Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ? (फोटो सौजन्य: Social Media)
भारतात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, ज्या मार्केटमध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार चांगल्या परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर करत असतात. टाटा मोटर्स आणि मारुती सुझुकी या त्यातीलच आघाडीच्या ऑटो कंपन्या. कंपनीच्या अनेक कार लोकप्रिय आहेत. आज आपण Tata Tiago आणि Maruti Celerio या दोन्ही कार्सबद्दल जाणून घेऊयात.
भारतीय मार्केटमध्ये लोकं नेहमीच अशा कार शोधत आहेत, ज्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी देखील चांगल्या ठरू शकतात. अशा परिस्थितीत, आजकाल लोक पेट्रोल कारऐवजी सीएनजी कारकडे वळू लागले आहेत. जर तुम्ही अशा सीएनजी कारच्या शोधात असाल जी केवळ किफायतशीरच नाही तर मायलेजमध्येही चांगली असेल, तर आज आपण दोन स्वस्त कारबद्दल जाणून घेऊयात, ज्या आहेत मारुती सेलेरियो सीएनजी आणि टाटा टियागो सीएनजी.
FASTag Annual Pass ला भारतीयांचा उदंड प्रतिसाद! आता पर्यंत 1.4 लाख पास बुक
मारुती सेलेरियो सीएनजी आणि टाटा टियागो सीएनजी, या दोन्ही कार स्वस्त आहेत आणि चांगले मायलेज देतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही या दोन्ही कारपैकी एक खरेदी करण्याबद्दल गोंधळलेले असाल, तर दोन्ही वाहनांची किंमत आणि मायलेज जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.
सीएनजी कारमध्ये मारुती सुझुकी सेलेरियो ही सर्वाधिक मायलेज देणारी कार आहे, जी 34.43 किमी/किलो मायलेज देते. याचे एक्स-शोरूम किंमत 6.89 लाख रुपये आहे. बाईक चालवण्याच्या खर्चापेक्षा त्याचा रनिंग कॉस्ट कमी आहे, त्यामुळे ज्यांना इंधन खर्च कमी करायचा आहे त्यांच्यासाठी ही कार एक उत्तम पर्याय आहे. या कारमध्ये 5 लोक सहज बसू शकतात. सुरक्षिततेसाठी, तुम्हाला या कारमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमसह EBD आणि एअरबॅग्जची सुविधा मिळते.
Mahindra Scorpio Classic झाली स्वस्त, आता कराल खरेदी तर मिळेल भलामोठा डिस्काउंट
याशिवाय तुमच्यासाठी टाटा टियागो iCNG हा उत्तम पर्याय ठरू शकतो. ही कार प्रति किलोग्राम सुमारे 27 किमीचे मायलेज देते. यात 5 लोकांसाठी आरामदायी बसण्याची सोय आहे. इंजिनकडे पाहिले तर, यात 1.2-लिटरचे इंजिन देण्यात आले आहे, जे सीएनजी मोडवर 73 एचपी पॉवर आणि 95 एनएम टॉर्क निर्माण करते. या इंजिनला 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्स जोडलेला आहे. किंमतीबाबत सांगायचे झाले तर, टाटा टियागो CNG ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 6 लाख रुपयांपासून सुरू होते.