फोटो सौजन्य: iStock
टोल नाक्यावरील वाढत्या वाहनांची गर्दी पाहता काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने FASTag सुरु केले. या फास्टॅगमार्फत वाहनांवरील टोल हा ऑनलाईन पद्धतीने कट होत असत. यामुळे खऱ्या अर्थाने भारताने डिजिटल व्यवहारास सुरुवात केली. फास्टॅग आल्यानंतर त्याचे सर्वांनीच स्वागत केले. मात्र, सततच्या रिचार्जमुळे नागरिक त्रस्त होत होते. हीच बाब लक्षात घेत, केंद्र सरकारने FASTag Annual Pass ची घोषणा केली आणि त्याची बुकिंग 15 ऑगस्ट 2025 रोजी सुरु झाली.
15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) आज अधिकृतपणे FASTag वार्षिक पास लाँच केला आहे. हा वार्षिक पास देशभरातील निवडक राष्ट्रीय महामार्ग (NH) आणि राष्ट्रीय द्रुतगती महामार्ग (NE) वरील सुमारे 1,150 टोल प्लाझावर लागू होईल. ‘FASTag वार्षिक पास’ चे अधिकृत बुकिंग देखील 15 ऑगस्टपासून सुरू झाले आहे. नागरिक घरबसल्या हा पस ऑनलाइन बुककरू शकतात. या वार्षिक पासला पहिल्याच दिवशी नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
Mahindra Scorpio Classic झाली स्वस्त, आता कराल खरेदी तर मिळेल भलामोठा डिस्काउंट
फास्टॅगच्या वार्षिक पासला चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुमारे 1.4 लाख नागरिकांनी हा वार्षिक पास खरेदी केला. याशिवाय, पहिल्या दिवशी टोल प्लाझावर सुमारे 1.39 लाख व्यवहार नोंदवले गेले. अंदाजे 20,000 – 25,000 वापरकर्ते नेहमीच महामार्ग यात्रा ॲप वापरत असतात. वार्षिक पाससह प्रवास सुलभ करण्यासाठी प्रत्येक टोल प्लाझावर एनएचएआय अधिकारी आणि नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय, पास वापरकर्त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी, 100 हून अधिक अधिकारी जोडून 1033 राष्ट्रीय महामार्ग हेल्पलाइन अधिक मजबूत करण्यात आली आहे.
सर्वप्रथम, FASTag वार्षिक पाससाठी, तुम्हाला 3000 रुपये खर्च करावे लागतील जे 1 वर्षासाठी किंवा 200 ट्रिपसाठी (जे आधी होईल) वैध असेल. हा पास NHAI च्या अधिकृत वेबसाइट आणि राजमार्गयात्रा मोबाईल ॲपद्वारे खरेदी किंवा ॲक्टिव्ह केला जाऊ शकतो. हा पास फक्त कार, जीप किंवा व्हॅन सारख्या खाजगी वाहनांवर लागू असेल. हा पास कमर्शियल वाहनांवर वापरता येणार नाही.
Youtuber वर धुमाकूळ घालणाऱ्या ‘या’ Truck Driver ने चालवली Lamborghini Huracan