
फोटो सौजन्य: YouTube
भारतात सध्या इलेक्ट्रिक कार्स मोठ्या प्रमाणात लाँच होत आहे. येणार काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असल्यामुळे अनेक ऑटो कंपनीज आपल्या आगामी इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करत आहे. सध्या किया कंपनी सुद्धा इलेक्ट्रिक कार्सच्या निर्मितीवर लक्षकेंद्रित करत आहे. लवकरच कंपनी आपली Kia EV9 मार्केटमध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहेत.
किया कंपनी 3 ऑक्टोबरला नवीन इलेक्ट्रिक कार Kia EV9 भारतात लाँच करणार आहे. याबाबत कंपनीकडून तयारीही सुरू करण्यात आली आहे. हे E-GMP प्लॅटफॉर्मवर आधारित आहे, ज्यावर Kia EV6 आणि Hyundai Ioniq 5 देखील आधारित आहेत. ही कार लाँच करण्यापूर्वी, त्याची काही वैशिष्ट्ये उघड झाली आहेत, ज्यात बॅटरी पॅक आणि रेंजची वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.
हे देखील वाचा: Lotus कडून ही दमदार इलेक्ट्रिक कार लाँच, फक्त 2.5 सेकंदात पकडते 0 ते 100km/h ची स्पीड
या कारची रचना खूपच भविष्यवादी ठेवली गेली आहे, ज्यामुळे टी खूपच आकर्षक दिसते. यात ग्रिलमधील इंटिग्रेटेड डिजिटल पॅटर्न लाइटिंग, स्टार मॅप लाइटिंग नावाचे एलईडी डीआरएल यांसारखी फीचर्स आहेत. हेडलाइट सेटअप सारखे कंपोनंट देखील आहेत जे ॲनिमेटेड लाइटिंग पॅटर्न तयार करतात.
या कारमध्ये काळ्या रंगात मिनिमलिस्ट डॅशबोर्ड दिसू शकतो. ड्युअल टोन व्हाईट आणि ब्लॅक लेदरेट सीट अपहोल्स्ट्री देखील असू शकते. त्याच वेळी, यात ट्रिपल स्क्रीन सेटअप असू शकतो, त्यापैकी दोन 12.3-इंच स्क्रीन आणि दरम्यान 5.3-इंचाचा क्लायमेट कंट्रोल डिस्प्ले असू शकतो. याशिवाय, Kia EV9 स्टार्ट/स्टॉप, क्लायमेट कंट्रोल आणि वेंटिलेशन सिस्टम, मीडिया, 8-वे पॉवर ॲडजस्टमेंट आणि मसाज फंक्शनसह कॅप्टन सीटसह पाहिले जाऊ शकते.
हे देखील वाचा: कारसाठी VIP नंबर बसवताना किती येतो खर्च? नेमका कसा मिळवायचा नंबर? जाणून घ्या
या नवीन कारमध्ये 99.8 kWh क्षमतेची बॅटरी पॅक उपलब्ध असेल. यात दोन इलेक्ट्रिक मोटर्स 384 PS पॉवर आणि 700 Nm टॉर्क जनरेट करतील. असे बोलले जात आहे की ही कार 500 किमी पर्यंतच्या रेंजसह येईल. यात 350 kW DC फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल, जे फक्त 24 मिनिटांत 10 ते 80 टक्के बॅटरी चार्ज करेल.
Kia EV9 ची एक्स-शोरूम किंमत ही तब्बल 80 लाख रुपयांपर्यंत असू शकते, जी नक्कीच सर्वसामान्यांच्या भुवया उंचावतील. भारतात, ती BMW iX आणि Mercedes-Benz EQE SUV सोबत स्पर्धा करताना दिसेल.