Tesla भारतात आपला जलवा दाखवणार; एप्रिल महिन्यात लाँच करू शकते पहिली EV
जगभरात अनेक लक्झरी कार उत्पादक कंपन्या आहे, ज्या अत्याधुनिक फीचर्ससह मार्केटमध्ये दमदार कार लाँच करतात. पण ग्लोबल मार्केटमध्ये जेवढी हवा टेस्लाच्या कारची झाली असेल तेवढी अन्य कारची झाली नसणार. टेस्लाच्या कार जितक्या चर्चेत असतात त्यापेक्षा जास्त चर्चा या कंपनीचे सीईओ एलोन मस्कची होत असते. नुकतेच भारताचे पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांची एलोन मस्कसोबत भेट झाली. या भेटीनंतर टेस्ला भारतीय मार्केटमध्ये एंट्री मारणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
टेस्लाच्या भारतात येण्याबद्दल बऱ्याच काळापासून चर्चा सुरू होती. आता कंपनी लवकरच भारतात आपला प्रवास सुरू करणार आहे असे चिन्ह दिसत आहे. एका अहवालात म्हटले आहे की टेस्लाची एन्ट्री या वर्षी एप्रिल २०२४ मध्ये होईल. आतापर्यंत असा अंदाज लावला जात होता की जर टेस्ला भारतात आली तर त्याच्या कारची किंमत कोट्यवधी रुपयांत असेल, परंतु तसे नाही. कंपनी भारतात 21 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत आपली पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करू शकते.
Toyota च्या SUV Land Cruiser 300 ची बुकिंग दणक्यात सुरु, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
CNBC-TV18 च्या अहवालानुसार, टेस्ला एप्रिल 2024 मध्ये भारतात प्रवेश करेल. टेस्ला बर्लिनमधील त्यांच्या प्लांटमधून इलेक्ट्रिक कार आयात करून भारतात विकण्याचा विचार करत आहे. टेस्ला आणि मस्क प्रथम भारतात $25000 (सुमारे 21 लाख रुपये) पेक्षा कमी किमतीची इलेक्ट्रिक वाहने आणतील.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेस्ला कंपनीच्या मालकीच्या शोरूमसाठी दिल्लीतील एरोसिटी आणि मुंबईतील बीकेसी येथे ठिकाणे अंतिम करत आहे. यासोबतच, कंपनीने नोकऱ्यांसाठी जाहिरात सुरू केली आहे. जॉब प्रोफाइलबद्दल बोलायचे झाले तर, त्यात स्टोअर मॅनेजर, सर्व्हिस टेक्निशियन आणि सर्व्हिस अॅडव्हायझर सारख्या नोकऱ्यांची नावे समाविष्ट आहेत.
अर्थसंकल्पात, 40000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या आयात केलेल्या कारवरील बेसिक कस्टम ड्युटी (BCD) 100 टक्क्यांवरून 70 टक्के करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की $40000 पर्यंतच्या किमतीच्या कारवरील प्रभावी बीसीडी फक्त 70 टक्क्यांपर्यंत आहे.
2025 मध्ये Renault ने ‘या’ 2 कार केल्या अपडेट, किंमतीत सुद्धा केले बदल? जाणून घ्या
आतापर्यंत लोकांना मारुती सुझुकीच्या ग्रँड विटारा ईव्हीकडून अपेक्षा होत्या की ती ईव्ही मार्केटला गाजवून टाकेल, परंतु मस्कच्या टेस्लाने आता सर्व कंपन्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. मारुतीच्या ई विटाराची किंमत 20 ते 25 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. आता जर या बजेटमध्ये टेस्लाची कार उपलब्ध झाली तर इतर कंपन्यांची स्थिती पाहण्यासारखी असणार आहे.