
फोटो सौजन्य: Gemini
4 सीटर इलेक्ट्रिक कार म्हंटलं की MG Comet EV आपल्याला आठवते. मात्र, आज आपण स्वस्त 5 सीटर इलेक्ट्रिक कारबद्दल जाणून घेऊयात.
543 Km रेंज, 7 एअरबॅग्स आणि ADAS फिचर! Maruti E-Vitara कंपनीसाठी का गेमचेंजर ठरणार? जाणून घ्या
भारतामध्ये सध्या सर्वात स्वस्त 5-सीटर इलेक्ट्रिक कार कोणती आहे, याबाबत ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. भारतात विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक कार्समध्ये Eva ही सर्वात स्वस्त ईव्ही मानली जाते, मात्र या कारमध्ये 2 प्रौढ आणि 1 मुलासाठीच बसण्याची सोय आहे. त्यानंतर MG Comet EV ही देशातील सर्वात स्वस्त 4-सीटर इलेक्ट्रिक कार आहे.
परंतु जर 5-सीटर इलेक्ट्रिक कार सेगमेंटची गोष्ट केली, तर Tata Tiago EV ही भारतातील सर्वात स्वस्त 5-सीटर इलेक्ट्रिक कार आहे. टाटा मोटर्सची ही इलेक्ट्रिक हॅचबॅक भारतीय बाजारात ₹7.99 लाख किंमतीपासून उपलब्ध आहे.
भारतीय बाजारात Tata Tiago EV चे एकूण 6 variants उपलब्ध आहेत. ही कार 6 कलर ऑप्शन्स सोबत विक्रीस उपलब्ध आहे. कंपनीने या ईव्हीमध्ये 2 battery pack options दिलेले आहेत.
अखेर प्रतीक्षा संपली! Maruti Suzuki E Vitara झाली लाँच, किमतीपासून रेंजपर्यंत तपशील एका क्लिकवर
या बॅटरी पॅकसह टियागो ईव्ही सिंगल चार्जिंगमध्ये 223 km रेंज देऊ शकते. यातून 45 kW ची पॉवर आणि 110 Nm टॉर्क जनरेट होते.
या मोठ्या बॅटरी पॅकसोबत कारची रेंज वाढून 293 km पर्यंत जाते. यातून 55 kW पॉवर आणि 114 Nm टॉर्क मिळतो.
टाटा टियागो ईव्ही केवळ 5.7 सेकंदमध्ये 0 ते 60 kmph वेग पकडू शकते, जे या सेगमेंटसाठी प्रभावी परफॉर्मन्स आहे.