फोटो सौजन्य: X.com
किया मोटर्सने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. अशीच एक उत्तम आणि लोकप्रिय एसयूव्ही म्हणजे Kia Syros. नुकतेच, कंपनीने किआ सायरोसचा नवीन HTK(EX) व्हेरिएंट लाँच केला आहे. चला या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
अरे गाडी आहे की रणगाडा! Sanjay Dutt ने खरेदी केली Tesla ची ‘हे’ पॉवरफुल वाहन, किंमत वाचूनच उडून जाल
किआने नवीन HTK(EX) ट्रिमची स्टाइल मजबूत केली आहे, ज्यामध्ये अनेक एक्सटिरिअर एलिमेंट समाविष्ट केले आहेत जे SUV ची रस्त्यावरील उपस्थिती वाढवतील. या कारमध्ये एलईडी डीआरएल, एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेललॅम्प, आणि आर१६ अलॉय व्हील्सचा समावेश आहे.
या एसयूव्हीमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, स्ट्रीमलाईन डोअर हँडल्स, 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आणि फोल्डेबल ORVMs तसेच सेन्सरसह रिअर पार्किंग कॅमेरा देण्यात आला आहे. नव्या व्हेरिएंटमध्ये 20 पेक्षा अधिक सेफ्टी फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत.
यामध्ये सहा एअरबॅग्स, EBDसह ABS, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट आणि व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट यांसारख्या महत्त्वाच्या सुरक्षा सुविधा आहेत. Kia च्या मते, Syros ही एसयूव्ही आपल्या सेगमेंटमध्ये प्रशस्त आणि एअरी केबिन अनुभव देणारी आहे.
Suzuki e-Access आणि Ather 450 आमने सामने! कोणता इलेक्ट्रिक स्कूटर जास्त दिमाखदार? जाणून घ्या
या वाहनात रिफाइंड इंटिरिअर, सर्व प्रवाशांसाठी आरामदायक बसण्याची सोय आणि सेगमेंट-लीडिंग बूट स्पेस देण्यात आली आहे. कंपनीनुसार, ही एसयूव्ही K1 प्लॅटफॉर्मवर आधारित असून तिला ५-स्टार BNCAP रेटिंग मिळण्याचीही शक्यता आहे.
Kia Syros HTK(EX) व्हेरिएंट पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिन पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. या पेट्रोल व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 9.89 लाख रुपये, तर डिझेल इंजिनच्या व्हेरिएंटची किंमत 10.64 लाख रुपये इतकी आहे.
कंपनीच्या मते, या ट्रिमची किंमत आणि फीचर सेटअप यामुळे तो Syros लाइन-अपमधील उत्तम व्हॅल्यू-फॉर-मनी पर्याय ठरतो. विशेष म्हणजे, HTK(EX) आता डिझेल पॉवरट्रेनसहही उपलब्ध झाल्याने ग्राहकांना इंधन पर्यायांमध्ये अधिक निवडीचा फायदा मिळतो.
Syros लाइन-अप आता एकूण 7 trims मध्ये उपलब्ध आहे. Kia च्या माहितीनुसार, नवीन HTK(EX) ट्रिम हा HTK(O) च्या बेसवर विकसित करण्यात आला असून, त्यामध्ये अधिक प्रॅक्टिकल आणि प्रीमियम बनवणारे अतिरिक्त फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत.






