Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

TATA चा मोठा धमाका! अवघ्या 4.69 लाखांत नवी Tiago Facelift लाँच, फीचर्स वाचून व्हाल थक्क

TATA Tiago Facelift Launched: भारतात 2026 टाटा टियागो फेसलिफ्ट अखेर लाँच करण्यात आली असून अवघ्या 4.69 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत कंपनीने अनेक आकर्षक बदलांसह ही कार सादर केली आहे. नवीन डिझाइन, प्रीमियम फीचर्स, 6 एअरबॅग्स आणि CNG-AMT पर्यायामुळे ही हॅचबॅक पुन्हा एकदा ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 30, 2026 | 10:24 AM
TATA चा मोठा धमाका! अवघ्या 4.69 लाखांत नवी Tiago Facelift लाँच, फीचर्स वाचून व्हाल थक्क

TATA चा मोठा धमाका! अवघ्या 4.69 लाखांत नवी Tiago Facelift लाँच, फीचर्स वाचून व्हाल थक्क

Follow Us
Follow Us:
  • 2026 टाटा टियागो फेसलिफ्ट 4.69 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत भारतात लाँच झाली आहे.
  • नव्या कारमध्ये 10.25-इंच टचस्क्रीन, वायरलेस चार्जिंग आणि कनेक्टेड टेल-लाइट्ससारखे फीचर्स मिळतात.
  • सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्स, 360-डिग्री कॅमेरा आणि ESC सारखी फीचर्स देण्यात आली आहेत.
TATA Tiago Facelift: भारतात अखेर 2026 TATA Tiago Facelift लाँच करण्यात आली आहे. वाहन निर्माता कंपनीने 4.69 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स शोरुम किंमतीत ही गाडी लाँच केली आहे. कंपनीने या गाडीमध्ये अनेक बदल केले आहेत. मात्र त्याच्या पावरट्रेनमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. 2026 टाटा टियागो फेसलिफ्टच्या व्हेरिअंटनुसार त्याची किंमत, त्याचे फीचर्स आणि इंजिनचे स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

Royal Enfield चा महाधमाका! नव्या Bullet 650 ने भारतात केला ग्रँड एंट्री… दमदार इंजिन अन् क्लासिक लूकवर सर्वच घायाळ

या व्हेरिअंटमध्ये 2026 टाटा टियागो फेसलिफ्ट लाँच

कंपनीने लाँच केलेली नवीन गाडी 6 व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये स्मार्ट, प्युअर, प्युअर प्लस, प्युअर प्लस ए, क्रिएटिव्ह, आणि क्रिएटिव्ह प्लस यांचा समावेश आहे. या गाडीची सुरुवातीची एक्स शोरुम किंमत 4.69 लाख रुपयांपासून सुरु होते आणि टॉप मॉडेलची किंमत 7.99 लाख रुपयांपर्यंत जाते. यामध्ये 5-स्पीड मॅनुअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. ज्यांना सीएनजी हवा आहे, त्यांच्यासाठी या कारची एक्स-शोरूम किंमत 5.79 लाख रुपयांपासून सुरू होते आणि सीएनजीचा पर्याय गाडीच्या जवळपास सर्व व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असणार आहे.  (फोटो सौजन्य – X) 

2026 टाटा टियागो फेसलिफ्टचा लूक

गाडीचा पुढील भाग आता पूर्वीपेक्षा जास्त आकर्षक दिसत आहे. यामध्ये नवीन शार्प हेडलॅम्प्स, पातळ ग्रिल आणि मोठा बंपर देण्यात आला आहे. गाडीच्या मागील भागात आता कनेक्टेड टेल-लाइट्स देण्यात आली आहेत. ज्या रात्री खूप सुंदर दिसतात. यामध्ये नवीन 15-इंचाचे अलॉय व्हील्स देखील जोडण्यात आले आहेत. ही कार 6 नवीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. गाडीच्या आतील डॅशबोर्ड आता पूर्णपणे नवा आणि आधुनिक दिसत आहे. ऑटोमॅटिक व्हेरिअंटमध्ये गिअर बदलण्यासाठी रोटरी डायल देण्यात आला आहे.

