फोटो सौजन्य: iStock
जगभरात नाव कमावल्यानंतर Elon Musk यांची Tesla कंपनी भारतात येण्यास सज्ज होत आहे. अनेक महिन्यांपासून असे बोलले जात होते की लवकरच टेस्लाच्या कार्स भारतीय रस्त्यावर दिसतील. मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर तर कंपनीच्या कार टेस्टिंग दरम्यान स्पॉट देखील करण्यात आल्या होत्या. भारतीय मार्केटमध्ये असणारी EVs ची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसत असल्यामुळे, टेस्ला देखील आपल्या लक्झरी इलेक्ट्रिक कार्सच्या माध्यमातून भारतातील EV मार्केटमध्ये आपली पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करेल.
प्रदूषण करणाऱ्या ICE कारऐवजी ईव्ही कारची मागणी जगभरात सतत वाढताना दिसत आहे. अमेरिकन ऑटोमेकर टेस्ला जगातील अनेक देशांमध्ये त्यांच्या कार विक्रीसाठी उपलब्ध करून देते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी लवकरच भारतात आपला प्रवास सुरू करण्याची तयारी करत आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या टेस्ला कार भारतात विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात.
20 वर्षात 30 लाख लोकांची फॅमिली मेंबर बनली आहे ‘ही’ कार, मिळते 30 Km चा मायलेज
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन उत्पादक टेस्लाच्या कारची विक्री लवकरच देशात सुरू होऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, जुलै 2025 पासून देशात टेस्ला कारची विक्री सुरू होऊ शकते. परंतु, यावर अजून कंपनीने शिक्कामोर्तब केला नाही आहे.
माहितीनुसार, टेस्लाने चिनी कारखान्यातून Model Y चे पहिले काही युनिट्स भारतात पाठवले जाईल. त्यानंतर टेस्ला भारतात आपला प्रवास सुरू करू शकते अशी शक्यता आहे. कारच्या पहिल्या युनिट सोबतच, टेस्लाने सुपरचार्जर कंपोनंट, अॅक्सेसरीज, स्पेअर पार्टस आयात केले आहेत. हे सर्व चीन तसेच अमेरिका, युरोपमधील अनेक देशांमधून भारतात आयात केले गेले आहेत.
माहितीनुसार, टेस्लाने भारतात पाठवलेल्या Model Y च्या पहिल्या कन्साइनमेंटची किंमत सुमारे 32 हजार डॉलर्स असल्याचे घोषित करण्यात आले आहे. ही किंमत भारतीय चलनात अंदाजे 27.7 लाख रुपये आहे. या कार्सवर 21 लाख रुपयांपेक्षा जास्त इम्पोर्ट ड्युटी देखील आकारले जाईल, त्यानंतर याची संभाव्य किंमत सुमारे 50 लाख रुपये असू शकते.
100 Km चा मायलेज देणारी जगातील पहिली CNG बाईक झाली स्वस्त, फक्त मर्यदित कालावधीसाठी असेल ऑफर
माहितीनुसार, टेस्लाने मुंबईत पहिल्या शोरूमसाठी जागा आधीच निश्चित केली आहे. टेस्लाचा पहिला शोरूम मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये म्हणजेच BKC मध्ये असणार आहे. यानंतर टेस्ला दिल्लीत दुसरा शोरूम सुरू करू शकते.
जगभरातील प्रमुख वाहन उत्पादकांसाठी भारत ही एक मोठी आणि महत्वाची बाजारपेठ आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा बाजार आहे.