
फोटो सौजन्य: Gemini
अनेक विदेशी ऑटो कंपन्या भारतीय EV मार्केटकडे एक सकारात्मक दृष्टिकोनाने पाहत आहेत. म्हणूनच तर लोकप्रिय टेस्ला कंपनीने त्यांची Tesla Model Y भारतात लाँच केली. चला या कारच्या 2025 मधील कामगिरीबद्दल जाणून घेऊयात.
इलेक्ट्रिक कार उत्पादक Tesla ची भारतातील उपस्थिती सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. कंपनीने 2025 मध्ये अधिकृतपणे भारतीय बाजारात प्रवेश केला आहे. इंडस्ट्री डेटानुसार, कॅलेंडर इयर 2025 मध्ये Tesla ने भारतात आपल्या एकमेव इलेक्ट्रिक SUV Model Y च्या एकूण 225 units ची विक्री केली आहे.
हर घर पीएनजी, हर गाडी सीएनजी! भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा CNG-PNG साठी देशभरात पुढाकार
FADA (Federation of Automobile Dealers Associations) च्या आकडेवारीनुसार, September मध्ये 64 units, ऑक्टोबरमध्ये 40 units, November मध्ये 48 units तर December मध्ये सर्वाधिक 73 units ची रिटेल विक्री झाली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, Tesla ने भारतातील आपला पहिला शोरूम July 2025 मध्येच सुरू केला असून, कंपनीला भारतात अद्याप एक वर्षही पूर्ण झालेले नाही.
सध्या Tesla भारतात Model Y ही कार पूर्णपणे CBU (Completely Built Unit) स्वरूपात आयात करून विकत आहे. ही SUV केवळ RWD (Rear-Wheel Drive) पॉवरट्रेनमध्ये उपलब्ध आहे. पूर्णपणे आयात केलेल्या वाहनांवर लागणाऱ्या जड करामुळे या गाडीची किंमत भारतीय बाजारात तुलनेने जास्त आहे.
Tesla Model Y Standard RWD व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 59.89 लाख रुपये, तर Long Range RWD व्हेरिएंटची किंमत 67.89 लाख रुपये इतकी आहे. परदेशातील किमतींच्या तुलनेत या दर जास्त असल्याने विक्री मर्यादित प्रमाणातच होत आहे.
इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने Tesla हळूहळू भारतात आपले जाळे विस्तारत आहे. कंपनीचे Gurugram, Mumbai आणि Delhi येथे एक्सपीरियन्स सेंटर्स कार्यरत आहेत. यासोबतच या शहरांमध्ये सुमारे 12 superchargers आणि 10 destination chargers उभारण्यात आले आहेत.
Tesla च्या मते, Model Y Standard व्हेरिएंट एकदा पूर्ण चार्ज केल्यावर सुमारे 500 km पर्यंतची रेंज देतो, तर Long Range व्हेरिएंटची रेंज 622 km इतकी आहे. स्टँडर्ड मॉडेल 0–100 km/h वेग अवघ्या 5.9 seconds मध्ये गाठते, तर Long Range व्हेरिएंटला यासाठी 5.6 seconds लागतात.