फोटो सौजन्य: @ferraru (X.com)
काही दिवसांपूर्वीच Tesla ने भारतीय मार्केटमध्ये Model Y ही इलेक्ट्रिक कार लाँच केली. यासोबतच कंपनीने आपल्या पहिल्या वाहिल्या शोरुमचे मुंबईत BKC येथे उद्घाटन केले आहे. टेस्ला कंपनीच्या कार्स जरी जगभरात नावाजात असल्या तरी अजून देखील कंपनीला बॅटरीसाठी चीनवर निर्भर राहावे लागत आहे. अशातच कंपनीने चीनच्या बॅटरी इंडस्ट्रीला झटका देत टेस्लाने साऊथ कोरियाच्या कंपनीसोबत करार केला आहे.
अमेरिकन इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाने दक्षिण कोरियाच्या LG एनर्जी सोल्युशन (LGES) सोबत सुमारे 35,000 कोटी रुपयांचा बॅटरी करार केला आहे. या कराराचा उद्देश असा आहे की टेस्ला आता बॅटरीसारख्या आवश्यक गोष्टींसाठी चीनवर कमी अवलंबून राहू इच्छित आहे. हा करार केवळ तंत्रज्ञान आणि उर्जेच्या क्षेत्रात एक मोठे पाऊल नाही तर टेस्ला त्याच्या नियोजन आणि रणनीतीमध्ये मोठा बदल करत असल्याचे देखील दर्शवितो.
Volkswagen Taigun चा फेसलिफ्ट व्हर्जन होणार सादर, मिळणार नवीन फीचर्स
या करारांतर्गत, LGES अमेरिकेतील मिशिगन प्लांटमधून टेस्लाला एलएफपी (लिथियम आयर्न फॉस्फेट) बॅटरी पुरवेल. टेस्ला या बॅटरी त्यांच्या इलेक्ट्रिक कारमध्ये वापरणार नाही, तर Energy Storage सिस्टममध्ये (जसे की Powerwall आणि Megapack) वापरेल. पूर्वी टेस्ला चीनमधून या बॅटरी आयात करत असे. आता अमेरिकेतून पुरवठ्यामुळे टॅक्स तर वाचलेच आणि सप्लाय LFP देखील सुरक्षित राहील.
LFP बॅटरी स्वस्त असल्याने, त्यांचे लाइफ जास्त असते. तसेच, ही बॅटरी जास्त गरम होण्याचा किंवा आगीचा धोका कमी असतो. या बॅटरीत प्रामुख्याने ग्रिड एनर्जी स्टोरेज सिस्टममध्ये वापरले जाते. टेस्ला त्यांचा वापर घर आणि औद्योगिक गरजांसाठी पॉवरवॉल आणि मेगापॅक सारख्या बॅकअप पॉवर सोल्यूशन्समध्ये करते.
अमेरिका आणि चीनमधील सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे टेस्लाची ही रणनीती समोर आली आहे. अमेरिकेने चीनमधून येणाऱ्या बॅटरी कंपोनंट्स मोठे कर लादले आहेत, ज्यामुळे आयात महाग झाली आहे. या कारणास्तव, टेस्ला आता चीनऐवजी इतर देशांकडून पुरवठा मिळविण्याकडे वाटचाल करत आहे.
LGES सोबतच्या बॅटरी कराराव्यतिरिक्त, टेस्लाने अलीकडेच सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स सोबत 16.5 अब्ज डॉलर्स (1.38 लाख कोटी) किमतीचा चिप करार केला आहे. यावरून असे दिसून येते की टेस्ला आता त्यांचे पुरवठादार चीनमधून अमेरिका आणि दक्षिण कोरियासारख्या देशांमध्ये हलवत आहे, जेणेकरून त्यांची सप्लाय चेन अधिक सुरक्षित आणि स्थिर राहील.
टेस्लाचा हा करार ईव्ही उद्योगात मोठा बदल घडवून आणू शकतो. यामुळे टेस्लाची सप्लाय चेन अधिक सुरक्षित आणि राजकीयदृष्ट्या स्थिर होईल. कारण आता बॅटरी अमेरिकेत बनवल्या जातील, त्यामुळे त्यांच्यावर कोणताही टॅरिफ कर लागणार नाही आणि किंमत देखील कमी असेल.