फोटो सौजन्य: Social Media
आपली स्वतःची कार असावी असे वाटणे साहजिकच आहे. खरंतर आपल्या कारमध्ये फिरण्याची काही वेगळीच मज्जा असते. म्हणूनच तर अनेक जण आपली आवडती कार खरेदी करण्यासाठी बजेट आखत असतात. पूर्वी कार खरेदी करताना अनेकांची दमछाक व्हायची पण आज कार लोनमुळे फक्त काही लाख रुपयांचे डाउन पेमेंट करून तुम्ही कार खरेदी करू शकता.
देशात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांना बेस्ट कार्स ऑफर करत असतात. यातीलच एक कंपनी म्हणजे ह्युंदाई. ह्युंदाईने देशात अनेक उत्तम कार्स ऑफर केल्या आहेत. कंपनीने Hyundai Creta ही SUV म्हणून भारतीय मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जर तुम्ही Hyundai Creta चे बेस व्हेरियंट E घरी आणण्याचा विचार करत असाल, तर 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, दरमहा किती रुपयांची EMI भरून ही कार घरी आणता येईल. याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
कमी किंमतीत कार खरेदी करण्याची आज शेवटची संधी, उद्यापासून ‘या’ कार्स होणार महाग
Hyundai क्रेटा SUV चे बेस व्हेरियंट म्हणून E ऑफर करते. कंपनी या मध्यम आकाराच्या एसयूव्हीचा बेस व्हेरियंट 11 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहे. जर ही कार दिल्लीत खरेदी केली तर 11 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीसह, तुम्हाला त्यावर रजिस्ट्रेशन टॅक्स आणि आरटीओ देखील भरावा लागेल.
ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला आरटीओसाठी 116863 रुपये आणि इंश्युरन्ससाठी 45300 रुपये द्यावे लागतील. तुम्हाला TCS चार्ज म्हणून 10999 रुपये आणि फास्टॅगसाठी 600 रुपये द्यावे लागतील. यानंतर दिल्लीत या कारची ऑन रोड किंमत 1273662 रुपये होईल.
Bharat Mobility 2025 मध्ये MG कडून ‘या’ 3 कार्सना सादर करण्याची तयारी
तुम्ही Hyundai Creta SUV चे बेस व्हेरियंट E विकत घेतल्यास, बँकेकडून फक्त एक्स-शोरूम किंमतीवर फायनान्स केले जाईल. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला सुमारे 1073662 रुपयांची रक्कम बँकेकडून फायनान्स करावी लागेल. बँकेने तुम्हाला सात वर्षांसाठी नऊ टक्के व्याजासह 1073662 रुपये दिले, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी दरमहा केवळ 17274 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.
जर तुम्ही बँकेकडून 1073662 रुपयांचे कार कर्ज सात वर्षांसाठी नऊ टक्के व्याजदराने घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 17274 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. अशा स्थितीत, सात वर्षांत तुम्ही Hyundai Creta च्या E व्हेरियंटसाठी सुमारे 3.77 लाख रुपये व्याज द्यावे लागेल. त्यानंतर तुमच्या कारची एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 16.51 लाख रुपये असेल.