. कंपनीने ही कार विशेषतः इलेक्ट्रिक वाहन म्हणून डिझाइन केली आहे, ज्यामुळे तिला अनेक उत्कृष्ट फीचर्स आणि रेंज मिळत आहे.

फीचर्स

MG Windsor EV मध्ये अनेक प्रगत आणि आकर्षक फीचर्स देण्यात आले आहेत. या कारमध्ये ड्युअल-टोन इंटीरियरसह V2L आणि V2V तंत्रज्ञान देण्यात आले आहे. याशिवाय अँबियंट लाइटिंग, इन्फिनिटी ग्लास रूफ, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, 15.6 इंचाचा मोठा इन्फोटेनमेंट सिस्टम, Apple CarPlay आणि Android Auto सपोर्ट, चार स्पीकर्स, चार ट्वीटर आणि सबवूफरसह साऊंड सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस स्मार्टफोन चार्जर यांसारखी आधुनिक सोय उपलब्ध आहे.

तसेच या कारमध्ये वूडन फिनिश इंटीरियर, 604 लिटरचा मोठा बूट स्पेस, एलईडी हेडलाइट्स, एलईडी टेल लाइट्स, कनेक्टेड DRL, पॉवर्ड टेलगेट, 18 इंच अलॉय व्हील्स, ग्लास अँटेना आणि फ्लश डोर हँडल्ससारखी प्रीमियम फीचर्सही देण्यात आले आहेत.

Tata Punch EV की MG Comet, कोणत्या इलेक्ट्रिक कारमध्ये किती दम? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या रेंज, फीचर्स आणि बरंच काही

रेंज

MG Windsor Pro EV मध्ये 52.9 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी एका चार्जमध्ये सुमारे 449 किलोमीटरपर्यंत रेंज देऊ शकते. 60 kW क्षमतेच्या DC फास्ट चार्जरद्वारे ही कार 20 ते 80 टक्के फक्त 50 मिनिटांत चार्ज करता येते. या कारमधील इलेक्ट्रिक मोटर 136 PS पॉवर आणि 200 Nm टॉर्क निर्माण करते.

याशिवाय या कारच्या स्टँडर्ड व्हेरिएंटमध्ये एका चार्जमध्ये सुमारे 330 किलोमीटरपर्यंत रेंज दिली जाते.

किंमत

MG Windsor EV ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 14 लाख रुपयांपासून सुरू होऊन 18.50 लाख रुपयांपर्यंत जाते. तसेच कंपनीच्या BaaS (Battery as a Service) मॉडेलनुसार ही कार 9.99 लाख रुपयांपासून 13.57 लाख रुपयांपर्यंतच्या किमतीत उपलब्ध आहे.

Web Title: Mg windsor ev features and specifications why this ev is best family car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 03:57 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • Mg motors car

संबंधित बातम्या

अप टू डेट राहणं कोणी Bajaj कडून शिकावं! खास Electric Scooter झाली अपडेट, किंमत 1 लाखांपेक्षा कमी
1

अप टू डेट राहणं कोणी Bajaj कडून शिकावं! खास Electric Scooter झाली अपडेट, किंमत 1 लाखांपेक्षा कमी

Volkswagen Polo आता इलेक्ट्रिक अवतारात धावणार! जाणून घ्या रेंज आणि फीचर्स
2

Volkswagen Polo आता इलेक्ट्रिक अवतारात धावणार! जाणून घ्या रेंज आणि फीचर्स

Keeway India ची नवीन क्रुझर बाईक झाली लाँच! एक्स शोरूम किंमत 4.22 लाख रुपये, फीचर्स..
3

Keeway India ची नवीन क्रुझर बाईक झाली लाँच! एक्स शोरूम किंमत 4.22 लाख रुपये, फीचर्स..

कार आहे की बुलेट ट्रेन! Mahindra आणते 500 किमी पेक्षा जास्त रेंजसह इलेक्ट्रिक Thar, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
4

कार आहे की बुलेट ट्रेन! Mahindra आणते 500 किमी पेक्षा जास्त रेंजसह इलेक्ट्रिक Thar, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.