हाई-टेक फीचर्स

गाडी छोटी असली तरी देखील टाटाने यामध्ये मोठ्या आणि महागड्या गाड्यांचे फीचर्स दिले आहेत. यामध्ये 10.25-इंचाचे मोठे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम आणि डिजिटल ड्राइवर डिस्प्ले देण्यात आला आहे. या गाडीमध्ये दोन वायरलेस चार्जिंग पॅड्स दिले आहेत. पाठीमागे बसणाऱ्या लोकांसाठी एसी व्हेंट्स, क्रूझ कंट्रोल, कूल्ड ग्लव्हबॉक्स आणि वायरलेस ॲपल कारप्ले व अँड्रॉइड ऑटो सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

अशी आहे सुरक्षा

आता या गाडीमध्ये सुरक्षेसाठी 6 एयरबॅग्स स्टँडर्ड (सर्व व्हेरिअंट्समध्ये) देण्यात आले आहेत. अरुंद गल्ल्यांमध्ये सहज पार्क करता यावी यासाठी या गाडीमध्ये 360-डिग्री कॅमेरे देण्यात आले आहेत. या गाडीमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि लहान मुलांच्या सीटसाठी ISOFIX एंकर सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

फक्त 1 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट देऊन घरी आणा Kia Sonet चे ऑटोमॅटिक व्हेरिअंट! किती असेल दरमहा EMI? समजून घ्या संपूर्ण गणित

इंजिन आणि गियरबॉक्स

गाडीच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. यामध्ये आधीचेच विश्वसनीय 1.2-लीटर पेट्रोल इंजिन मिळणार आहे. पेट्रोल इंजिनसह ही गाडी 86hp ची पावर आणि CNG व्हेरिअंटमध्ये 75.5hp ची पावर ऑफर करते. विशेष म्हणजेच या सेगमेंटमध्ये पहिल्यांदा सीएनजी ऑटोमॅटिक (AMT) व्हेरिअंटमध्ये तुम्हाला गिअर बदलण्यासाठी स्टीयरिंगजवळ पॅडल शिफ्टर्स देखील मिळणार आहेत. ज्यामुळे ड्रायव्हिंग आणखी मजेदार होणार आहे. ज्या लोकांना पेट्रोल मॉडेल नको आहे, त्यांच्यासाठी इलेक्ट्रिक वर्जन Tiago EV देखील लाँच करण्यात आले आहे. ज्याची एक्स शोरुम किंमत 6.99 लाख रुपयांपासून सुरु होते.

Web Title: Tata tiago facelift launched in india read features and engine specifications

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 10:23 AM

Topics:  

  • auto news
  • cars
  • Tata

संबंधित बातम्या

महिंद्राच्या चाकणमधील कारखान्यातून ३० लाख वाहनांचे उत्पादन पूर्ण, ‘BE 6’ च्या रोल-आउटसह ऐतिहासिक विक्रम पूर्ण
1

महिंद्राच्या चाकणमधील कारखान्यातून ३० लाख वाहनांचे उत्पादन पूर्ण, ‘BE 6’ च्या रोल-आउटसह ऐतिहासिक विक्रम पूर्ण

एका चार्जमध्ये ५२६ किमी रेंज! कियाची नवीन ‘Syros EV’ भारतात दाखल; बुकिंग सुरू.
2

एका चार्जमध्ये ५२६ किमी रेंज! कियाची नवीन ‘Syros EV’ भारतात दाखल; बुकिंग सुरू.

आताच विकून मोकळे व्हा… Tata चा हा शेअर देणार दणका? ब्रोकरेजने दिली Sell रेटिंग, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का स्टॉक?
3

आताच विकून मोकळे व्हा… Tata चा हा शेअर देणार दणका? ब्रोकरेजने दिली Sell रेटिंग, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का स्टॉक?

JSW MG Motor घेऊन येतेय तब्बल १००० किमी मायलेज देणारी हायब्रिड एसयूव्ही; दिवाळीत होणार धमाका
4

JSW MG Motor घेऊन येतेय तब्बल १००० किमी मायलेज देणारी हायब्रिड एसयूव्ही; दिवाळीत होणार धमाका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.