फोटो सौजन्य: Social Media
देशात बजेट फ्रेंडली कार्स जरी मोठ्या प्रमाणात विकत असल्या तरी लक्झरी कार्सची क्रेझ सुद्धा काही कमी नाही आहे. आजही रस्त्यावर एखादी लक्झरी कार जाताना दिसली की अनेक जणांच्या नजरा त्यावर रोखल्या जातात. तसेच या लक्झरी कार्स नेतेमंडळी आणि बॉलिवूडच्या सिनेतारकांकडून जास्त वापरल्या जातात.
लक्झरी कार्सच्या किंमती सुद्धा सामन्यांची झोप उडवत असतात. त्याचप्रमाणे या आलिशान कार्समध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स असतात, ज्या ग्राहकांना आकर्षित करत असतात. आपल्या देशात अनेक लक्झरी कार उत्पादक कंपन्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे रोल्स रॉयस.
Hyundai Creta च्या बेस व्हेरियंटवर 2 लाखाचे डाउन पेमेंट केल्यास किती असेल EMI
रोल्स रॉयसच्या कार्स देशातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आहेत. या कार्स अनेकदा आपल्याला चित्रपटात पाहायला मिळतात. भारतात कंपनीच्या कार्सची क्रेझ असल्यामुळे कंपनी सुद्धा नवनवीन मॉडेल्स लाँच करत असते. नुकतेच कंपनीने Rolls-Royce Ghost Series II चे रिफ्रेश केलेले मॉडेल जागतिक बाजारपेठेत लाँच करण्यात आले. ही कार लाँच होऊन अवघ्या दोन महिन्यांतच लक्झरी सेडानचे छोटे मॉडेलही भारतीय बाजारात आले आहे. Rolls-Royce Ghost Facelift स्टँडर्ड, एक्स्टेंडेड आणि ब्लॅक बॅज या तीन व्हेरियंटमध्ये बाजारात आली आहे. चला या आलिशान कार्सची किंमत जाणून घेऊया.
रोल्स रॉइस घोस्ट फेसलिफ्टच्या स्टॅंडर्ड मॉडेलची किंमत 8.95 कोटी रुपये आहे. त्याच्या एक्सटेंडेड व्हेरियंटची किंमत 10.19 कोटी रुपये आहे आणि ब्लॅक बॅज व्हेरियंटची किंमत 10.52 कोटी रुपये आहे. या किंमती वाचल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. या रोल्स रॉयस कारच्या फेसलिफ्ट मॉडेलसाठी ऑटोमेकर्सनीही बुकिंग घेणे सुरू केले आहे. कंपनी 2025 च्या पहिल्या चार महिन्यांत ही कार डिलिव्हरी देखील करू शकते.
कमी किंमतीत कार खरेदी करण्याची आज शेवटची संधी, उद्यापासून ‘या’ कार्स होणार महाग
Rolls-Royce Ghost फेसलिफ्ट ब्लॉक डिझाइनसह आणण्यात आले आहे. अशीच डिझाइन सिरीज II कलिनन मध्ये देखील दिसते. समोरच्या बंपरच्या खाली एक छोटी ग्रील दिली आहे. कारच्या सभोवताली डीआरएल इन्स्टॉल केले आहेत. या कारच्या मागील डिझाईनबद्दल सांगायचे तर, याला टेललाइट्ससह नवीन रूप देण्यात आले आहे. या कारमध्ये दोन प्रकारचे 22-इंच अलॉय व्हील बसवण्याचा पर्याय आहे.
रोल्स रॉइस घोस्ट फेसलिफ्टच्या नवीन मॉडेलमध्ये ऑटोमेकर्सनी कोणताही बदल केलेला नाही. मागील मॉडेलप्रमाणे, या कारमध्ये 6.75-लीटर, ट्विन-टर्बो V12 इंजिन आहे, जे 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी देखील जोडलेले आहे. घोस्ट फेसलिफ्टच्या स्टॅंडर्ड आणि एक्सटेंडेड व्हर्जन्समध्ये इन्स्टॉल केलेले इंजिन 563 hp ची शक्ती प्रदान करते आणि 850 Nm टॉर्क जनरेट करते. तर ब्लॅक बॅज व्हर्जनमध्ये हेच इंजिन ५९२ बीएचपी पॉवर आणि ९०० एनएम टॉर्क देते.