
Tata Sierra EV कधी होणार लाँच (फोटो सौजन्य - कारवाले)
टाटा सिएराने आपला एक वेगळा ग्राहक वर्ग निर्माण केला आहे आणि फारच कमी वेळात कमालीचा ग्राहक मिळवला आहे आणि आता नव्या इलेक्ट्रिक आवृत्तीचीही ग्राहक आतुरतेने वाट पाहत आहेत. याबाबत अधिक तपशील जाणून घेऊया.
रेंजच्या बॅटरीत Tata Sierra EV सगळ्या गाडयांना मागे सोडणार? लाँच होण्याअगोदर जाणून घ्या ‘ही’ माहिती
टाटा सिएराचे यश आणि वाढती मागणी
टाटा सिएराने लाँच झाल्यापासून भारतीय बाजारपेठेत चांगली कामगिरी केली आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये लॉन्च झाल्यानंतर, जानेवारी २०२६ मध्ये डिलिव्हरी सुरू झाली आणि काही महिन्यांतच कंपनीने ३०,००० युनिट्सची डिलिव्हरी पूर्ण केली आहे. हे या एसयूव्हीची प्रचंड मागणी दर्शवते. हे यश पाहता, कंपनी आता तिचे इलेक्ट्रिक व्हर्जन सादर करण्याची तयारी करत आहे.
डिझाइनमध्ये काय विशेष असेल?
टाटा सिएरा ईव्हीचे डिझाइन तिच्या पेट्रोल-डिझेल मॉडेलसारखेच राहण्याची शक्यता आहे, परंतु त्यात काही नवीन बदल असू शकतात. यात समोरच्या बाजूला बंद ग्रिल असू शकते, जे इलेक्ट्रिक कारचे वैशिष्ट्य आहे. बंपरच्या खाली एअर इनटेक्स आणि ADAS सेन्सर्स देखील असू शकतात. एरोडायनॅमिक व्हील्स, फ्लश डोअर हँडल्स आणि एक मजबूत बॉडी डिझाइन याला आधुनिक आणि प्रीमियम लूक देईल.
हाय-टेक टेक्नॉलॉजी कमालीचे वैशिष्ट्य
टाटा सिएरा EV मध्ये अनेक प्रगत वैशिष्ट्ये असण्याची अपेक्षा आहे. यात ट्रिपल-स्क्रीन सेटअप असू शकतो, ज्यामुळे ड्रायव्हिंगचा अनुभव वाढेल. लेव्हल-2 ADAS, पॅनोरॅमिक सनरूफ, प्रीमियम साउंड सिस्टीम आणि व्हेंटिलेटेड सीट्स यांसारखी वैशिष्ट्ये देखील अपेक्षित आहेत. ड्युअल क्लायमेट कंट्रोलसारखी वैशिष्ट्ये त्याची कामगिरी आणखी वाढवतील.
बॅटरी, रेंज आणि परफॉर्मन्स
या इलेक्ट्रिक SUV मध्ये 55kWh आणि 65kWh बॅटरी पॅक असण्याची अपेक्षा आहे. ही कार एका चार्जवर 500 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते, ज्यामुळे लांबच्या प्रवासासाठी हा एक चांगला पर्याय ठरतो. यात रिअर-व्हील ड्राइव्ह आणि ऑल-व्हील ड्राइव्हचे पर्याय देखील असू शकतात, ज्यामुळे तिची कामगिरी आणखी वाढेल.
अपेक्षित किंमत आणि लाँचची वेळ
टाटा सिएरा ईव्हीची किंमत ₹१८.५० लाख ते ₹२५.५० लाख (एक्स-शोरूम) दरम्यान असण्याची शक्यता आहे. कंपनी मे २०२६ च्या सुमारास ही कार लॉन्च करेल अशी अपेक्षा आहे, मात्र अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.