फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटो बाजारात अनेक अशा लोकप्रिय कार आहेत, ज्यांनी वर्षानुवर्षे मार्केटमध्ये अधिराज्य गाजविले आहे. यातीलच एक आघाडीची कार म्हणजे Maruti Suzuki Swift. स्विफ्टला आता भारतीय मार्केटमध्ये 20 वर्ष पूर्ण झाली आहेत.
मारुती सुझुकी स्विफ्ट लाँच झाल्यापासून भारतीय मार्केटमध्ये वर्चस्व गाजवत आहे. कंपनीने आता भारतीय मार्केटमध्ये 20 वर्षे पूर्ण केली आहेत. मे 2005 मध्ये कंपनीने मारुती सुझुकी स्विफ्ट लाँच केली होती. या काळात मारुती सुझुकी स्विफ्टने 30 लाखांहून अधिक कार विकल्या ज्याचा शेअर मार्केट 31 टक्के होता. तर 2023-24 या आर्थिक वर्षातच मारुती सुझुकी स्विफ्टने सुमारे 2 लाख कार विकल्या. अशा परिस्थितीत, मारुती सुझुकी स्विफ्टच्या लोकप्रियतेची 5 प्रमुख कारणे आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात.
जर आपण या कारच्या डिझाइनबद्दल बोललो तर, ग्राहकांना मारुती सुझुकी राउंडेड प्रोपोशन, सरळ उभे राहणे आणि कॉम्पॅक्ट परिमाण आकर्षित करतात. याशिवाय, कंपनीने मारुती स्विफ्टचे डिझाइन सतत अपडेट केले आहे. सध्याच्या मारुती स्विफ्टमध्ये, ग्राहकांना एक प्रमुख फ्रंट ग्रिल, उत्तम हेडलॅम्प आणि किंचित चौकोनी रिअर प्रोफाइल मिळते.
वाह रे पठ्ठ्या ! 1 लाखाच्या स्कूटरसाठी खरेदी केली तब्बल 14 लाखांची नंबर प्लेट
जर आपण फ्युएल एफिशियन्सीबद्दल बोललो तर, कंपनी मारुती स्विफ्टच्या पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंटमध्ये 24.8 किमी प्रति लिटर मायलेज देण्याचा दावा करते. तर मारुती स्विफ्टच्या पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये 25.75 किमी प्रति लिटर मायलेज देण्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय, स्विफ्ट सीएनजीमध्ये 30.9 किमी प्रति किलो मायलेज देण्याचा दावा करते.
या कारमध्ये 1.2-लिटर 3-सिलेंडर झेड-सिरीज पेट्रोल इंजिन आहे, जे जास्तीत जास्त 82bhp पॉवर आणि 112Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
100 Km चा मायलेज देणारी जगातील पहिली CNG बाईक झाली स्वस्त, फक्त मर्यदित कालावधीसाठी असेल ऑफर
दुसरीकडे, मारुती स्विफ्टच्या केबिनमध्ये, ग्राहकांना 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक एसी, वायरलेस फोन चार्जिंग आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी सारखे फीचर्स मिळतात. याशिवाय, सेफ्टीसाठी, कारमध्ये स्टॅंडर्ड 6-एअरबॅग्ज, रिअर पार्किंग सेन्सर आणि रिअर पार्किंग कॅमेरा सारखे फीचर्स देण्यात आली आहेत.
भारतीय मार्केटमध्ये, मारुती सुझुकी स्विफ्टची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत टॉप मॉडेलसाठी 6.49 लाख रुपयांपासून 9.64 लाख रुपयांपर्यंत आहे.