भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा CNG-PNG साठी देशभरात पुढाकार
“हर घर PNG, हर गाडी CNG – जियो नॉन-स्टॉप जिंदगी” या एकात्मिक उद्योग थीमवर आधारित ही मोहीम असून, शहर गॅस वितरण (CGD) क्षेत्रातील सर्व कंपन्यांचा सहभाग यात आहे. स्वच्छ, परवडणाऱ्या आणि विश्वासार्ह ऊर्जेचा देशभरात शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रसार करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
अहो आश्चर्य! 200 वर्षांपूर्वीच ‘या’ व्यक्तीने बनवली होती Electric Car, जाणून घ्या वैशिष्ट्य
बीपीसीएलचे संचालक (मार्केटिंग) शुभंकर सेन यांनी सांगितले की, “PNG Drive 2.0 ही संपूर्ण उद्योगाची सामूहिक वचनबद्धता दर्शवते. एका प्रभावी कथानकाखाली एकत्र येत, आम्ही ग्राहकांसाठी स्वच्छ ऊर्जेचा पर्याय अधिक सुलभ करत आहोत. PNG आणि CNG चा मोठ्या प्रमाणावर स्वीकार वाढवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल.”
ही मोहीम देशभरातील CGD कंपन्यांना एकाच व्यासपीठावर आणते. समान संदेश, सर्जनशील सामग्री आणि समन्वित पोहोच याच्या माध्यमातून PNG आणि CNG चे फायदे नागरिकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. कमी उत्सर्जन, खर्च कार्यक्षमता, अखंड पुरवठा आणि दैनंदिन वापरातील सोय यावर विशेष भर देण्यात आला आहे.
ग्राउंड लेव्हलवरही या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून, विविध शहरांमध्ये जनजागृती कार्यक्रम, समुदाय संपर्क, डिजिटल मोहिमा आणि प्रत्यक्ष उपक्रम राबवले जात आहेत. या समन्वित प्रयत्नांमुळे शहरी आणि अर्ध-शहरी भागांमध्ये PNG आणि CNG चा स्वीकार वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे.
हा उपक्रम भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाच्या धोरणाशी सुसंगत असून, २०३० पर्यंत देशाच्या ऊर्जा मिश्रणात नैसर्गिक वायूचा वाटा सुमारे ६.५ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टाला बळ देणारा आहे. यामुळे प्रदूषणात घट, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा आणि अधिक कार्यक्षम ऊर्जा वापर साध्य होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






