फक्त 1 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट देऊन घरी आणा Kia Sonet चे ऑटोमॅटिक व्हेरिअंट! किती असेल दरमहा EMI? समजून घ्या संपूर्ण गणित
किया सोनेटचा ऑटोमॅटिक व्हेरिएंट म्हणून HTK (O) सादर करते. या गाडीच्या ऑटोमॅटिक व्हेरिअंटची एक्स शोरूम किंमत 9.95 लाख रुपये आहे. जर तुम्ही ही गाडी दिल्लीमध्ये खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सुमारे 70 हजार रुपये आरटीओ आणि सुमारे 43 हजार रुपये इंश्योरेंससाठी खर्च करावे लागणार आहेत. यानंतर किया सोनेट ची ऑन रोड किंमत सुमारे 11.07 लाख रुपये होणार आहे. (फोटो सौजन्य – Kia)
जर तुम्ही गाडीचे ऑटोमॅटिक व्हेरिअंट HTK (O) खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर बँक तुम्हाला गाडीच्या एक्स शोरूम किंमतीवर कर्ज देईल. 1 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला बँकेकडून सुमारे 10.07 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागणार आहे. बँकेने जर तुम्हाला 9 टक्के व्याजासह सात वर्षांसाठी 10.07 लाख रुपयांचे कर्ज दिले तर तुम्हाला दर महिन्याला 16,207 रुपये ईएमआय भरावा लागणार आहे.
जर तुम्ही 9 टक्के व्याजाने 7 वर्षांसाठी बँकेकडून 10.07 लाख रुपयांचे कार लोन घेतले तर तुम्हाला 7 वर्षांपर्यंत दर महिन्याला 16,207 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे. अशावेळी, कॉम्पॅक्ट साइज एसयूवी Kia Sonet चे ऑटोमॅटिक व्हेरिअंटच्या खरेदीसाठी तुम्हाला 7 वर्षांपर्यंत व्याजापोटी 3.54 लाख रुपये जास्त खर्च करावे लागणार आहेत. यानंतर एक्स शोरूम, ऑन रोड आणि व्याज जोडून गाडीची एकूण किंमत 14.61 लाख रुपये होणार आहे.
किया कंपनी सोनेट ही एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही म्हणून सादर करते, जी महिंद्रा एक्सयूव्ही ३एक्सओ, टाटा पंच, मारुती ब्रेझा आणि ह्युंदाई व्हेन्यू यांसारख्या गाड्यांशी थेट स्पर्धा करते.






