फोटो सौजन्य: YouTube
जगभरात सध्या अनेक कार्स लाँच होत असतात. यातही इलेक्ट्रिक कार्स मोठ्या संख्येने लाँच होत आहे. ज्याप्रमाणे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे लोक त्रस्त आहेत त्याचप्रमाणे जगभरात सुद्धा कित्येक जण या वाढत्या किंमतींना कंटाळले आहे. म्हणूनच अनेक जण सध्या इलेक्ट्रिक कार्सला पहिले प्राधान्य देत आहे.
येणार काळ इलेक्ट्रिक कार्सचा असल्यामुळे फक्त भारतातच नव्हे तर जगभरातील अनेक ऑटोमोबाईल कंपनीज इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनाकडे लक्षकेंद्रीत करत आहे. नुकतेच लोटस या कार उत्पदक कंपनीने आपली नवीन इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये आणली आहे.
हे देखील वाचा: कारसाठी VIP नंबर बसवताना किती येतो खर्च? नेमका कसा मिळवायचा नंबर? जाणून घ्या
वाहन उत्पादक कंपनी लोटसने आपली नवीन इलेक्ट्रिक कार थिअरी 1 कन्सेप्ट लाँच केली आहे. या कारची रचना अगदी फ्यूचरिस्टिक आहे. यात बूमरँग-आकाराचे हेडलॅम्प दिले आहे. पण, कॅब-फॉरवर्ड डिझाइन मिड-इंजिन एस्प्रिट लेआउट प्रमाणेच आहे. त्याचे अल्ट्रा-स्लीक टेललाइट्स, एलिव्हेटेड ॲडजस्टेबल स्पॉयलर आणि मागील बाजूस प्रचंड डिफ्यूझर वेगळे दिसतात. एवढेच नाही तर या कार्ल डायहेड्रल सिंक्रो-हेलिक्स दार देण्यात आली आहेत, जे या कारला अत्याधुनिक कार बनवतात. हे दरवाजे समोरच्या ऐवजी मागे उघडतात. यात आणखी कोणते फिचर्स त्याबद्दल जाणून घेऊया.
या नवीन कारमध्ये इंटिग्रेटेड बॅटरी, रिसायकल कार्बन टब आणि कंपोझिट आणि पॉली कार्बोनेट बॉडी आहे. मोटर आणि सस्पेंशन युनिटमध्ये रेसिंग-प्रेरित पुल-रॉड डिझाइन आणि व्हेरिएबल डॅम्पर्स आहेत. हेड-अप डिस्प्ले, स्पीडोमीटर, स्टीयरिंग व्हीलवर लहान स्क्रीन आणि हेडरेस्टमध्ये स्पीकर प्रदान केले आहेत. त्याचे स्टीयरिंग व्हील आणि पेडल्स सर्व ड्रायव्हरच्या दिशेने जातात, याचा अर्थ ड्रायव्हर त्याच्या सोयीनुसार ते अॅडजेस्ट करू शकतो. कारमध्ये स्टीयर-बाय-वायर फिचर देनाय्त आले आहे, ज्यामुळे ड्रायव्हरला प्रत्येक वळणावर सुधारित अचूकता आणि नियंत्रण मिळते.
हे देखील वाचा: ‘ही’ मेड इन इंडिया कार आता आफ्रिकेत होणार लाँच, होऊ शकतात महत्वाचे बदल
या नवीन कारमध्ये ड्युअल-मोटर ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टम आणि 70kwh बॅटरी आहे, जी मागील मोटरच्या जवळ बसवली आहे. दोन्ही मोटर्स 986 bhp ची पॉवर जनरेट करतात, ज्यामुळे ही इलेक्ट्रिक कार 2.5 सेकंदांपेक्षा कमी वेळेत 0 ते 100 किमी/ताशी स्पीड घेऊ शकते. त्याचा टॉप स्पीड 320 किमी/तास आहे. कंपनीचा दावा आहे की ही इलेक्ट्रिक कार 402 किलोमीटरपर्यंतची रेंज देईल.






